Login

प्रारंभ नव्या नात्यांचा

नात्याला आकार
प्रारंभ नव्या नात्यांचा
नवीन एक प्रवास
आपुलकीचा
त्यात हवा वास

कुंभारासारखे वाटे
प्रारंभी मडके कच्चे 
टिकावे नाजूक बंध
मातीसम गुणधर्म सच्चे

अवखळ तरी हवेसे
नात्याला मिळे आकार
एकमेकांचा संकटात
देता जपण्याने आधार

हातात हात गुंफूनी
अहंकारावर मात
संशय डोकावता
होतो मोठा घात