Login

ध्येयवेडा संघर्ष (Biopic Of Queen)भाग 4.

मयुश्री च्या प्रेमाची चाहुल....

सगळे निघुन गेल्यावर आईने पुन्हा विषयाला हात घातला,गुड्डू केलास का रात्री विचार कधी भेटायच म्हणतेय श्री ला.मयुरी शांत बसुन होती..
ना मयुरीला लग्न करण्यात रस होता ना त्या मुलाला भेटण्यात.पण आईचं टॉर्चर करण काही थांबत नव्हत.रात्री 2 2 वाजे पर्यंत तिला जाग ठेऊन सतत सुनावत राहने की अभ्यास करायचा नाही,शिकायच नाही,लग्न करुन कस सगळ छान संसार करायचा वगेरे....त्याचा इतका मानसिक त्रास मयुरीला होत होता..परंतु अशी कोणतीच समस्या या भूतलावर नाही ना की ज्यावर उपाय नाही....


आईच्या वागण्याला कंटाळून शेवटी मयुरी तयार झाली त्या मुला सोबत फोन वर बोलायला....

दुसर्याच दिवशी आईने तिला फोन दिला हातात तर त्याचा फोन होता आणी आई तिला बोल अस सांगत होती.
मयुरी ने कपाळावर आठ्या आणत मोबाइल घेतला आणी थोडस बोलन करुन ठेवून दिला.

फोनवर बोलन झाल्यावर मयुरी विचारात पडली की हिला एका रात्रीत त्याचा नंबर मिळालाच कसा..

आईशी बोलल्यावर तिला समजल की त्या दोन मुली म्हणजे त्या मुलाच्या बहिनी होत्या..आणी त्यांचा फोन नंबर आईला लग्नात भेटला होता.म्हणजे त्यानीच दिला होता.

आईने अजुन एक गोष्ट तिला क्लियर केली की त्या मुलाने तिला लग्नाच्या दिवशीच पसंत केली होती.लग्न करेल तर हिच्या सोबतच नाही तर लग्नच करनार नाही.

आणी तेव्हा पासुन आई त्या लोकांशी बोलतेय आणी मला त्रास देते हे मयुरिच्या लक्षात आल होत.

असेच थोडे दिवस गेले आणी एक दिवस अचानक श्री मयुरी च्या घरी आला.... अक्षरशः श्री पत्ता विचारत विचारत घरा पर्यंत पोचला.त्याच्या एका मित्रा सोबत.
घरात आल्या आल्या आईला इतका आनंद झाला होता की जस काय तिचा जावई घरी अवतरला आहे.

घाईने तिने मयुरीला बोलवून आणले आणी सांगितले की पाहुणे आलेत बाहेर त्याना चहा टाक मी आलेच मला जरा काम आहे.अस बोलून निघुन गेली.

मयुरी किचन मध्ये गेली तर हा हीरो लगेच तिच्या मागे गेला त्याला वाटल की एकदा फोन वर बोलली याचा अर्थ तिच्या मनात पन काहितरी आहे.
पन कश्याच काय आणी फाटक्यात पाय!!
श्री ने एकदम चेहरा रडवेला केला होता आणी आता अजुन 1 मिनिट जरी तिथ थांबला तर तो खुप रडेल असा झाला होता.
डोक्यात मुंग्या आल्या आणी हाथ पाय गरम झाले त्याचे,कस काय तर आपल्या हीरोइन ने हीरो ला आवाज दिला "दादा "काही हवय का?

अरररर !!

दादा हाक दिली तसा श्री चा चेहरा पार उतरला....त्याचा काळजावर कुणीतरी वार केल्या सारख त्याला वाटले मयुरी चे शब्द.

तिथ एक मिनिट पन न थांबता तो निघाला ते रडतच
कोणती मुलगी होणार्‍या नवर्‍याला दादा बोलेल का सांग ना मला सांग?
रडतच श्री त्याच्या मित्राला विचारतो.

अरे श्री नको रडूस तू इतका सहज बोलून गेली असेल ती.

नाही पन ती आस बोलुच कस शकते?

रडून रडून पोरानी पार गोंधळ घातला होता.2 दिवस पोरग उपाशी झोपल. पन हीरोइन मात्र काय झाल तेव्हा,अश्या आविर्भावात होत्या.कारण श्री ला काय त्रास होतोय हे काय तिला कळन्याचा मार्ग नव्हता.

इकडे होता प्रेमवेडा ज्याला की फक्त मयुरी हवी होती ,
आणी दुसरीकडे होती ध्येयवेडी जिची खुप सारी स्वप्न होती..





ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत लिहिली गेली आहे काल्पनिक नाही....




हा पार्ट खुपच उशिरा आला त्या साठी खरच मनापासून सॉरी....पण वेळ अस औषध आहे ना काही केल्या त्याचा ओवरडोस होतच नाही....दोन मुल सांभाळताना आणी घरातली काम उरकताना वेळ कधी जातो हेच समजत नाही. हे सगळ असतान हा पार्ट कसा बसा लिहिला आहे.प्लीज समजून घ्या....


?राधा सुमित इंगवले 

Thank You ?

0

🎭 Series Post

View all