Login

प्रेमळ नात्याचा जीव

प्रेम आणि आपुलकी
सर्वांनाच वाटतो हवा
आपुलकीचा स्पर्श
अनुभवता नव्याने 
येतो जीवनात हर्ष

तिरस्कार घेतो सदा
प्रेमळ नात्याचा जीव
दूर गेल्यावर वाटू लागे
दुःखाच्या स्थितीची कीव

एक पाऊल भांडणावेळी
जोडीदाराने मागे घ्यावे
गृहीत न धरता प्रत्येकवेळी
मुक्तपणे नात्यात बागडू द्यावे

प्रगतीच्या आड न येता
दुरूनच प्रोत्साहित करावे
प्रेमात एकदा तरी दोघांनी
प्रेमासाठी खोटे हरावे

© विद्या कुंभार
0

🎭 Series Post

View all