Login

द गेम ऑफ हंड्रेड डेज- भाग ३

रहस्याने भरलेली रोमांचक कथा....
त्यानंतर पुढचे वीस दिवस असेच गेले आणि परत एकवीस तारखेला असाच एक खून करण्यात आला. फक्त त्यात फरक इतकाच होता की, गाडी चालवताना अचानक पंक्चरं झाल्यामुळे मध्येच ही गोष्ट घडलेली होती. आणि अर्थातच याची कोणाला भनकही लागली नव्हती.


एका सुनसान रस्त्यावरती एक मध्यमवयीन मुलगा गाडी चालवत असताना अचानकच ती गाडी थांबवून त्याचं चाक पंक्चर करून मग हा खून करण्यात आला होता.
गाडी पंक्चर झाली म्हणून त्या मुलाने गाडी थांबवली. आणि बाजूला पाहिलं तर एक तरुणी मदतीसाठी याचना करत होती.मदत मागत होती. तस त्याने तिला गाडीत बसवलं.


अर्थातच त्या मुलीला भूकं लागली असेल म्हणून याने स्वतः जवळच थोडंसं तिला खायला दिलं. अर्थात तिला एकटीला जाणार नाही म्हणून तिने त्याला विनवणी केली.आणि मग काय? त्याने ते खाल्लं देखीलsssss पण त्याच्या खाण्यामध्ये गुंगीचं औषधं होतं आणि सोबतच नशेचं औषधही होतं.


मुलीला समोर बघून त्याची कामवासना जागृत झाली होती. आणि हे हिला सुद्धा कळलं होतं. तिने पटकन पाठीमागच्या सीट वरती उडी घेतली. तसं तो देखील तिच्या सोबत पाठीमागे गेला. गाडी सूनसान रस्त्यावरती मध्येच लावलेली होती.


ती मुलगी तोकड्या कपड्यांमध्ये होती आणि ह्याच्या डोळ्यांवरती नशा चढलेली होती. इतका वेळ तिने तोंडाला स्कार्फ बांधलेला होता.तो आता तिने काढला. आणि त्याच्याकडे पाहिलं.पण तिला पाहून मात्र याला काहीतरी आठवलं.आणि हा एकदमच घाबरला. पण तिने त्याच्या बोटावरती चाकू ठेवला. आणि त्याचं तोंड गच्चं दाबलं. आणि छोटे छोटे कट द्यायला सुरुवात केली. ती कट होऊ लागली तसं अर्थातच याला वेदना होऊ लागली.


तिने तसेच कट तिथेच राहू दिले. आणि त्यानंतर छोटसं ब्लेड घेऊन त्याच्या ओठावरती खुणा करायला सुरुवात केली. नाकावरतीही खुणा करायला सुरुवात केली आणि परत गळ्यावरती.पण हे करत असताना मात्र तिने त्याचं तोंड दाबून ठेवलं होतं. आणि त्याला बांधूनही ठेवलं होतं. प्रत्येक क्षणी जिवंतपणी मरण यातना काय असतातं? हे तिने त्याला दाखवलं होतं.आणि शेवटी त्याने तिच्याकडे पाहिलं. पण तिला फरक पडणार नव्हता.त्याच्या डोळ्यातं जगण्याची भीक होती. पण तिला त्याकडे पाहायचं नव्हतं. तिने चाकू घेतला आणि शेवटचा वार त्याच्या गळ्यावरती केला .आणि त्याच्याच रक्ताने स्वतःच्या कपाळावरती विजयाचा टिळा लावला आणि ती मुलगी तिथून निघून गेली.


इकडे सकाळी मात्र सगळीकडेच हाहाकार माजला होता. वीस दिवसांनी परत असा विचित्रपने पुन्हा एक खून झालेला होता. आणि तिथे '' हे एकच चिन्हं होतं.

त्यानंतर मधले वीस दिवस असेच गेले आणि अर्थातच परत एक फेब्रुवारीला असा गुन्हा  घडला. यावेळी गुन्ह्याचं ठिकाणं हे अर्थातच ऑफिस होतं..ऑफिसमध्ये येऊन असा गुन्हा करणे अर्थातच सोपं नव्हतं.


सगळ्यांसाठीच हे सगळं धक्कादायक होतं. एक मुलगा तिथे नवीनच कामावर रुजू झाला होता. आणि अर्थात त्याला कामाची खूप गरज होती. आणि तो ते करतही होता. आज ऑफिसमध्ये साहेबांची मीटिंग होती.आणि मग काय सगळी बड दास्तही तशीच ठेवली जाणार होती. पण अचानक मीटिंग कॅन्सल झाली. पण साहेबांना स्वतः मात्र छान पैकी एन्जॉय करायचं होतं.

पण आता बाटली किंवा बाई नको होती. तर फक्त एन्जॉयमेंट हवी होती. म्हणून मग कोल्ड्रिंक्स आणि बाकीच्या गोष्टीही होत्याच. तो मुलगा  आत मध्ये ते घेऊन आला. आणि दार लॉकही झालं. साहेब आपल्याचं जगात दंग असल्यामुळे त्यांना काही कळलच नाही.


