शीर्षक:- खाद्यसंस्कृतीमधला बदल आणि परिणाम.
असे म्हणतात की माणसाच्या आनंदाचा एक मार्ग त्याच्या पोटातून जातो. "अन्न हे पूर्ण ब्रह्म" असे म्हणतात ते उगाच नाही. कारण शरीराला उभे राहण्याची ताकद ही त्यात असते.
पोटात एकदा घास गेला ना की मनाला आणि तनालाही वेगळेच सुख लाभते. आवडीचे जेवण असेल तर आत्मा तृप्त झाला असे म्हणून पोटभर त्या पदार्थांचे सेवनही केले जाते.
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. तसेच मैला मैलावर तिथल्या निराळ्या स्थानिक खाद्य संस्कृतीची एक वेगळीच छाप मन पटलावर पडते.
मुंबईचा वडापाव, कोल्हापूरची मिसळ, पुण्याची बाकरवडी, कोकणातील फणसाची भाजी असे विविध जिल्ह्यातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काही लोक तर खास ते खाण्यासाठी तिथे जाण्याचे नियोजन करतात.
पूर्वी भोजनालय हे खूप कमी प्रमाणात होतीत. वसतिगृहे आणि परप्रांतात राहिल्याने त्या लोकांसाठी आणि अर्थाजन म्हणून काही लोकांनी खानावळ सुरू केली होती. त्यामुळे घरगुती जेवण खाण्यास सहज उपलब्ध होत होते.
आता तर बदलत्या काळानुसार उपहारगृह तर आहेतच पण कॉफी पेयासाठी कॅफे, पाश्चिमात्य देशात आहेत तसेच विदेशी खाण्याचे जिन्नसही जसे की बर्गर,पिझ्झा, मंच्युरियन, जापनीज सुशी असे प्रकारही आता खास वेगळ्या पध्दतीने भारतात खाण्यासाठी पाहावयास मिळतात.
संतुलित आहार ही संकल्पना फक्त विज्ञान विषयाशी मर्यादित नाही तर आपल्या प्राचीन वेदात आणि काही पुस्तकात त्याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक माणसाची प्रकृती ही वेगळी असते. काहींची पित्त, वात आणि अन्य प्रकारची असते. हे सर्व आपण आपल्या उदरात कोणत्या प्रकारचे अन्न तिथे खाण्याच्या प्रक्रियेने पाठवतो त्यावर अवलंबून असते.
पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ हे ऋतुमानानुसार सेवन करावयाचे असतात. ह्यात आपले सण खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरण द्यायचे झाले तर थंडीत स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मकरसंक्रात सणाच्या आधी भोगी हा सण येतो त्यावेळेस काही भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते आणि तीळ लावलेली भाकरी खाल्ली जाते. कारण हिवाळ्यात थंडीपासून रक्षण होण्यासाठी ह्या पदार्थांची गरज भासते. ह्या काळात पचनसंस्थेची क्षमता उत्तम असते.
गुढीपाडवा येतो तेव्हा पुरणपोळी आणि कडुलिंबाचे पान हेही खाल्ले जाते कारण त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत आणि इथून पुढे थंडी कमी होऊन उन्हाळा लवकरच सुरू होणार ह्याचे ते संकेत असतात.
पेयामध्ये उन्हाळ्यात कैरीचे पन्हे, कोकम सरबत, सोलकढी हे पित्तशामक आणि शरीरास थंडावा देण्याचे काम करते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून बचाव होतो. हे पिढ्यान् पिढ्या पुढे चालत आलेले पदार्थ आणि त्याची कृती विषयी माहिती असल्याने त्याबद्दल स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या महिलावर्गास श्रेय देण्यास हरकत नाही.
आता जीवनशैली बदलत आहे. खूप कमी लोक शरीरासाठी
न खाता चवीसाठी खात आहेत. त्यात सहज मिळणारे जेवण ह्यामुळे आपण काय खातो हे त्यांना समजत नाही. फास्ट फूड हे जलदरीत्या बनत असले तरी ते उच्च तापमानावर बनवल्याने त्याच्या पोषक मूल्यांवर जाणकार मंडळी नाराजी व्यक्त करतात.
न खाता चवीसाठी खात आहेत. त्यात सहज मिळणारे जेवण ह्यामुळे आपण काय खातो हे त्यांना समजत नाही. फास्ट फूड हे जलदरीत्या बनत असले तरी ते उच्च तापमानावर बनवल्याने त्याच्या पोषक मूल्यांवर जाणकार मंडळी नाराजी व्यक्त करतात.
हिरव्या भाज्या, कडधान्ये, विविध डाळी ह्यातून कर्बोदके, प्रथिने तसेच शुध्द पाणी, फळे ह्यातून क्षार आणि जीवनसत्वे प्राप्त होतात हे माहीत असूनही आजची पिढी ही झटपट होणाऱ्या खाण्याच्या पदार्थांकडे वळताना दिसत आहे.
भाकरी, पोळी, धिरडे ह्या पारंपारिक पद्धतीने बनवलेले जेवण त्यांना नको वाटते. यामुळे काही मुलांना खूप कमी वयात मधुमेह, लठ्ठपणा तसेच कमजोर नजर ह्याला सामोरे जावे लागत आहे.
आपण काय खातो ते बरोबर आहे का नाही ह्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. सोडायुक्त पेय पिल्याने ते शरीरातून बाहेर काढण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा आणि पाणी पिण्याची गरज भासते. त्यामुळे आपल्या शरीरावर आपण अन्याय करत आहोत हे समजून घ्यायला पाहिजे.
ह्याचा अर्थ बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत का तर तसे नाही नाहीच खाल्ले तर खूपच उत्तम आहे पण जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. वर्षातून काही वेळेस ठीक आहे फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पण त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे.
ऋतुमानानुसार आणि तिथल्या प्रदेशानुसार आहार हा बदलत राहतो. जिथे तापमान हे कमी असते जसे की हिमाचल प्रदेश तिथे स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात कारण ते शरीरास आवश्यक असतात परंतु तेच जर मुंबई सारख्या दमट हवामान असलेल्या ठिकाणी खाल्ले तर ते पचनास जड असतात आणि त्यामुळे त्याचा काही जणांना त्रासही होतो.
पूर्वीच्या काळी सर्व गोष्टी ह्या भेसळमुक्त होत्या त्यामुळे आहारात पोषकमूल्ये अधिक प्रमाणात होती आता भेसळयुक्त पदार्थ सगळीकडे असल्याने त्याबाबत जागरूक राहून योग्य भाज्या आणि फळे आणि पाकिटबंद खाण्याच्या वस्तू घेताना सतर्क राहणे गरजेचे आहे.
आपल्या शरीरासाठी अन्न हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्या पोटात आपण कोणते जिन्नस खाण्यासाठी वापरतो हे समजणे आणि चुकीच्या गोष्टी न खाणे ह्याची खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे.
आताची आणि पूर्वीची खाद्यसंस्कृती ह्याचा मेळ घालत आपले आरोग्य सुदृढ कसे राहील ह्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायलाच हवेत तरच आपले शरीर हे निरोगी आणि योग्य स्थितीत राहील.
जास्त जपून करावा
साऱ्यांनी आहार
तरच जीवनाला
मिळेल सुंदर आकार
साऱ्यांनी आहार
तरच जीवनाला
मिळेल सुंदर आकार
© विद्या कुंभार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा