Login

अनोखे नाते भाग -अंतिम

अनोख्या नात्याची सुंदर विण
दिप्तीचा इगो हा चांगला संसार उध्वस्थ करून गेला .पण सोबत एका गोड लेकराचे आयुष्य अस्ताव्यस्थही करून गेल.दिप्ती गेल्यावर मुग्धाला आईच्या प्रेमाला मुकाव लागलच हो ,पण समाज्याच्या वाईट वागणुकीतून होणारी सागरची घुसमटही तीने अनुभवली ...मायेच्या स्पर्शाला मुकलेली व नको त्या वयात दु:खाचे चटके अनुभवलेली मुग्धा लवकरच समजदारी घेऊन वावरू लागली ,...सागर सागरचे आईवडिल काळजी घेत पण आजोळसाठी कायमच ती परकी होती...

मयुरी व रवीच सुत जुळल तेव्हा रवीच्या मनात असलेल्या बहिणीच्या प्रेमाची रिकामी पोकळी मयुरीने ओळखली..अजानपणे जग सोडून गेलेली बहिण तर पुन्हा येणार नाही पण तीची छबी जर जवळ आली तर ननंदेची पोकळी भरून निघेल व त्या लेकरालाही आपलेपणा मिळेल ह्या आशेने तीने पाऊल उचलायच ठरवल ..खरतर तीने घेतलेला हा निर्णय सगळ्यांना जरा बालिशच वाटला.साखरपुड्यात मयुरीने रवीसमोर मुग्धालाही सोबत आणण्याचा हट्ट केला तेव्हा तर किती वादळ उठल होत ..

"मयुरी ताईच्या घरच्याशी काही संबध नसतांना व जवळपास पाच वर्ष झाली तीची मुलगी बघितली नसतांना कशी बोलवू मी साखरपुड्याला ,तेवढे संबध नाहित गं आमचे स्वाॅरी ही मागणी मी पुर्ण करू शकत नाही ,मग लग्न मोडायची वेळ आली तरी चालेल "..

ह्याच भाषेत तो बोलला होता...

मयुरीने खरतर तेव्हाच सगळ्यांच मन जिंकल होत .सागरदादाला भेटून सागर व मुग्धाला साखरपुड्यासाठी येण्याचा हट्ट धरला...

"मला भाऊ नाही तुम्ही माझे भाऊ म्हणुन पाठिशी उभे रहिलात तर मला खुपच बर वाटेल ,"ह्या वाक्याने तीने नात्यात ओलावा निर्माण केला आणि मुग्धा व सागरची पुन्हा ह्या परिवाराशी सलगी झाली निमित्त माञ मयुरी होती..

किती निखळ मनाची ही मयुरी ,जेथे ननंद नको असे मुली म्हणतात तेथे हयात नसलेल्या ननंदेच अस्तित्व तीच्या मुलीत आहे हेच आमान्य केलेल्या परिवाराला, त्या मुलीचा लळा लावण व घरातला भाग करून घेण किती सुखावह गोष्ट होती ही...नात्यांची ओजळ भरून ,लक्ष्मीच्या पावलांनी भरभरून प्रेम घेऊन आलेली मयुरी म्हणजे अनोखी स्ञीच ना?..

एक मामी नाही मामीआई बनणारी ,आपल्या पोटी लेकरू आल्यावर मायेचा पाझर आईला फुटतोच हो...पण ,आईपण न अनुभवता आईपणाची स्वत:हून जबाबदारी ओढवून घेतलेली ही मामीआई व मुग्धाची अनोखी जोडगोळी बनली होती..

साखरपुड्यात जावई व नातीला पहिलेंदा बघितल्यावर सासरकडच्या लोकांना जरा धक्काच बसला होता ,पण रवी माञ मुग्धाला बघून मनोमन सुखावला होता ..आनंद व बहिणीच्या आठवणीने डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने मयुरीचे मनोमन आभार मानले होते...

"मयुरी तु अशक्य गोष्ट करून दाखवली ,तु मला माझी बहिण नव्हे तर तिच्या सावलीची जाणिव करून दिलिस त्यामुळे मी सदैव तुझा ऋणी राहिल ..".

हे त्याचे वाक्य होते..सासूबाई तर मयुरीवर जीव ओवाळून टाकावा इतक्या खुश होत्या .मुग्धा ही ह्या आईच्या नात्यांबद्दल फक्त ऐकून होती आज आईच गणगोत तीला बघायला मिळाल होत..मयुरीच्या जवळ येत तीने त्याच दिवशी तीला घट्ट मिठी मारत ...

"ऐ मी तुला मामीआई म्हटल तर चालेल ना?"असा लाडीक सवाल केला तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले होते ..

