Login

गोड क्षणांची साठवण

क्षण गोड
शीर्षक: गोड क्षणांची साठवण

चढला तुझ्या गालावर
गुलाबाचा रंग
तुलाच पाहण्यात
झालो बघ मी दंग

सोडवू साथीने आपण
संसाराची कोडी
त्यासाठीच लागे
साथ आपली थोडी

जोडताना मन
विश्वास ठेव जरा
रागवण्याची बदल
तुझी असली तऱ्हा

गोड क्षणांची
केली मी साठवण
रिकाम्यावेळी निघे
त्यांचीच आठवण

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all