Login

स्त्री शिक्षणाचा घाट

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले
शीर्षक:- स्त्री शिक्षणाचा घाट (कविता)

सावित्रीबाई फुलेंनी
शिक्षणाचा घातला घाट
उघडून दिली मुलींना
शाळेसाठी नवी वाट

सारे अपमानाचे घोट
त्यांनी निमूटपणे सहन केले
समाजाचा रोष ओढवून
मुलींना शाळेत हक्काने नेले

विचार आणि व्यक्तिस्वातंत्र्य
ह्यांचे दिले मुलींना धडे
शिकवत असताना लक्ष
देती स्वतः जातीने सर्वांकडे

जोतिबांचे विचार त्यांनी
शेवटपर्यंत कृतीत आणले
स्त्री-विकासाचे महत्त्व
त्यांनी पारतंत्र्यातही जाणले

फुले जोडप्यांनी दिली
महिलांना अमूल्य भेट
त्यासाठीच लढले दोघे
समाजाशी न घाबरता थेट

क्रांतिज्योती म्हणती सारे
स्त्री-जीवनात शिक्षण आले
साक्षरतेचा प्रसार करून
मोठे कार्य त्यांच्या हातून झाले

त्यांची आधुनिक विचासरणी
सर्वांनीच घ्यायला हवी
तरच प्रत्येक मुलगी घेईल
तिच्या आयुष्यात भरारी नवी

© विद्या कुंभार

आज ११ एप्रिल म्हणजेच महात्मा जोतिबा फुले यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

फोटो सौजन्य: साभार गुगल
0

🎭 Series Post

View all