तसं या सगळ्यांना अर्थातच धक्का बसला. न्यायाल्यामधील उपस्थित प्रत्येक व्यक्तीपासून लाईव्ह टेलिकास्ट बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा धक्का बसलेला होता. पण दुर्गाच्या डोळ्यांमध्ये अजिबात पश्चाताप नव्हता.
उलट तिच्या डोळ्यांमधून तिने जे काही केलं आहे त्याबद्दल अर्थातच समाधान दिसत होत.
उलट तिच्या डोळ्यांमधून तिने जे काही केलं आहे त्याबद्दल अर्थातच समाधान दिसत होत.
न्यायालयामध्ये गोंधळ होऊ लागला तस परत शांतता ठेवण्यास सांगण्यात आलं. आणि मग अर्थातच परत दुर्गाला बोलण्याची संधी देण्यात आली. आता फक्त दुर्गा बोलणारं होती आणि बाकीचे सगळे ऐकणारं होते.
"एका मुलीसाठी महत्त्वाची असतात ती म्हणजे तीची स्वप्न आणि त्यासोबतच तिची फॅमिली.दोघांपैकी एकाला जरी धक्का लागला तरी ती मुलगी जिवंतपणीच मरून जाते. जसं माझं झालं.अर्थातचं तुम्ही विसरला नसालचं! पण तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये जसं जसं दिवस पुढे जातात तसं तसं आपण पाठीमागचं विसरत जातो. पण त्यांच्याबाबतीत हे सगळे प्रसंग घडलेले असतात त्यांनी हे सगळं कसं विसरावं? यामध्ये मी फक्त माझी स्वप्नच नाही...तर बाकी सगळ्याच गोष्टी गमावल्यात.
की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
खरंतर आता मी बोलताना प्रत्येकाच्या नजरेमध्ये माझ्याविषयी सहानुभूती दिसते आहे.जस मी मगाशी म्हटलं होतं ते अर्थातचं आता सिद्धं झालेलं आहे.पण जोपर्यंत मी सांगितलं नव्हतं तोपर्यंत मात्र माझ्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये राग दिसत होता.द्वेष दिसत होता. आणि प्रश्न दिसत होते.
पण आता? आता मात्र सगळ्या गोष्टींची जागा सहानुभूतीने घेतलेली आहे. माझ्याबद्दल कळकळ दिसत आहे. काळजी दिसत आहे. पण हीच काळजी जेव्हा मी खून केला हे कळलं. त्या वेळेला बरं नाही घेऊ वाटली? म्हणजे कसं आहे ना..आजकाल जग फक्त आणि फक्त स्वतःच्याच चष्म्यातून बघायचं आहे. माणूस त्याचं चष्म्यातून बघतो जस त्याला पाहायचं असतं.त्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी सिद्धं कराव्या लागतात. सगळ्या गोष्टीचे पुरावे द्यावे लागतातं. नाही का ?" दुर्गाने सगळ्यांकडे पाहत विचारलं.
तसं सगळ्यांच्या माना अर्थातच शरमेने खाली झुकल्या गेल्या. नजर तिच्या नजरेला भिडेलं इतकी हिंमत कोणाच्यातच नव्हती.
"मी सन्माननीय न्यायालयाला विनंती करतो की, ' मिस दुर्गा देशमुख यांनी जो काही गुन्हा आहे किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी बाबत त्यांनी जी काही कबुली दिली आहे.त्याबाबतीतली माहिती द्यावी.'हे असं अवांतर बोलून आपला आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवू नये." सरकारी वकील लगेच उठून उभे राहत म्हणाले. तसं जज साहेबांनी त्यांना थांबायला सांगितलं.आणि दुर्गाला पुन्हा एकदा बोलायची संधी दिली.
आणि आता प्रत्येकाचं लक्ष होतं ते म्हणजे दुर्गाच्या बोलण्याकडे.इतका वेळ तिच्या बोलण्यातून संताप आणि दुःख, हळहळ व्यक्त होत होती. शब्द नॉर्मलच होते.कारण, ती न्यायालयाचा अवमान किंवा अपमान करू इच्छित नव्हती. त्यामुळे ती अगदी व्यवस्थितच बोलत होती.
पण आता खऱ्या कथेला सुरुवात होणार होती.
' द गेम ऑफ हंड्रेड डेज'
"या खेळाची सुरुवात झाली ती म्हणजे अर्थातच महिन्याच्या एक तारखेला.एक तारीख म्हणजे खूप नवीन उत्साह संचारलेला असतो मनात.नाही का? पण ही एक तारीख म्हणजे एक जानेवारी.वर्षाची सुरुवातच होती. आणि अर्थातच आज आहे ती म्हणजे अकरा एप्रिल. बरोबर शंभर दिवसांचा खेळ.नाही का? ' द गेम ऑफ हंड्रेड डेज.' या हंड्रेड डेज मध्ये प्रत्येकाच्या तोंडच मी पाणीच पळवलं होतं मी.नाही का? तर आपण थोडसं भूतकाळात जाऊया.
एक जानेवारीचा दिवस.रात्री बारा वाजताच हा खेळ सुरू झाला होता आणि खबर मात्र सकाळी सहा वाजता लागली."असं म्हणत दुर्गा भूतकाळात हरवली. तिच्यासोबत सगळेच भूतकाळात गेले.आपण पण थोडंसं भूतकाळात जाऊया.
