शब्दांनी शब्दांची गुंफण केली तर कविता,
शब्दांची शब्दांशी मैत्री म्हणजे कथा,
शब्दांशी शब्दांचे नाते असते स्तोत्र,
शब्दांनी शब्दांशी हितगुज म्हणजे अभंग,
शब्दांची शब्दांनी ओवाळणी म्हणजे भूपाळी,
शब्दांनी शब्दांची आरती असते ओवी,
आणि शब्द जेव्हा शब्दांच्या हातात हात घालून चालतात दीर्घ पायवाट तेव्हा ती असते नांदी कादंबरीची.
शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह, शब्द सोसला तर सांत्वन, झेलला तर आज्ञा आणि टाकला तर वजनदार.
हळवी असतात मनी जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली जातात.
शब्दांचे शब्दांशी शब्दशः शब्दातीत नाते असावे.
शब्द संभारे बोलिये शब्द के हाथ न पाव
एक शब्द करे औषधी एक शब्द करे घाव
शब्द तुझा शब्द माझा सुते ओवु शब्द मोती -माणके
सेतू बांधूया विचारांचा जोडू माणसे मनीचे
मनातलं सारच शब्दात
मी सांगा कसं मांडावं?
काही समजून त्यांनं घ्यावं,
अन मी हळूच मन उघडत जावं
(सदर लिखान हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)
(मंडळी तुम्हाला माझं लिखाण कसं वाटते त्या करिता तुमचे अभिप्राय आणि मत नक्की नोंदवा आणि तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत..........)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा