स्वप्नात दिसणारी गाडी तर कळली होती.. पण ती मुलगी.. आर्या तर नसेल म्हणजे तिच्या बाबांच्याच गाडीने तिचा अपघात होणार आहे.. ती हा विचार करत असते तोच खालून जोरात किंकाळी ऐकू येते.. ती खाली येऊन बघते तर आर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते.. तिला काहीच कळत नाही.. हॉस्पिटलमध्ये नेतात पण डॉक्टर तिला मृत घोषित करतात.. आर्याच्या तेराव्याला शमिकाला रात्री कोणीतरी आपल्याला हाक मारतंय असं वाटतं.. ती वर बघते तर सिलिंगला चिकटून आर्या तिच्याकडे बघत असते.. तिला काहीतरी सांगू पाहत असते..
शमिका जोरात ओरडते.. कोणीच तिच्या मदतीला येत नाही.. तिला कळून चुकतं की आपण आर्याच्या जीवाला धोका आहे, याची पूर्वकल्पना असूनपण नाही वाचवू शकलो.. त्यामुळे आता आर्याचा आत्मा तिला सोडणार नाही..
ती वॉशरूममध्ये जाते.. तिथे तोंडावर पाणी मारते.. समोर आरशावर " मला मदत कर " असं रक्ताने लिहिलेलं असतं..
शमिका आणखी घाबरते.. ती धीर एकवटून काय मदत हवी आहे असं विचारते..
त्यावर तो आत्मा म्हणतो, मला जेव्हा जेव्हा आईबाबांच्या सहवासात राहावंसं वाटेल तेव्हा मी तुझ्या शरीरात प्रवेश करेन..
शमिकाला खूप रडू येतं.. तिची इवलीशी लहान मैत्रीण तिची आज या रूपात मदत मागतेय..
ती हो म्हणते आणि त्यादिवशीपासून सुरु होतो एक नवा खेळ " The Journey of Soul "
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा