आणि असं म्हणत दुर्गा बोलायची थांबली. पण तिच्या तोंडून ही सगळी परिस्थिती ऐकून मात्र प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला.
"हे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे अर्थातच
हाहाकार तर माजणारं होताचं.सगळीकडे मोर्चे निघणारं होते.निषेध केला जाणार होता.पण त्या कोवळ्या जीवाला न्याय मिळणार होता का? त्या जीवाच ते अबाधित अस्तित्वं संपुष्टातं आलं होत ते पुन्हा सुरळीतं होणार होतं का? फक्त कँडल लाईट मोर्चे काढून त्या जीवाला न्यायं मिळणार होता का?
हाहाकार तर माजणारं होताचं.सगळीकडे मोर्चे निघणारं होते.निषेध केला जाणार होता.पण त्या कोवळ्या जीवाला न्याय मिळणार होता का? त्या जीवाच ते अबाधित अस्तित्वं संपुष्टातं आलं होत ते पुन्हा सुरळीतं होणार होतं का? फक्त कँडल लाईट मोर्चे काढून त्या जीवाला न्यायं मिळणार होता का?
हे कधीच बदलणार नव्हतं का? फक्त सत्ता,पैसा, राजकारण एवढंच महत्वाचं होत का? ह्या स्वार्थी जगातं...?
ह्यावर निर्बंध बसणार होते का? ह्या परिस्थितीला आळा बसणार होता का? हे हल्ले, ही क्रूरता थांबणार होती का? हे तर येणारी वेळ आणि येणारा काळच ठरवणार होता... आणि तेच झालं." असं म्हणून दुर्गा बोलायची थांबली.
"अहो मॅडम पण तुम्ही इतक सांगितलं पण त्या मुलीशी तुमचा काय संबंध? कोण होती ती मुलगी?" इतक्यात सरकारी वकिलांनी तिच्याकडे पाहून विचारलं.
"अहोsssssअगदी जीवाभावाचं आणि रक्ताचं नातं होत माझं तिच्यासोबत. अजूनही तुम्ही ओळखलेले दिसत नाहीये मला." दुर्गा सगळ्यांकडे पाहत म्हणाली.
"महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला अजूनही ओळखलेलं दिसत नाहीये. दुर्गा देशमुख.... मी कोमल देशमुख हिची सख्खी मोठी बहीण आहे. जिच्या वरती अर्थातच चार महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता."(तिच्या तोंडून हे सगळं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.)
"इतकं आश्चर्यचकितं होण्याची गरज नाहीये आणि बलात्कार झाल्यावर तिचा मृत्यूही झाला होता. तिचीच मोठी बहीण आहे मी. जिला न्याय मिळू शकला नाही तिचीच मोठी बहीण आहे मी." दुर्गा म्हणाली.
"अहो मॅडम मग तुम्ही न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून का नाही हे सगळं केलं? पोलीस कम्प्लेंट करायची होती. बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या आणि न्याय मिळेपर्यंत थांबायचं होतं. स्वतः कायदा हातात घेऊन गुन्हा करण्याची काय गरज होती?" सरकारी वकील तिच्याकडे पाहून म्हणाले.
"अहो गरज कशी नव्हती? माझ्या बहिणीला काय यातना झाल्या होत्या या तुम्ही कोणी समजू शकता? इथे बसलेली स्त्री समजू शकते? कारण जर का एखाद्या मुलाला तुम्ही स्वतःची नजरच बदलायला सांगितली तर हे बलात्कार टळतील. अहो त्या बाजारपेठेतल्या वेश्या बाजार करणाऱ्या वेश्येला आपण नाव ठेवतो. पण त्यांच्यामुळेच आज कितीतरी बलात्कार वाचतात. त्या अमानुषपणे स्वतःवरती हे सगळे अत्याचार सहन करून घेतात.स्वतः दुसऱ्यांच्या नजरेत वाईट होतात पण अनेक तरुणींना वाचवतात....
या एका घटनेमुळे माझ अख्खं आयुष्यं उध्वस्तं झालं. लहान असताना आई वारली. बाबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. अर्थातच मुलीची अशी अवस्था पाहून ते तिथेच कोलमडले आणि त्यांचा जीव गेला. माझं पोलीस भरतीच ट्रेनिंग झालं होतं आणि माझ पोस्टिंग ही होत. पण अर्थातच त्यासाठी मला चार-पाच महिन्याची सुट्टी देण्यात आली होती. खरं तर अजून बाकी सगळ्या ऑफिशियल फॉर्म्युलाटी व्हायच्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना आणि बाकी सगळ्याच गोष्टीमुळे इकडे तिकडे सगळच अस्ताव्यस्त झालं होतं आणि त्यामुळे आमच्या प्रोसिजरलाही वेळच लागत होता. पण मी ज्यावेळेला आनंदात हे सगळं घेऊन आले त्यावेळेला मात्र माझं घर मी समोर कोसळताना पाहिलं होतं अगदी पत्त्यांचा बंगला कोसळावा तसचं.
त्यानंतर माझी खरी ओळख न सांगता दुसऱ्या दिवशी मी पोलीस कम्प्लेंट केली आणि तब्बल महिनाभर मी यासाठी पोलिसांच्या आणि पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करत राहिले. पण माझ्या हाती काय आलं? काहीच नाही आणि शेवटी मी निर्णय घेतला. जर का न्यायव्यवस्था आपल्याला न्याय देत नसेल तर ते आपण स्वतःच करावा लागतं.
मी ठरवलं आणि हे सगळं केलं. पण खून करताना मात्र मी कोमल सारखाच चेहऱ्यावरती फेस मास्क तयार करून तो घालून ह्यांना मारलं होतं त्यामुळेच तर त्यांची एवढी भीतीने गाळण उडाली होती. (आणि हा सगळ्यांसाठी आणखीन एक धक्का होता.सगळेच आश्चर्यचकित झालेले होते.) इथे प्रत्येकालाच आता माझी सहानभूती वाटते. माझ्याबद्दल काळजी वाटते. जज साहेब मला असं म्हणायचं नाहीये की माझी शिक्षा माफ करा वगैरे. मी गुन्हा केलाय मी शिक्षा भोगणारं. कारण तेवढी प्रामाणिक नि कर्तव्यदक्ष आहेच. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझी फॅमिली तर गेलीचं.स्वप्नांची ही राख रांगोळी झाली. माझ्या बहिणीला झालेल्या यातना आणि त्यानंतर मी जो त्रास सोसला.त्याचं काय?त्यामानाने या लोकांना दिलेले मी शिक्षा खूपच कमी आहे.त्यामुळे मला माझ्या गुन्ह्याचा अजिबात पश्चाताप नाही.
नुकतीच अठरा वर्षे झालेली.तारुण्यात आलेली माझी बहीण स्वतःच्या नवीन आयुष्याची स्वप्न पाहत होती. डॉक्टर व्हायचं होतं तिला आणि तिच्यावरती काय ही अशी वेळ? आणि याचा तपास मात्र झालाच नाही. पण इथे अजून तिसरं काही होऊ दे लगेच झालेला आहेच. नाही का ? राजकारण्या सगळ्या गोष्टींमध्ये मला पडायचं नाहीये.पण त्यांचेही मर्डर पद्धतशीरपणे दाबले जातात.
ते म्हणतात ना, ' ज्याच्या खिशात असतो पैका त्याचाच वाजतो कायद्याचा डंका.' असं काहीसं होतं. खरं तर याची खंत वाटते. पण बोलून काही सुद्धा उपयोग नाहीये.म्हणजे आता मी सांगितल्यानंतर मग सगळ्यांना हळहळ वाटते किंवा पश्चाताप होतो आहे.पण ज्यावेळेला हे सगळं झालं त्यावेळेला सावरायला कोणी होतं का? याचा दोष मी कुणालाच देत नाहीये. कारण प्रत्येकाचं एक वैयक्तिकं आयुष्यं असतं. त्यामुळे त्या दखल अंदाजी करण्याचा मला अजिबात काही एक अधिकार नाहीये.
हे सगळं झाल्यानंतर एखाद्या बद्दलं बोलताना, किंवा एखाद्या बद्दलं मत व्यक्त करताना काय वाटतं? हे मी नक्कीच समजू शकते. आणि ते साहजिक आहे. बरं का! पण त्या व्यक्तीची मनस्थिती आणि परिस्थिती ही फक्त त्या व्यक्तीलाचं माहिती असते.
'जरं परिस्थिती बदलता येतं नसेलं तरं मनस्थिती बदला.' अशी वाक्यं फक्त पुस्तकातचं शोभून दिसतात. ती आपल्या जगण्यात कुठेच शोभून दिसत नाहीत.
शिकूनं- सवरून सुद्धा बेरोजगारं असा ठप्पा लागलेला असतो आजकालच्या तरुणाई वरती. आणि मग ही तरुणाई भरकटते. आणि मग अशा मार्गाला लागते. पण इथे ज्यांनी गुन्हा केला ते लोकं मात्र अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित कुटुंबातले होते. आणि अगदी मध्यमवयीन तरुणच होते. मग त्यांच्यावर अशी वेळ का यावी न?विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना.ह्याला मानसिक विकृती म्हणावं? की आणखी काही?
पण जाऊ देतं. मला काही त्या मुद्द्यांवर बोलायचं नाहीये. आणि त्यात पडण्याचा माझा संबंधही नाहीये. किंवा माझा अधिकारही नाहीये. पण हे जे काही झालं ते सगळं असं होतं. आणि त्याचा त्रासही खूपच भयंकर होता. आणि त्याचे पडसाद ही भयानकच उमटले होते. आणि ह्या वरती जितकं बोलावं तितकं कमीच आहे. नाही का?"
(दुर्गा ने तिथे उपस्थित प्रत्येकाकडे पाहत हा प्रश्न केला. आणि सगळ्यांच्या नजरा खाली झुकल्या गेल्या.)
"तस बोलायचं तर खूप आहे पण आता वेळ कमी आहे. नाही का ?आणि शब्दही कमीच पडतील. कारण न्यायव्यवस्था आणि बाकी सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी सुद्धा स्वतःच्या पायाचे जोडे जीझेपर्यंत इथे फेऱ्याच माराव्या लागतात आणि त्यामुळे मला माझ्या चुकीचा अजिबात पश्चाताप नाहीये." दुर्गा म्हणाली तसं सगळ्यांना त्या गोष्टीचा मूळ कारण कळलं. अख्ख्या कोर्टात शांतता पसरलेली होती.
पण तिने सांगितल्याप्रमाणे अर्थातच जज साहेबांनी तिला शिक्षा दिली... मर्डर साठी असणारा मृत्युदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा न देता तिला दहा वर्षांची शिक्षा देण्यात आली. 'समाज हा परिवर्तनशील असतोच पण परिवर्तन आपण घडवण्याची गरज असते....'हीच शिकवण आज दुर्गा ने सगळ्यांना दिलेली होती.'द गेम ऑफ हंड्रेड डेज' हे रहस्य सगळ्यांनाच उलघडलेलं होतं तेही खऱ्या अर्थाने.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा