गोष्ट छोटी डोंगराएवढी (18)
विषय - आकाशी झेप घेरे
शीर्षक - भरारी
शीर्षक - भरारी
"भरारी " किंवा " झेप" हा शब्द नेहमीच पक्षांच्या बाबतीत किंवा पंख असणाऱ्या प्राण्यांबद्दल आपण वापरतो.
परंतु झेप या शब्दाचा आवाका इतका मोठा आहे की कुठलाही माणसाने त्याच्या आवाक्याच्या बाहेरचे काम केलं की आपण त्याला झेप घेतली असं म्हणतो.
बरेचजण स्वतःचा विकास करण्यासाठी किंवा स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी क्षमतेच्या बाहेर मेहनत करतात, कधी कल्पकता वापरतात किंवा काहीजण तर संकटाला संधी बनवून अशी एक झेप वा भरारी आकाशात घेतात ज्यामुळे त्यांच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी असं सगळं मिळतं.
यात खूप वेळा पैशांपेक्षा आत्मिक समाधान महत्वाचं असतं.
अशा सफल लोकांना आपण कर्तृत्ववान समजतो.
पण समाजात असे कितीतरी लोक आहेत जे निस्वार्थ पणाने समाजासाठी काही करू इच्छितात, त्यासाठी प्राणही पणाला लावतात आणि जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा, त्यांच्यासोबत कितीतरी लोकांचं भलं झालेलं असतं.
समाजाला त्यांनी जे दिलं आहे त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सुद्धा एक प्रकारची झेप किंवा भरारीच आहे असं मला वाटतं.
असे लोक कायम सर्वांसाठी प्रेरणादायी असतात.
आपण जर डोळे उघडून आपल्या आजूबाजूला पाहायला लागलो तर असे कितीतरी लोक आपल्याला सापडतील जे प्रचंड धाडसी व निडरपणे सामाजिक कार्य करत आहेत.
यावेळचा हा विषय वाचला आणि माझ्या मनात बरीच नावे अशी तराळून गेली पण "सुनिता कृष्णन" यांचे नाव विशेष चमकलं.
यावेळचा हा विषय वाचला आणि माझ्या मनात बरीच नावे अशी तराळून गेली पण "सुनिता कृष्णन" यांचे नाव विशेष चमकलं.
डॉक्टर सुनिता कृष्णन यांच्याबद्दल बर्याचशा लोकांना माहिती नाही किंवा माहित असेल तरीसुद्धा विस्तृत माहिती नाही.
तर जाणून घेऊया अशाच एका महिलेबद्दल जिने स्वतंत्र आकाशात झेप घेतलीच आणि कितीतरी डांबून ठेवलेल्या कोवळ्या मुलींना व बंदिस्त असलेल्या मुलींना,महिलांना मुक्त करून त्यांनाही झेप घेण्याची प्रेरणा दिली.
सुनिता कृष्णन या मानव तस्करी विरुद्ध काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्ती आहेत.
त्यांचा जन्म १९७२ साली , बेंगलोर येथे मल्याळम कुटुंबामध्ये झाला होता.
त्या स्वतःच जन्मतः अपंग होत्या, त्यांचे पाय मागच्या बाजूला वळलेले होते, पण फिजिओ थेरपी आणि अन्य उपचार घेतल्यामुळे त्या किमान त्यांच्या पायावरती चालायला लागल्या.
त्या स्वतःच जन्मतः अपंग होत्या, त्यांचे पाय मागच्या बाजूला वळलेले होते, पण फिजिओ थेरपी आणि अन्य उपचार घेतल्यामुळे त्या किमान त्यांच्या पायावरती चालायला लागल्या.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ,आठ वर्षाच्या वयात त्यांनी मानसिक रूपाने अपंग असलेल्या मुलांना नृत्य शिकवायला सुरुवात केली होती. बाराव्या वर्षीच झोपडपट्टीत शिक्षणाच्या इच्छुक पण गरीब मुलांसाठी शाळा चालवायला सुरूवात केली.
खूप कमी जणांना माहीत असेल की सुनिता पंधरा वर्षाची होती त्यावेळी तिच्यावरती आठ नराधमांकडून सामूहिक बलात्कार झाला होता. पुरुष प्रधान समाजात ती काहीतरी वेगळं करू पाहत होती. त्यांना त्यावेळी खूप मारहाण केली गेली , त्यामुळे त्या एका कानाने आंशिक बहिर्या झाल्या .
त्यानंतर मात्र त्यांचे जीवन पूर्णतः बदलून गेलं. त्यांच्या घरच्या लोकांनीही त्यांना अशा अवस्थेत घरामध्ये घेण्यास मनाई केली . त्यावेळी त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यामुळेच त्या अशा महिलांसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा.
बलात्काराच्या या घटनेनंतर त्या खूप दिवस उदास होत्या पण त्यांनी या गोष्टीला प्रेरणा म्हणून घेतली आणि मानव तस्करी आणि बलात्कार पीडित यांचे मदत करायची आणि भारतातील स्त्रियांना सहायता करायची या भावनेने पेटून उठल्या. त्यांना एक मदतीचा हात मिळाला अन त्या उभ्या राहिल्या.
काही जणांना माहीत असेल 1996 मध्ये बेंगलोर मध्ये मिस वर्ल्ड प्रतियोगिता च्या विरोधात उभी राहिल्यामुळे त्यांना अटक झाली होती आणि त्या दोन महिने जेलमध्ये सुद्धा होत्या.
पुन्हा त्या भाई वर्गीस एकनाथ या कार्यकर्त्यांसोबत जोडल्या गेल्या जे पीपल इनिशिएटीव्ह नेट वर्क PIN साठी काम करायचे.
आज डॉ. सुनिता कृष्णन या हैदराबाद मध्ये प्रज्वाला नावाची एक संस्था चालवतात जी त्यांनी स्थापन केलीय. वेश्यावस्ती व मानव तस्करी क्षेत्रामध्ये लोकांसाठी मदत व पुनर्वसनाचं काम त्या करतात. यात 1996 मध्ये हैदराबादच्या मेहबूब की मेहंदी नामक रेडलाईट क्षेत्रांमध्ये मनाविरूद्ध व तस्करीतून आणलेल्या महिलांना या दलदलीतून काढण्यात आणि त्यांना उत्तम भविष्य देण्यासाठी त्यांनी जिवापाड मेहनत घेतली.
आजपर्यंत त्यांनी २२००० महिला व मुलींना या दुष्टचक्रातून मुक्त केलं आहे.
या मुली व महिलांसांठी एक शाळा सुरू केली.
त्या संस्थेचे नाव प्रज्वला आहे. वेश्यावृत्ति तून सुटका करून शिकायला मिळवून अशा महिलांना त्यांनी हाउसकीपिंग चे काम शिकवलं आणि विविध व्यवसायात जोडलं.
त्या संस्थेचे नाव प्रज्वला आहे. वेश्यावृत्ति तून सुटका करून शिकायला मिळवून अशा महिलांना त्यांनी हाउसकीपिंग चे काम शिकवलं आणि विविध व्यवसायात जोडलं.
2012 मध्ये टीव्ही शो सत्यमेव जयते मध्ये सुनिता कृष्ण न यांना बोलावून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली होती.
2013 मध्ये बलात्कारावरती भारतातल्या विधेयकात मसुदा तयार करताना त्यात योगदान देण्यासाठी सुनिताजी आंध्रप्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या होत्या.
अफजल खान पोलीस स्टेशन हैदराबाद मध्ये संकट परामर्श केंद्रासाठी पण त्यांनी काम केलं.
२०१४ मधे सन्मानीय मदर टेरेसा पुरस्कार मिळाला व 2016 मध्ये सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०१४ मधे सन्मानीय मदर टेरेसा पुरस्कार मिळाला व 2016 मध्ये सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्त्रियांशी संबंधित सगळ्या समस्यांवर त्यांनी बरेच काम केले आहे.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं त्यांचा हा प्रवास बिलकुल सोपा नव्हता, प्रत्येक वेळी त्यांना धमक्या यायच्या , जीवे मारण्याच्या संदेशाची त्यांनी परवा केली नाही.
त्यांच्यावर १७ वेळा प्राणघातक हल्ला सुद्धा झालेला आहे, विष देणे , ऍसिड हल्ला अशा घटनांनाही त्या सामोर्या गेल्या.
2019 मध्ये सुनिता कृष्णन आणि त्यांचे पती राजेश यांना "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात कर्मवीर भागातही पाहुणे म्हणून बोलावले गेले होते.
त्यांना अन्य बरेचसे पुरस्कारही मिळाले आहेत.
महत्वाचं म्हणजेव सुनिता कृष्णन सारख्या धीर आणि धाडसी महिला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला विसरून असा न्याय कोणावरती होऊ नये यासाठी प्राण पणाला लावून कार्य करत आहेत. अशा महिला खूप कमी पाहायला मिळतात.
जणूकाही त्यांच्याद्वारे मुक्त झालेल्या किंवा केलेल्या मुली आणि महिला डॉ. सुनिता कृष्णन कडे पाहून आकाशात झेप घेण्याची प्रेरणा घेतात.
अशा गुणी व समाजसेवी लोकांची किमान माहितीतरी आपणा सर्वांना व्हावी व या कार्याचा प्रचार व आदर व्हावा यासाठीच हा लेखन प्रपंच !
धन्यवाद .
धन्यवाद .
लेखिका - ©® स्वाती बालूरकर , सखी.
दिनांक ६. ११ .२२
दिनांक ६. ११ .२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा