Login

दि लूप होल पर्व २(भाग १७)

This is a thrilled story

       सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि तो  मलूल गोळा  केशरी रंग उधळत होता. अभिज्ञा रूममध्ये आली तर अगम्य गॅलरीत उभा राहून  अस्ताला जाणारा सूर्य निहाळत होता. अभिज्ञा त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली व त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाली.

अभिज्ञा,“ किती चिडशील अमू! इतकी चिडचिड नको करू  ना!”ती समजावत म्हणाली.

अगम्य,“चिडू नको तर काय करू अभी! मी तुला नाही संकटात टाकू शकत तू येणार नाहीस कुठे ही मी एकटाच काय ते पाहून घेईन समजलं!” तो तणतणत म्हणाला.

अभिज्ञा,“ हो हो! तू म्हणशील तसं! पण चिडू नकोस आता आणि  एक महिना लागणार आहे या सगळ्या गोष्टींना आता चल! चहा घे!” ती शांतपणे म्हणाली.

अगम्य,“ अरे वा! माझ्या पेक्षा जास्त चिडणारी माझी बायको आज मला समजावत आहे.” तो मिश्कीलपणे हसून म्हणाला आणि तिला जवळ ओढले.

अभिज्ञा,“ मी कालच म्हणाले ना मी नाही भांडणार आता! बरं चल आता अदू आला असेल माझा! एक तर सकाळी पण तुझ्यामुळे माझ्या बच्चाला स्कुलला नीट घालवू शकले नाही! आता तरी त्याच्या बरोबर टाईम स्पेन्ड करू दे! एक तर तुझ्या तब्बेतीमुळे त्याच्याकडे बरेच दुर्लक्ष झाले आहे!” ती म्हणाली.

अगम्य,“ खरं आहे तुझं त्याच्याकडे माझे ही थोडे दुर्लक्षच झाले आहे आज त्याच्या बरोबर टाईम स्पेन्ड करावा!” तो म्हणाला.

           दोघे ही खाली गेले तर अज्ञांक अगम्यला येऊन बिलगला! त्याचा आणि अगम्यचा खेळ आणि गप्पा रंगल्या!अभिज्ञा रात्रीच्या जेवणाचे काय ते पाहत अहिल्याबाईंशी आज काय काय केलं ऑफिसमध्ये आणि फॅक्टरीमध्ये ते सांगण्यात गुंतली होती.सगळ्यांची जेवण झाली आणि अभीज्ञा अज्ञांकला झोपायला घेऊन गेली.अज्ञांक झोपला आणि अभीज्ञा ही बेडरूममध्ये गेली तर अगम्य तिला झोपलेला दिसला.आज तसं ही त्याची खूप दगदग झाली होती त्यामुळे त्याला थकवा येणे साहजिक होत.अभीज्ञाने त्याला पांघरून घातले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि विचार करू लागली.

               अमू किती  चिडतोस रे! तुला मला काही होऊ नये म्हणून किती काळजी असते. गेल्या दोन वर्षात किती त्रास सहन केलास तू एकट्याने आणि तो कमी की काय म्हणून त्यातून हा गोळीबार! पण आता बास मी नाही तुला एकट्याने काही सहन करू देणार रादर मला तुला आता कोणता ही त्रास होऊच द्यायचा नाही म्हणून तर मघाशी मी तुला ठीक आहे म्हणाले कारण मला ना तुझ्याशी भांडायचे नव्हते.पण याचा अर्थ असा नाही की मी तुला अजून एकदा त्या राक्षसाचा सामना करायला एकट्याला पाठवेन! अजिबात नाही.मी ही तुझ्या बरोबर त्या नीच सूर्यकांतचा सामना करायला येणार आहे.तरी  काल अमावस्या होऊन चार दिवस झाले आज तो नाही येणार तुला छळायला कारण तो आठ दिवस  सलग तुझ्या स्वप्नात नाही येऊ शकत.माझ्या लक्षातच नाही आलं आणि तो नीच सूर्यकांत तुझ्या स्वप्नात आलाच पण इथून पुढे तो तुला त्रास नाही देऊ शकणार कारण मी त्याला तसं नाही करू देणार! इथून पुढे त्याच्या आणि तुझ्यामध्ये मी असेन! Love you! असं म्हणून तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि ती बेडवर तिच्या जागेवर जाऊन झोपली. तिच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने त्याची मात्र झोप चाळवली आणि त्याने डोळे किलकिले करून अभीज्ञाला पाहिले आणि तिला मिठी मारली. अभिज्ञा ही हसून त्याच्या मिठीत अलगद शिरली.

  दुसऱ्या दिवशी अगम्य श्रीरंगपूरला लागून असलेल्या शुगर फॅक्टरीत ड्रायव्हर घेऊन गेला आणि अभीज्ञा पुण्याला ऑफीसमध्ये गेली.ऑफिसचे आणि फॅक्टरीचे  काम आता रेग्युलर करायचे दोघांनी ही ठरवले होते. दुपारी लंच ब्रेकमध्ये दोघे ही ऑफिसमध्ये जेवले आणि संध्याकाळी घरी आले.दोघे फ्रेश होऊन आले आणि ठरल्या प्रमाणे अहिल्याबाईंनी पुढचे सांगायला सुरुवात केली.

अहिल्याबाई,“ बाबांनी सांगितल्या प्रमाणे आपण त्या विशिष्ट कापराच्या साहाय्याने ते पुस्तक शोधू.  त्या आधी आपल्याला अगम्यने गमावलेली त्याची आंतरिक ऊर्जा पुन्हा मिळवावी लागेल आणि त्यासाठी अगम्य तुला रोज न चुकता सप्तचक्र साधना सुरू करावी लागेल. अभी तुला आणि मला रोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागेल. ताई तुम्ही ही सप्तचक्र साधना सुरू करा कारण या वेळी ही अगम्यला आपल्या मदतीची गरज लागणार आहे बाकी विधी आपल्याला त्या वेळेस कराव्या लागतील ज्यावेळेस अगम्य प्रत्यक्ष सूर्यकांतचा सामना करायला जाईल. या सगळ्यासाठी एक महिना लागेल पण आपल्याला ते पुस्तक शोधून काढावे लागेल. त्या पुस्तकातील लूप होल फक्त अमावास्येलाच उघडणार आणि चांगली गोष्ट ही आहे की अमावस्या आत्ताच होऊन गेली आहे त्यामुळे आपल्याला ते पुस्तक शोधून त्या पुस्तकात काय आहे याचा अंदाज बांधता येईल आणि हो बाबा येणार आहेत नाशिकहुन स्वतः तेव्हा ते सांगतील की सूर्यकांतचे अस्तित्व ज्या पेंटींगच्या तुकड्यामुळे आहे तो तुकडा त्या पुस्तकात कोठे आहे! आता महिना भर फक्त प्रत्येक जण आपापले काम करा(अभिज्ञाकडे पाहून) राहुल आणि मीरा कधी येणार आहेत अभिज्ञा?” त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“आऊ राहुल आणि मीरा परवा दिवशी दुपारी येणार आहे  पुण्यात!” ती म्हणाली.

अगम्य,“ राहुल येणार आहे आणि अभी तू मला सांगितले नाहीस!” तो जरा रागाने म्हणाला.

अभिज्ञा, “ अरे तो आज फोन करणार होता तुला आणि मी कामाच्या गडबडीत सांगायचं विसरून गेले!” ती म्हणाली.

अगम्य,“ बरं!”

                   जेवणाची वेळ झाली. सगळे जेवले. अगम्य रूममध्ये जाऊन  त्याचे काम करत बसला तर अभिज्ञा अहिल्याबाईंच्या रूममध्ये अज्ञांकला झोपवत होती. अज्ञांक झोपला आणि अभिज्ञा अहिल्याबाईंना म्हणाली.

अभिज्ञा,“ आऊ मी जाते आता झोपायला!”

अहिल्याबाई,“ जरा थांब अभी मला तुझ्याशी बोलायचे आहे!” त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“ बोला ना आऊ!”

