शीर्षक - घरटे
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
खिडकीत कबूतर दिसलं आणि वीणा जोरात किंचाळली. तिचा तो ओरडलेला आवाज ऐकून वंशीधर पळतच आला.
" का ग ,काय झालं ?का ओरडलीस?"
तिने खिडकीकडे बोट दाखवलं वंशी तिकडे वळून पाहीपर्यंत कबूतर उडून जात होतं.
तिने खिडकीकडे बोट दाखवलं वंशी तिकडे वळून पाहीपर्यंत कबूतर उडून जात होतं.
"अगं ,खिडकीत कबूतर होतं, पारवा .वाघोबा नव्हता काही. इतकं काय घाबरतेस ?"
तिची भीतीने झालेली अवस्था आणि तिला आलेला घाम पाहता त्याने तिला धीर दिला," वीणा ,तू शांत हो आधी, शांत हो. काय झालं, पुन्हा सांग. आधी पाणी पी."
तिला पाणी दिलं आणि आराम करायला सांगितला.
तिला पाणी दिलं आणि आराम करायला सांगितला.
तिने पटकन वंशीचा हात धरला आणि म्हणाली ," अगोदर बाल्कनीला जाळी लावून घ्या, सांगितलं होतं ना तुम्हाला. खिडकीला पण जाळी लावायची."
" अग हो फेब्रिकेशन वाल्याला ऑर्डर दिली आहे पण अपार्टमेंट मध्ये सगळ्या फ्लॅटला एकदाच लावतात ना. आपलं वेगळं कसं लावतील?"
" ते काही मला माहित नाही, अगदी बारीक जाळी लावा अगदी बारीक. त्यातून कुठलाच पक्षी आत आला नाही पाहिजे ."
"ओके ठीक. तू आता आराम कर."
लहानपणी वीणाला कबूतर आणि पारवे खूप आवडायचे, चिमण्या, मैना सुद्धा आवडायच्या पण पांढरा कबूतर विशेष आवडायचं कारण तिने ऐकलं होतं की जुन्याकाळी लोकांची पत्रं किंवा निरोप ही कबुतरे पोचवायची. त्यामुळे त्याला पाहण्यात तिला कुतूहल वाटायचं आणि नंतर तिला खूप ठिकाणी पारवे दिसायला लागले. पारव्याच्या मानेवरची इंद्रधनुषी पट्टी तिला छान वाटायची. कुठेही कबूतर किंवा पारवे दिसले किती त्यांना पहात बसायची पण आता त्याच कबुतरांची तिला आता भीती . . . भीती काय दहशत बसली होती. त्याला तशा घटना देखील कारणीभूत होत्या.
कबुतराच्या आठवणीने तिचं मन भूतकाळात गेलं. ती कळत्या वयात आली आणि तिचं लग्न झालं .
लग्न झाल्यानंतर सासरी गावाकडे नवीन नवरी गावातल्या घरातच आली. नेमकी त्यावेळी नवऱ्याची लागलेली नोकरी त्याच्या गावातच होती. त्यामुळे ते सोयिस्कर होतं.
सासरची आर्थिक परिस्थिती माहेरपेक्षा बरीच चांगले होते त्यामुळे त्या गावातही ती आनंदाने राहत होती.

गावातलं त्यांचं वडिलोपार्जित घर खूप सुंदर होतं, सहा-सात खोल्या होत्या, मागच्या बाजूला एक ओसरी होती. एका बाजूला अडगळीची खोली, वर कौल टाकलेली होती. मागचं अंगण, पुढचं मोठं अंगण , समोर मोठं कडू लिंबाचं झाड ! अगदी मनात हवं तसं घर मिळालं होतं. लवकरच वीणा त्या घरात रमली, घरात वीणा , तिचा नवरा वंशीधर, सासू, सासरे आणि चुलत दीर व जाऊ बाई असा त्यांचा परिवार . . एकत्र खेळीमेळीने रहात होता.
तिचे चुलत दीर स्वभावाने शांत असले तरी जाऊ मात्र थोडी बोलकी, लाघवी आणि बोलून चालून चांगली होती. त्यांना काही मूल बाळ नव्हतं. घरातले सगळे जण हसत खेळत राहायचे.
लग्न झाल्यानंतर एक सहा महिन्यांनी मागच्या अडगळीच्या खोलीत एक दिवस एक पारवा आला, लहानपणीप्रमाणे वीणाला त्या कबुतराला पाहून खूप आनंद झाला. त्याच्यामागे अजून एक कबुतर आले. मग सारखीच ती कबुतराची जोडी मागच्या अंगणात घिरट्या घालायला लागली.
आठवड्याभरात वीणाच्या लक्षात आलं की आडगळीच्या खोलात असलेल्या खोक्यांमध्ये आणि बादलीच्या मध्ये जी जागा आहे तिथे सतत ही कबुतराची जोडी जाते आणि काहीतरी ठेवून येते. कुतूहलापोटी तिने जाऊन पाहिले. वाळलेल्या गवताच्या काड्या, लिंबाच्या, बाभळीच्या काड्या, कपड्यांचे धागे, दोरे, कापूस काय काय आणून ते घरटे बांधत होते. कुठल्याही पक्षाचे घरटे बांधताना पाहिलं की माणसाला आनंद होतो की कसे ते काडी काडी करून स्वतःचं घर पक्षी बनवतात आणि ते घरटे जेव्हा बनवत असतात तेव्हा ते येणाऱ्या बाळांसाठी बनवत असतात. सहसा पक्षी हे अंडे देण्यापूर्वीच घर बनवतात.

काही दिवसांनी तिने पाहिलं तर घरटे पूर्ण तयार झालं होतं. आणि आता तो एकटाच कबूतर उडून जात होता, तो नर पक्षी असावा. कबुतरी तिथेच बसलेली होती, बहुतेक तिने अंडी दिली असावीत. आपल्या बाळाला सोडून कुठे जायचं नाही . . ही मातृत्वाची भावना सगळ्याच पक्षी आणि प्राण्यात असते. ही खरंच किती छान भावना वाटली होती तिला.
कबुतराने अंडे दिलेल्या पाहून विणाला का कोण जाणे पण खूप आनंद झाला. ती घरात आल्यानंतर काही महिन्यातच असं पारव्याने घरात अंडे देणं तिच्या मनाला शुभ संकेत वाटला .
कबुतराने अंडे दिलेल्या पाहून विणाला का कोण जाणे पण खूप आनंद झाला. ती घरात आल्यानंतर काही महिन्यातच असं पारव्याने घरात अंडे देणं तिच्या मनाला शुभ संकेत वाटला .
क्रमशः
©® स्वाती बालूरकर,सखी
दिनांक २५.०८.२५
दिनांक २५.०८.२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा