Login

द गेम ऑफ हंड्रेड डेज -भाग १

रहस्याने भरलेली अशी एक रोमांचक कथा....
मुंबई उच्च न्यायालयासमोर पोलीस गाड्यांचा ताफा येऊन उभा राहिला.एक दोन नाही तर तब्बल पाच ते सहा पोलीस गाड्या होत्या. बघ्यांची गर्दी तर बरीच जमली होती. पोलिसांच्या गाड्यांभोवती या लोकांना यायला परवानगी नव्हती. पण न्यायालयासमोर मात्र प्रचंड गर्दी जमली होती हं.


"काय होणार आज नेमकं?"


"कशामुळे घडल्या या घटना?"


"आणि ह्यांचा त्याच्याशी संबंध काय?"


"ह्याला मानसिक विकृती म्हणावी की अजून काही?"


"सुरुवात इतकी भयानक झाली तर आत्ता शेवट  कसा होईल?"


"काय उमटतीलं ह्याचे पडसाद?"


"कोण कोणाला न्याय मिळवून देईल?"


"कोणाचा विजय होईल आणि कोणाला शिक्षा मिळेल?"


"कोण वरचढं ठरेल आणि कोणाला तसच मागे फिरावं लागेल?"

"नक्की कोणामुळे घडलं असेल हे सगळं? किंवा कशामुळे घडलं असेल ?"


"जसं दिसतं तसंच आहे की अजून काही वेगळं आहे?"


"गुन्हा हातात घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात तो गुन्हा घडलाच कसा? आणि का?"


"जे धागे दोरे हाती आलेले आहेत. किंवा जे दिसत आहे... हे सोडून अजून दुसरं काही आहे? की फक्त इतकंच आहे?"


"नक्की काय होईल आत्ता?"


असे अनेक प्रकारचे आवाज तिथे घुमत होते. प्रत्येक न्यूज चॅनेल वर ह्याच लाईव्ह शूटिंग सुरू होतं आणि ते लाईव्ह दाखवलं ही जात होतं. प्रत्येकाच्याच मनात हे प्रश्न होतेच. कोणी बोलून दाखवत होतं, तर कोणी व्यक्त होत होत, किंवा मग कोणी सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या रील्सला लाईक करून किंवा कमेंट करून आपला प्रतिसाद देत होत. कोणी समोर बोलायची हिम्मत करत होतं तर कोणी मनातल्या मनातच या सगळ्या गोष्टीबद्दल विचार मंथन करत होत.


नेमका सगळा प्रकार काय आहे? किंवा हे सगळं का झाला आहे? याची उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली होती. अटल गुन्हेगारांना लाजवेल असा एक गुन्हा घडला होता. आणि तो गुन्हा का घडला होता? याची कल्पना अर्थात कुठल्याच पोलीस यंत्रणेला सुद्धा नव्हती. आणि बाकी कोणालाच नव्हती. प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल ही चुकचुकत होती. सोबतच नाही म्हटलं तरी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होतच होते.


आज तीन महिने दहा दिवस होऊन अकरावा दिवस होता.
अचानक कोणालाही कल्पना नसताना एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या गुन्ह्याची कबुली देत होती. सगळ्यांसाठीच हे सगळं रहस्यमय होतं.कारण, एखादी व्यक्ती एवढे गुन्हे करून त्याची कबुली अशी कशी देईल?


कारण अर्थातच त्या गुन्ह्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा एकही पुरावा पाठीमागे सोडलेला नव्हता. त्याबद्दल तीन महिने दहा  दिवस झाले. म्हणजेच, अकराव्या  दिवशी ती व्यक्ती स्वतःच येते. तेही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये! आणि अगदी रुबाबात आपला गुन्हा कबूल करते. अर्थात याची सुनावणी तिथल्या तिथेच न्यायालयामध्ये व्हायलाच हवी. बातमी  ही अगदी वाऱ्यासारखी पसरली होती. अगदी मोठमोठ्या डिपार्टमेंट पासून ते  मोठमोठ्या पोस्टवरचे पोलीस अधिकारी सोबत जज आणि बाकी सगळेच वकील, मीडियावाले आणि सोबत जनतेमध्येही खळबळ माजलेली होती.


ज्या व्यक्तीने हा गुन्हा केला अशी कबुली दिली होती त्या व्यक्तीला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होत. प्रत्येक गोष्टीचा लाईव्ह टेलिकास्ट ही टीव्ही वरती आणि सोबतच प्रत्येकाच्या मोबाईल वरती दिसतच होता. सगळे अगदी उत्सुकतेने हे सगळं पाहत होते.


अर्थातच वकिलांनी आपलं वकीलपत्र सादर केलं आणि  पुढच्या कार्यवाहीला सुरुवात केली.ज्या व्यक्तीने गुन्हा केला होता त्या व्यक्तीने स्वतःला वकील नको असल्याचा सांगितलं. हा सगळ्यांसाठी आणखीन एक मोठा धक्का होता. सरकारी  वकिलांकडून अर्थातच वकीलपत्र दाखल करण्यात आलेल होतं आणि अर्थातच आता कामकजाला सुरुवात होणार  होती.लगेच सरकारी वकिलांनी थोडक्यात आपल्याबद्दल सांगितलं आणि बाकी त्यांच्या गोष्टींबद्दल ही सांगितलं.


"जज साहेब माझी माननीय कोर्टाला एकचं विनंती आहे की, 'ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं जावं. आणि तसच लवकर निकालही लावण्यात यावा.'अर्थातच आमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहेच.पण; ही माझी नम्र विनंती आहे." सरकारी वकील म्हणाले.तसं सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली.


सगळ्या न्यायालयामध्ये अर्थातच शांतता ठेवण्यास सांगण्यात आलं.आणि त्यानंतर जज साहेबांनी एकदा जमलेल्या गर्दीकडे पाहिलं आणि मग एकदा त्या खून केलेल्या व्यक्तीकडे आणि सोबतच बाकी वकिलांकडे ही.


"तुम्हाला वकील नेमायचा आहे का? अजूनही वेळ गेलेली नाहीये." जज साहेबांनी त्या व्यक्तीकडे पाहून विचारलं.


"जिथे माणूस स्वतः लढण्यासाठी सक्षम होतो तिथे बाकीच्यांची त्याला गरज नसते. कस असतना माणसाला दुसऱ्यांच्या कुबड्यांची सवय लागत केली की त्यांचीच सवय होऊन जाते. आणि ती मला तरी नाहीये. आणि नकोच आहे. त्यामुळे मला या बाकी कोणाचीही गरज नाहीये." त्या व्यक्तीचं उत्तरं आलं.

तसं सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. सरळ सरळ सरळ त्या व्यक्तीने प्रत्येकाला आव्हान दिलेलं होतं. त्या व्यक्तीच्या नजरेत इतकं होऊन सुद्धा अर्थातच भय नव्हतं.फक्त आणि फक्त शांत भाव होते.पण त्या शांत डोळ्यांमागे पाठीमागे कदाचित राग असण्याची शक्यता मात्र होती.


माणूस प्रत्येक वेळेला आपल्याच नजरेतून प्रत्येक गोष्ट बघत असतो.म्हणजे आपण जे चूक म्हणतो किंवा जे बरोबर म्हणतो ते आपल्याच नजरेतून! पण; पुढच्याची बाजू समजून घेतच नाही. प्रत्येक नाण्याला या दोन बाजू असतात.आपण एकच बाजू बघत असतो. आणि ज्यावेळेला दुसरी कळते... त्यावेळेला आपण आपल्या सोयीनुसार ती बाजू निवडतो. आणि हाच समज खोटा ठरवायला ती व्यक्ती आज इथे समोर उभी होती.त्या व्यक्तीला पाहून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का  बसला होताच.पण या दो गेम ऑफ हंड्रेड डेजचे अनेक पैलू आता इथे उलगडणार होते.जे अर्थातच ती व्यक्ती उलगडणार होती.

अर्थातच न्यायालयाच्या कार्यवाहिला सुरुवात झाली होती.  ती व्यक्ती आता काय बोलेल याकडे  सगळ्यांच लक्ष आता लागलेलं होतं.सरकारी वकिलांनी त्यांचं बोलणं झाल्यानंतर अर्थातच न्यायालयाकडून त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. प्रश्न विचारण्याची काही गरजच नव्हती.कारण आता ती व्यक्ती स्वतःच सगळं बोलून आपल्या गुन्ह्याची कबूल देणार होती.


"खरं सांगायचं झालं तर मी जर का इथे आले नसते तर मला पोलीस पकडून देखील शकले नसते.पण गुन्हा केल्यानंतर शिक्षा भोगणे हे माझ्या तत्वात बसत. त्यामुळे मी इथे आले आहे.मला माहिती नाही की कोणा कोणाला हे लक्षात आहे की नाही?पण माझ्या मात्र चांगलाच लक्षात आहे.कारण लोक दुसऱ्यांच्या घरी झाल्यानंतर सगळं काही चार दिवस बोलतात.पण ज्यांच्यात झालेलं असत त्यांना त्याची झळ कायमच बसलेली असते.


खूप जणांनी तर मला ओळखलं नसेलही. कारण जर का ओळखलं असतं तर आताची त्यांची प्रतिक्रिया वेगळी असती. जे लोक माझ्याबद्दल आता इतका वाईट वाईट बोलत आहेत ते लोकं अचानक माझ्या सहनभूतीमध्ये आले असते.पण आता मी माझी खरी ओळख सांगते.


प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुन्हा झाल्यानंतर डीडी हा मार्क दिसलाच असेल... तर डीडी म्हणजे मीच.माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म  होता.तुम्हाला मी हिंट दिली होती पण तुम्ही मला पकडू शकणार नाही हे मला माहिती होतं.पण तरीसुद्धा."तसं सगळ्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं.

"एवढं कळूनही जर का आपल्या पोलिस यंत्रणेला जागच येत नसेल तर.. इतके मोठे गुन्हे झाल्यानंतर ते आरोपीला पकडणार,तरी कसे आहेत?आज मी इथे हजर आहे म्हणून! नाहीतर? माझ मोकाट फिरण साहाजिकच होतं. नाही का? आणि ह्यांच्या डोळ्यात धुळ फेकली असती तरीसुद्धा यांना कळलं नसतं की,' खरा गुन्हेगार कोण आहे?'हीच का आपली पोलीस यंत्रणा?हीच आपली तपासाची दिशा?आणि हाच आपला जागरूक समाज? नाही का?" दुर्गाने प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालेल असा प्रश्न विचारला.


0

🎭 Series Post

View all