"आठवण"! चार शब्दांचा एक शब्द समूह, हृदयाच्या साऱ्या नाजूक धाग्यांची वीण आहे ह्या शब्दात. "आठवण", खरंच आयुष्यात आठवणीच नसत्या तर? तेही असंच झालं असतं कोर, रंगहीन, निस्तेज , उदास , रटाळ, कंटाळवाणं. एक "आठवण" हा शब्द मनाचा गुंता किती वाढवतो नाही ! आणि सोडवतो ही!!
अपयशात आलेली यशाची आठवण लढण्याचं नवं बळ देऊन जाते . प्रेमात प्रियकराची आठवण प्रेयसीला शृंगार करायला लावते , कलत्या वयात तारुण्याची आठवण नवीन उत्साह देते.
आणि मग आठवतात कॉलेजचे ते सोनेरी दिवस, गप्पांचा कट्टा, गॅदरींग ची धमाल , NSS कॅम्प मधल्या गमती जमती , परीक्षेच्या काळातली नोट्स साठी ची धावपळ, आजही आपल्या जुन्या कॉलेजच्या समोरून गेल्यावर या आठवणी अंगावर मोरपीस फीरवतात, अन् डोळ्यांच्या कडांवर अलगद अश्रू ठेवून जातात.
काळ सरतो आपणही मग भूतकाळ मागे टाकून वर्तमानात नव्या दमानं, नव्या जोमानं काम करायला लागतो . नोकरीसाठी ची पहिली परीक्षा ,पहिला इंटरव्यू, कामाचा पहिला दिवस आणि महिन्याच्या शेवटी मिळणारा पहिला पगार या आठवणी ही मनात रोमांच उभे करतात!, आणि एकदम आठवण होते ती पहिल्या नजर भेटीची. आपल्या कामाच्या व्यापात आपल्याला बघणार, आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही .मग कामाचाच माध्यमातून वाढलेल्या ओळखी, झालेली आवडी -निवडी यांची देवाणघेवाण आणि मिळालेला सहवास सार्याच आठवणी. जणू एखाद्या तलावात, भर ग्रीष्मात झालेली पिवळ्या पानांची गर्दी , तशी या आठवणींची काळजात झालेली गर्दी , भावनांचा अखंड गलबला.
प्रेमाचा वसंत ओसरल्यावर , वारंवार दाटून येणाऱ्या, डोळ्यातून झरणाऱ्या आठवणी , त्यांनं एकट सोडून दिल्यावर , त्याच्या आठवणींसह एकटं जगण्याची बोच घेऊन येणाऱ्या आठवणी.
सुखदुःखाच्या ,सहवासाच्या ,प्रेमाच्या, भांडणांच्या, कुजबुजणाऱ्या, मध्येच शांत राहणाऱ्या, अश्रूं प्रमाणे झरणार्या तर , कधी स्मृतीतून उमलणाऱ्या, एकत्र येण्याच्या , विरहाच्या आणि आता फक्त उरलेल्या त्याच्या आठवणी .भावनांच्या जंगलातल्या रानफुलांच्या वेली म्हणजे आठवणी! सागराच्या लाटा म्हणजे आठवणी !!. गाण्याच्या सुरेल सुरातून ,चित्रकाराच्या कुंचल्यातून डोकावणाऱ्या आठवणी!!! आठवणी आणि फक्त आठवणी ,त्याच्या आणि फक्त त्याच्याच आठवणी!!!!
किस किस को बताये हम जुदाई का सबब
मेरे लिये नही तो जमाने के लिये आ
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ, तु फिरते मुझे छोड जाने के लिये आ.....
(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने हे शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)
(प्रिय वाचक हो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फोलो करा तुमच्या अमूल्य कमेंट्स आणि अभिप्राय याच्या प्रतीक्षेत)