अहिल्याबाई,“ अभी अगम्य म्हणतोय की तो तुला त्याच्या बरोबर कोठे ही येऊ देणार नाही पण खरं तर या वेळी अगम्य सूर्यकांतशी एकटा नाही  लढू शकणार कारण सूर्यकांत गेल्या वेळी पेक्षा  शक्तिशाली झाला आहे आणि अगम्य मात्र क्षीण झाला आहे.पण तो कोणाचेच ऐकायला तयार नाही खूप हेकेखोर आहे तो! मला समजत नाही त्याला कसे समजवावे!” त्या काळजीने बोलत होत्या.

अभिज्ञा,“ तुमची काळजी मी समजू शकते आऊ मला ही त्याची काळजी वाटते पण त्याला भांडत बसण्यात आणि समजावून सांगण्यात ही काही अर्थ नाही हे मला कळून चुकले आहे. कारण तो त्याचा हेका सोडत नाही आणि स्वतःला त्रास करून घेतो म्हणून त्याला काहीच बोलायचे नाही रादर मी त्याला म्हणाले की तू म्हणशील तसं पण ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येईल ना त्या वेळी आपण आपल्या मनाचे करायचे” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ म्हणजे मला समजले नाही?”त्यांनी संभ्रमाने विचारले.

अभिज्ञा,“म्हणजे आऊ आता त्याला काहीच बोलायचे नाही पण जेंव्हा प्रत्यक्ष त्या लूप होलमध्ये जायची वेळ येईल तेंव्हा त्याच्या मागे मी ही जाणार त्या लूप होलमध्ये!” ती ठामपणे म्हणाली.

अहिल्याबाई,“हुंम तर तू असं ठरलं आहेस तर ठीक आहे पण अभी तुला मी स्वार्थी वाटत असेल ना ग! माझ्या मुलासाठी मी तुला ही त्या लूप होलमध्ये ढकलत आहे?” त्या थोड्याशा दुःखी होत म्हणाल्या.

अभिज्ञा,“ काही तरीच काय बोलताय आऊ आहो तुमचा मुलगा माझा नवरा आहे ज्याने मला खूप काही दिले आहे. त्याने कोणतीच दुःखाची झळ माझ्या पर्यंत पोहोचू नये म्हणून  खूप काही सहन केले आऊ! एवढंच काय पण स्वतःचा कसला ही  विचार न करता त्याने माझ्यावर झाडली गेलेली गोळी ही झेलली आहे! त्याच माझ्यावर खूप प्रेम  आहे आणि आता ही तो मी त्याच्या मागे त्या  लूप होलमध्ये येऊन कोणत्याही संकटात अडकू नये म्हणून माझ्याशी भांडत आहे. माझं ही त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याला नाही गमावू शकत मी ही हे सगळं माझ्या स्वार्थासाठीच करत आहे आऊ! तुम्ही उगीच मनात कोणताही किंतु नका आणू!” ती त्यांचा हात हातात घेऊन बोलत होती.

अहिल्याबाई,“ बरं आणखीन एक दोन दिवसांपूर्वीच अमावस्या होऊन गेली अगम्य घाबरून उठला होता का ग?" त्यांनी  काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ हो आऊ ज्या दिवशी तुम्ही हे सगळे सांगितले त्या दिवशी तो घाबरून उठला होता. त्यानंतर नाही उठला!” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ हुंम! हो ऱ्य नंतर नसेल उठला कारण तो नीच सूर्यकांत सलग एकाच व्यक्तीच्या स्वप्नात नाही येऊ शकत पण तो एक दिवस थांबून नक्की अगम्यच्या स्वप्नात येणार बघ तरी अजून अमावस्या होऊन आठ दिवस झाले नाहीत त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव अभिज्ञा” त्या काळजीने म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो आऊ आहे माझ्या लक्षात!  मी जाते आऊ!” ती म्हणाली.

              ती रूममध्ये आली तर अगम्य झोपला होता. तिने  घड्याळ पाहिले तर  अजून अकरा वाजले होते म्हणून मग ती स्वतः पुस्तक वाचत  जागी राहिली आणि अगम्यला तसेच झोपू दिले बरोबर बाराच्या पाच मिनिटं आधी तिने अगम्यला उठवले. 

अभिज्ञा,“ अगम्य उठ ना!” ती त्याला हलवत म्हणाली.

अगम्य,“ काय ग तुझं झोपू दे मला आणि तू ही झोप ना आता!”तो चिडून म्हणाला.

अभिज्ञा,“ तू ना आधी उठून बस आणि डोळे उघड! आऊने काय सांगितले आहे विसरलास का तू?” ती वैतागून त्याच्या हाताला धरून उठवत म्हणाली.

अगम्य,“ काय ग अभी आता तीन वाजे पर्यंत जागायचे का?” तो नाराजीने म्हणाला.

अभिज्ञा,“ जागायचं का म्हणजे? जागावच लागेल! चल आपण स्ट्रॉंग कॉफी करून पिऊ म्हणजे तुझी ही झोप जाईल!” ती म्हणाली

अगम्य,“ तू करून घेऊन ये ना जा!” तो तोंड वाकड करत म्हणाला.

अभिज्ञा,“ तू जा मी झोपतो म्हणावं! असा कसा रे तू लहान मुलाच्या वर वागतेस!” आता ती चिडून बोलत होती.

अगम्य,“ बरं चल बाई येतो मी आणि नाही झोपत मग तर झालं!” तिला चिडलेली पाहून तो म्हणाला.

        अभिज्ञाने कॉपी केली दोघांनी ही कॉपी पिली आणि दोघे ही तीन वाजे पर्यंत हॉलमध्ये गप्पा मारत बसले. त्या नंतर झोपले. मधला एक दिवस असाच निघून गेला.दोघांचे ऑफिस फॅक्टरी आणि त्यातून अगम्य,अहिल्याबाई आणि अभिज्ञाच्या आईची सप्तचक्र साधना सुरू झाली. तसेच अभिज्ञा आणि अहिल्याबाईंनी महामृत्युंजय मंत्राचा जप ही सुरू केला. 

       आज राहुल आणि मीरा दुपारी येणार होते त्यामुळे सगळेच खुश होते त्यात अगम्य जरा जास्तच खुश होता कारण त्याचा मित्र जो त्याला भावा पेक्षा ही प्रिय होता तो येणार होता. अगम्यने त्याचे निम्मे आयुष्य आणि सुख-दुःख ज्याच्या बरोबर घालवले होते तो राहुल आज त्याला बऱ्याच दिवसांनी भेटणार होता. तो सकाळी फॅक्टरीमध्ये गेला आणि तिथून सरळ पुण्याच्या  एअरपोर्टवर पोहोचला. राहुलने अगम्यला विमान तळाच्या बाहेर पाहिले आणि  त्याला घट्ट मिठी मारली. 

राहुल,“ अम्या कसा आहेस रे? तुझी तब्बेत ठीक आहे ना?मला खूप वाटत होतं रे तू हॉस्पिटलमध्ये होता तेंव्हा यावं पण नाही जमलं बघ!” तो काळजीने अगम्यला निहाळत डोळ्यात पाणी आणून बोलत होता.

अगम्य,“ बघ तुझ्या समोर उभा आहे! अगदी ठणठणीत! आणि माहीत आहे मला की मीराच्या तब्बेतीमुळे नाही येऊ शकला तू!” तो मीराकडे पाहत म्हणाला.

मीरा,“आता दोघे इथेच बोलत बसणार की घरी ही चलणार आहात!” ती हसून  बाळ सावरत म्हणाली.

अगम्य,“ मीरा पाहू तरी दे की बाहुलीला कुणा सारखी झाली आहे राहुल्या सारखी का तुझ्या सारखी आणि नाव काय ठेवलं रे राहुल्या?” तो बाळाला घेत बोलला.

राहुल,“ आता कुणा सारखी  आहे ते तूच ठरव आणि हीच नाव ना तिची  अभी आतु ठेवणार आहे!बरं चला आता!" तो असं म्हणाला 

 अगम्यने बाळाला मीरकडे दिले आणि तिघे ही श्रीरंगपूरला निघाले.

सूर्यकांत अशा कोणत्या पुस्तकात जाऊन बसला असेल? अभिज्ञा अगम्य बरोबर लूप होल मध्ये जाऊ शकेल का? राहुल आणि मीराच्या एन्ट्रीमुळे आता आणखीन नवीन काय घडणार होते?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule







 






 

            

  





 

        

🎭 Series Post

View all