त्यांच्यासमोर सगळ्या खायच्या वस्तू ठेवल्या  होत्या. तसं त्या साहेबांनी म्हणजे त्या मध्यमवयीन मुलाने एक एक गोष्ट खायला सुरुवात केली. आणि अचानकच त्याला फिरल्यासारखं वाटू लागलं. आणि असं अर्धा तास होत होतं. पण इतक्यातच त्याच्या समोर त्या मुलाने स्वतःची टोपी काढली आणि स्वतःचे केस मोकळे केले. आणि ह्याला समजले की ती मुलगी आहे.तसं त्याचे डोळेचं मोठे झाले. पण त्या मुलीचा चेहरा बघून ते भीतीने बाहेर येतील की काय? असे झाले झाले होते. आणि पांढरे फटक पडले होते.


ती पटकन पुढे आली आणि तिने त्याच्या गळ्याला आवळलं. आणि हे करता करता कानावरती सुरा खुपसला. आणि सोबतच डोळ्यांच्या बाजूलालाही कटरने खूण करत डीडी लिहिलं. आणि पायाच्या बोटांवरती ही अगदी सराईतपणे  कट्स दिले. आणि अर्थातच त्या खाण्यामधून त्याला विषप्रयोग ही झालाच होता. तो मेला आहे याची खात्री करून ती मुलगी आहे अशी परत बाहेर पडली.


त्याचं दिवशी म्हणजे अर्थातच परत  एक तारखेलाच सगळीकडे तसाच गोंधळ उडाला होता. आत्तापर्यंतचा हा तिसरा खून होता आणि आरोपी मात्र पकडण्यातं यश आलेलं नव्हता.

इकडे यानंतरं अर्थातच सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर वीस फेब्रुवारी आली. पण वीस जानेवारीला जसा खून झाला होता. तसं काही झाला नाही.तसचं सगळं थोडसं शांत होते.सगळे अलर्ट मोडवर होते.


यानंतर एक मार्च ची तारीख ही अशीच निघून गेली. पण आता सगळीकडे रंगपंचमी होती आणि अर्थातच मार्च महिना म्हटलं की रंगांचा सणssssमग तर काही बघायलाच नको.सगळीकडे रंगांची उधळण होत होती. आणि एका खोलीत मात्र रक्ताची रंगपंचमी खेळली जात होती.

हो रक्ताचीच रंगपंचमी! एका खोलीमध्ये एका मुलाला बेडवरती झोपवलं होतं आणि त्याच्या शरीरातून रक्त काढून घेतलं जातं होतं आणि तेही अगदी शांतपणे. पण तो मुलगा हे सगळं पाहून खूपच घाबरलेला होता. अगदी रंगाने माखलेला होता आणि त्यातूनही त्याचा रक्तं काढणं चालू होतं. कारण बरोबर त्याच्या मानेमध्ये आणि हातामध्ये सुई टोचून त्यातून रक्तं काढलं जात होतं. इतकं की त्या त्याला वेदना देतील. कारण रक्तं बाहेर पडताना प्रत्येक थेंबा गणिक त्याला छोट्या छोट्या टाचण्या टोचल्या जातं होत्या. आणि त्यामुळे अर्थातचं त्याला वेदना होत होत्या. पण याची मात्र त्या मुलीला फिकर नव्हती.


त्या मुलाला कळतच नव्हतं की थोड्यावेळापूर्वी आपली प्रेयसी असणारी ती आता आपल्या सोबत इतका क्रूरपणे खेळ खेळू शकते? आणि शेवटी मात्र तिने त्याच्या डोळ्यांवर ती सुई टोचली. आणि त्याचा शेवट केला. म्हणजे अर्थातचं डोळे निकामी केलेच होते. पण हृदयावरती चाकू फिरवायचं ही काम तिने केलं होतं.


आणि अर्थातच मार्च मधला हा सगळ्यात भयानक खून होता.तसं नाही म्हटलं तरी सगळीकडे इतके दिवस शांतता पसरली होती.तिथे अचानक गोंधळ माजलेला होता. आत्तापर्यंत तब्बल चार खून झाले होते.पण तरीसुद्धा पोलिसांना आरोपीला पकडण्यात आलेल नव्हतं. पोलिसांवरती आरोपीला लवकर पकडण्याचं दडपण वाढलं होतं. पण प्रत्येक ठिकाणी डीडी ही एकच खूण दिसतं होती.


आणि झालं.आता अर्थातच गुढीपाडव्याचा दिवस होता. नवीन वर्षाची सुरुवात! आणि आज आणखीन एक खून झाला.तसं सगळीकडेच गडबड गोंधळ माजला.

आणि तोही एका मध्यमवयीन तरुणाचा. गेले चार दिवस त्याला खाण्यातून स्लो पॉईझन देण्यात येत होतं आणि आज त्याचा गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळी खाताना मृत्यू झालेला होता.पण तिथेही डीडी हे चिन्ह होतच आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा जिभेला कट गेलेला होता.
पण अजून सुद्धा कोणालाच त्या व्यक्तीला पकडण्यात यश मिळालेलं नव्हतं आणि कोणाला कळल नव्हतं कि ती मुलगी होती.पण पाच खून मात्र झालेलेच होते.


आज अकरा एप्रिल होती. आणि अर्थातच अजूनही पोलिसांना काळजी ही होतीचं.इतक्यातचं एक मुलगी आपली भारदारं पावलं टाकत आत मध्ये आली. आणि तिने आपली धारदारं नसेल प्रत्येकावरती फिरवली. आणि ती पोलिसांच्या समोर बसली.पोलिसांच्या नजरेत प्रश्न होते

' तू इथे का आली आहेस? कशासाठी?' सगळे प्रश्न असे होते.


0

🎭 Series Post

View all