मन हे बावरे (भाग 1)

मराठी प्रेम कथा मन हे बावरे
रिक्षा रिक्षा ती गेल्या दहा मिनिटात पासुन वेड्या सारखी रिक्षा थांबवत होती पण एक ही रिक्षा थांबायचं नाव घेत नव्हती आणि या क्षणी तिला प्रचंड राग आला होता कारण अर्ध्या तासात ती जर ऑफिस ला पोहचली नाही तर तिचा तो खडुस बाॅस तिला जाॅब वरुन काढणार हे निश्चित होत ती विचार करत होतीच तितक्यात समोरुन अजुन एक रिक्षा येताना दिसली तशी ती जाऊन समोरच उभी राहिली तस त्या रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली....

ओ मॅडम पागल वैगेरे झालात की काय मरायची फार घाई झालेली दिसतेय तो रिक्षा वाला ओरडत म्हणाला तशी ती पळतच रिक्षा समोर आली , दादा त्याच काय आहे ना मला वीस मिनिटात फाळके रोडवर पोहचायचे आहे मला खूप उशीर झाला आहे आज ऑफिसला आणि जर मी वीस मिनिटात नाही पोहचली तर माझा जाॅब आज गेलाच हे निश्चित ती तुम्ही मला लवकर सोडा ना तिथे कोणीच रिक्षा थांबवत नाही ती बोलली ....

अहो मग इतकं लेट होत माहित असताना ही तुम्ही उशीरा निघालात का लवकर निघायच ना मग असं होणारच नाही रिक्षा वाला वैतागून म्हणाला, त्याच काय आहे ना दादा मी लवकरच निघाले होते पण रिक्षा थांबतच नाहीयेत ती म्हणाली....

बरं बरं बसा मी सोडतो तुम्हाला तो रिक्षा वाला म्हणाला तशी ती खुश होऊन रिक्षात बसली , दादा अगदी देवा सारखे धाऊन आलात ओ तुम्ही खरंच थॅंक्यु ती म्हणाली पण रिक्षा वाला गप्प रिक्षा चालवत होता दहा मिनिटात त्याने रिक्षा थांबवली तशी ती उतरली आणि पैसे देऊन पळतच एका भल्यामोठ्या इमारती समोर आली ....

तिने वर पाहिले तर समोर त्या कंपनीचा मोठा बोर्ड नावाप्रमाणेच चमकत होता Imandar group and companies तिने नाव वाचल आणि पळतच आत आली आणि तिच कार्ड स्विप करुन पळतच आत आली टाइम बघितला बरोबर पाच मिनिट होती अर्ध्या तासाला तिच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरल , मिस्टर अकडु सडु आज मी लवकर आली आता बघुच तुम्ही मला कसे ओरडता ती मनाच स्वतःशी म्हणाली आणि आपल्या डेस्क वर बसली .....


🎭 Series Post

View all