"हो मग ,आजपासून मी तुझी सर्वस्व तुला काय म्हणायचं ते म्हण ,पण आपली मैञी टिकली पाहिजे हं...!"
असा लाडिक दमही मयुरीने भरला होता...व तेथूनच ह्या अनोख्या मैञीचा,नात्याचा खरा श्रीगणेशा झाला तो आजतागत नात्यांची विण फक्त आणी फक्त घट्ट होत होती ..हळूहळू दोघींसोबत आता दोघ घरांमध्येही नात्यामध्ये ओढ निर्माण होऊ लागली होती..

लग्नानंतर तर मयुरीने मुग्धाच्या जबाबदारीत झोकुन घेतल होत ..सासरेबुवा नाराज होते पण कधी आडवल नाही मुग्धाला ,नातीच कोडकौतुक करण नवर्याच्या विरोधात जाऊन शक्य नव्हतच सासूबाईंना ..सुन करते म्हटल्यावर सासूबाई निश्तिंत होत्या...

रवीही आता मुग्धात गुंतला होता .संसार सुरू झाला मयुरीच्या ओटीत दोन लेकर आलीत पण ,ह्या मामीआईने कधीच मुग्धाला दूर लोटल नाही वर्षागणिक मायेचा एक एक पैलू पडत मुग्धाही तीच्या तालमीत घडत गेली..समज ,आपलेपणा व नात्यामध्ये जवळीक साधण्याच कसब तीने मयुरीकडून घेतल होत..आपल्या सावञाईसोबत,आजी आजोबा व वडिलांची काळजी घेतांना ,आईच्या तापट व आहंकारी स्वभावाची छाप पुसून ती एक आदर्श मुलगी ,आदर्श भाची बनली होती..तारूण्याच्या उबरठ्यावर आलेल्या मुग्धाने आता दिप्तीच्या वडिलांनाही आपल्या चागुलपणातुन आपलस केल होत..म्हणुन तर आज त्यांनीही मयुरीसोबत मुग्धासाठी एक पाकिट पाठवल होत ..

बघता बघता दिवस संपला होता..आता मयुरीच्या परतीचा प्रवास सुरू होणार होता .मुग्धाच्या चेहेर्यावर जरा अस्वस्थता दिसू लागली होती ...रवीने व मयुरीने मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवत निघण्याची तयारी दाखवतात..घरातील सगळ्याची मन अस्वस्थ झाली होती..

"येत जा रवी ..जरा अधुन मधून मला बर वाटत ,आठवणीं आहेत भरपुर त्या जपुयात ना ?".

सागरने बोलताच रवीनेही होकारार्थी मान हालवली.

"तुम्ही पण या ना?कधीतरी मुग्धाला घेऊन ,तिलाही बघूद्यात मामच गाव ,अनुभवू द्या तीच्या आईच बालपण "

हे पहिलेंदाच रवी बोलला होता..

मयुरीला आज तिच्या प्रर्यत्नाच सार्थक झाल्याच समाधन लाभल होत ...इतक्या वर्षात कधीच" घरी या "हा शब्द रवीच्या ओठांवरही आला नव्हता .आज खर्या आर्थाने तीच आईपण जिंकल होत..आता रवीने मुग्धाला घराच्या उबंरठ्यावर आणल तर सारच छान छान होणार होत ..बाबांनाही नातीला बघताच मुलीच सुख मिळणार होत...

सागरचे आई वडिल तर आनंदले होतेच पण ,

"मामा म्हणजे मी तिकडे आली तर चालणार आहे,"असे मुग्धा जोरात ओरडली होती..तिच्या आनंदाला पारावार नव्हता ..
मयुरी तिचा हात हातात घेऊन फक्त आनंदाने न्याहळत होती...

गोड नात्यांची मैफिल आता सजणार होती.एका चुकीच्या गोष्टीला मुठमाती मिळणार होती..नविन मनाने नव्या उमेदीने नात्यात आपलेपणाची नवलाई मिळणार होती...
खरतर त्या गोड लेकीची काहीच चुक नव्हती ,फक्त एका चुकीच्या वेळेने घात केला होता गोड नात्यांचा..व त्याची बळी चढली होती मुग्धा ..मयुरीने जर मायेचा हात पुढे केला नसता तर दिप्ती व तीच्या मुलीचा संबध कधीच संपला असता ह्या अनोख्या नात्याला जिवंत केल होत ह्या सुंदर मनाने एका सुंदर भावनेने...

(स्ञीने ठरवल तर अशक्य नसत काही पण त्या तपातून जात आसतांना समाजमन,कष्ट व सातत्याने सर्व साध्य करण्याच कसब असत तीच्यात ...मयुरीनेही नव्या परिवारात जातांना एक पण घेऊन अनोखे नाते जपले व त्या नात्याला जागत परिवारातील वितृष्ट संपुष्टात आणल होत हिच किती छान भावना नाही का?,आजकल जेथे नातेच नकोसे होतात तेथे मायेचा ओलावा पेरणारी मयुरी ह्या जगात असेल तर कितीतरी मुग्धा नको त्या गैरसमजातून नात्यांना दुरावणार नाहित व निष्पाप सागर सारखी माणसे गैरसमजाची शिकार होणार नाहित बरोबर ना?...)