"कसलं भारी वाटतंय.फायनली मनासारखं काहीतरी झाल. इतक्या दिवसांची तहान आज भागणार आहे आणि भूक सुद्धा." असं म्हणत एक माणूस दारूच्या बाटल्यासमोर ठेवून, ग्लास समोर ठेवून सोबतच त्याला लागणारच चकणा म्हणजे आपल्या साध्या सरळ माणसांच्या भाषेमध्ये खारे शेंगदाणे, सोबतच मुगाची डाळ आणि खारी डाळ घेऊन बसला होता. सोबतच पॉपकॉर्न्स ही होते.
इतक्यात त्याने फोन पाहिला. तर इतका वेळची त्याची प्रतीक्षा संपली होती. कारण अर्थातच त्याच्या जिभेची तहान भागवायला ड्रिंक्स असले तरी शरीराची तहान आणि भूक दोन्ही सुद्धा भागवायला त्याला जे हवं होतं ते समोर आलाच होतं.
त्याने दरवाजा उघडला... तर एक तरुणी त्याच्या समोर उभी होती.पण अर्थातच इतर वेळेला अगदी तोकड्या कपड्यात असणारी तरुणी आज मात्र साडीत होती. आणि नाही म्हटलं तरी डोक्यावरून पदर घेतलेला होता.ह्याला इतकी चढलेली होती की अर्थातच ते सगळं त्याला लग्नाच्या पहिल्या रात्री सारखच वाटत होतं. ती मुलगी मात्र फक्त आणि फक्त त्याचं आणि त्याच्या घराचं निरीक्षण करत होती.
"अरे माझी मदनाची अप्सराssss अशी माझ्यापासून दूर का? जवळ ये ना."त्या मुलाने तिच्याकडे पाहून म्हटलं. तसं ती मुलगी अर्थातच ज्या कामासाठी आली होती त्यासाठी हळूहळू चालत त्या मुलाच्या इथे गेली.तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याला दारूची नशा पूर्णतः चढलेली होती. आणि तिच्या सौंदर्याची ही!चेहरा दाखवला नसला तरी सुद्धा तिच्या कमनीय बांध्याकडे पाहून हा पुरता वेडा झाला होता.
त्याच्या डोळ्यात दिसणारी ती वासना धुंद नजरsssss त्याच्या चेहऱ्यावरती जाणवणारी ती हापापलेली वासनाsssss हे सगळं काही ती मुलगी पाहत होती. अर्थात ते सगळं किळसवाणं असलं तरी सुद्धा त्या गोष्टीला काहीच पर्याय नव्हता.ती मुलगी समोर आली. आणि त्याने पटकन तिला आपल्या मांडीवरती बसवून घेतलं. तसं त्या मुलीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.आणि त्याच्या केसात हात घातला. आणि तसाच तो अलगद खाली सरकवत आणला.त्या मुलाला तर अर्थातच एवढ्या कोमल स्पर्शाने वेड लागायचं बाकी होतं.त्याने तिची परवानगी न घेता तिच्यावरती तुटून पडायचा निर्णय घेतला आणि पटकन तिला जवळ ओढून तिच्या मानेवरती ओठ टेकवणार इतक्यातचsssss
इतक्यातच तिने पटकन त्याच्या मानेत बोचकारलं. तेही आपल्या मोठ्या नखांनीsssssआणि सोबतच तिथे इंजेक्शन ही दिल.त्याला काही कळायच्या आतच पुढच्या पाच मिनिटात त्याची बॉडी उडत होती.त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता.आणि त्याने एकदमच गळ्याला हात लावला.पण आता उशीर झाला होता.त्याच्या समोरून पाणी वगैरे सगळं तीने बाजूला ठेवलं होतं.तिने आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला.पण ते पाहून मात्र हा घाबरला. अर्थात त्या इंजेक्शनचा असरं होताचं.
पण इतक्या सहजासहजी ती त्या व्यक्तीला मारणारं नव्हती.बरं का!हालं हालं करून मारणार होती.जिवंतपणीच मरणं यातना काय असतातं?हे दाखवून मग मारणार होती.
पहिल्यांदा त्या मुलीने त्याच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकलं. आणि त्यानंतर हातावरती थोडसं रॉकेल टाकून तिथे काड्यापेटी मधून काडी काढून ती पेटवली. मग ऍसिड फेकलेल्या जागी ती काडी टाकली. आणि त्याचं तोंडही बांधून ठेवलं. सगळीकडूनच मरण यातना होत होत्या. पण बोलायची चोरी होती. कारण बोललं तरी ऐकू जाणारचं नव्हतं.कारण तोंडावरती बांधलेल जे होतं. त्यानंतरं पायावरती ही तिने तशीच सारखीचं प्रोसेस केली. आणि त्यानंतर मग मानेवरती, गळ्यावरती आणि पोटावरती.
आणि असं करतं करतं तिने छोट्या छोट्या ठिकाणी त्याला यातना द्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता थोड्याच वेळात अर्थातच त्याचा खेळ खलासही झाला.
एक जानेवारीला सकाळी सहा वाजता प्रत्येक ठिकाणी हीच न्यूज दाखवली जात होती. अतिशय थंड डोक्याने हा खून करण्यात आलेला होता. आणि तिथे 'डीडी' हे एकच चिन्ह ठेवण्यात आलं होतं. आणि तेही अगदी बरोबर छाती वरती!हृदयाच्या बाजूला..सगळ्यांसाठीच हे न कळण्यासारखं होतं आणि अर्थातच असा विचित्रपणे आणि इतक्या निर्दयीपणे झालेला खून पाहून तपास तर लगेचच सुरू होणार होता. आणि तो झाला सुद्धा होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा