लैंगिक शिक्षणाची गरज सर्वांत महत्वाची
ज्ञानाची दीपमाला दाखवी दिशा प्रकाशाची
ज्ञानाची दीपमाला दाखवी दिशा प्रकाशाची
शारीरिक बदल आणि आकलन भावनांचे
सर्वसामान्य माहिती पूरवा हीत होईल समाजाचे
सर्वसामान्य माहिती पूरवा हीत होईल समाजाचे
वयाच्या वाढत्या काळात येणारे बदल,
शारीरिक व भावनिक विचारांचा गोंधळ
शारीरिक व भावनिक विचारांचा गोंधळ
कसलीही लज्जा नाही, शिकण्याची वेळ आहे,
विज्ञानाचे शिक्षण जीवनात बळकटीचे एक अंश आहे।
विज्ञानाचे शिक्षण जीवनात बळकटीचे एक अंश आहे।
सुरक्षिततेच्या उपायांचे महत्व अनमोल
सर्वसमावेशक माहितीने विचार करा सखोल
सर्वसमावेशक माहितीने विचार करा सखोल
सम्पूर्ण शरीराला समजून घेणे आवश्यक आहे
प्रेमाचे आधाराने सुरक्षित नवी पिढी राहे
प्रेमाचे आधाराने सुरक्षित नवी पिढी राहे
समाजातील वर्ज्यर्नांचे आव्हान समजावी
प्रसिद्धी आणि मिथकांची गोडी दूर करावी,
सहमतीचा मूलभूत तत्व जपणे,
व्यक्तीच्या अधिकाराचा आदर राखणे।
संबंधांच्या विवेकी दृष्टिकोनाची गती,
भावनात्मक आणि शारीरिक दृष्टीने सुसंगती,
भावनात्मक आणि शारीरिक दृष्टीने सुसंगती,
आपल्या आणि दुसऱ्याच्या भावनांची समज,
लैंगिक शिक्षण नाकारून होईल गैरसमज
लैंगिक शिक्षण नाकारून होईल गैरसमज
स्वतंत्रपणे समजून घेणे व स्वीकृती,
वयाच्या परिपक्वतेसाठी सुरक्षितता व सहमती,
वयाच्या परिपक्वतेसाठी सुरक्षितता व सहमती,
लैंगिक शिक्षणामुळे लोकशाही समाजात,
सामाजिक जीवनात व्हावे परिवर्तन मनामनात ।
सामाजिक जीवनात व्हावे परिवर्तन मनामनात ।
शिक्षणाच्या या गडद मार्गावर, ज्ञानाच्या दीपाने अंधकारात प्रकाश देणे,
लैंगिक शिक्षणाचा महत्व समजून पाल्यास द्यावे संस्कार लेणे
लैंगिक शिक्षणाचा महत्व समजून पाल्यास द्यावे संस्कार लेणे
सर्वांमध्ये जागरूकता आणुनी सुरक्षिततेला वाव देणे।
लैंगिक शिक्षण म्हणजे समाज व्यवस्था बळकट करणे
लैंगिक शिक्षण म्हणजे समाज व्यवस्था बळकट करणे
सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-जान्हवी साळवे
-जान्हवी साळवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा