Login

घरटे - (भाग २)

Emotionally Connected Nest
शीर्षक घरटे (भाग २)
लेखिका. स्वाती बालूरकर, सखी


हळूहळू दिवस जात होते, एक दिवस तिने पाहिलं की अंड्यातून पिल्ले बाहेर निघाले होते. अगदी मासाचे गोळे. त्यांचे डोळे सुद्धा उघडलेले नव्हते. मासाच्या गोळ्यावरती कोणीतरी कापूस लावतात तसा तो पिवळसर विचित्र रंग. रोज कबूतर उडून गेल्यानंतर ती लांबून त्या पिलांना पाहायची. रोजच्या रोजच्या पिलांमध्ये खूप बदल होत गेले. हळूहळू त्यांना पंख यायला लागले. त्यांचे शरीर पिसानी झाकलं गेलं. मग ते पिले तिथेच आरडाओरडा करायचे.

पण यादरम्यान कबुतराच्या विष्ठेचा खूपच घाण वास यायला लागला. त्या पिलांना त्रास नको म्हणून तिने त्या साईडची साफ सफाई करणं सोडून दिलं होतं. एकदा का ही पिल्लं उडून गेली की मग साफसफाई करू हा तिचा विचार होता.
आता ती पिल्ले घरात, अंगणात भरपूर उडायला लागली. परसातल्या झाडावर बसायला लागली आणि एक दिवस दोन्ही पिल्ले उडून गेले. आता वीणाने स्वच्छता करायची ठरवली. जेव्हा तिने सफाईसाठी सगळं काढलं तेव्हा त्या वासामुळे आणि त्या घाणीमुळे तिला मळमळ झाली आणि दोन दिवस उलट्या होत राहिल्या. ती वास तिच्या नाकात बसला . घरात तिच्या सासूला वाटलं काहीतरी आनंदाचीच बातमी आहे आणि जाऊ मात्र अगदी हेव्याने पहात होती.

त्यानंतर इतकी घाण होणार असेल तर घरात ही पिल्लं नको म्हणून तिने पारव्यांना येऊ द्यायचं नाही असे ठरवले.

मध्यंतरी आठ दिवस ती तिच्या माहेरी गेली होती ,परत आल्यावर पाहते तर पुन्हा कबुतराच्या जोडीने तसंच घरटं तिथे बनवायला सुरुवात केली. उचलून काढून टाकाव तर स्वभाव तिचा भावनिक होता . कुणाचे घर कसे मोडणार? इतक्या मेहनतीने त्या पक्षांनी बनवलाय ! म्हणून तिने दुर्लक्ष केलं .पुन्हा तीच सगळी प्रक्रिया सुरू झाली .पुन्हा त्या कबुतरीने अंडे दिले, मग त्याचे पिल्लं बाहेर आले. अंडे दिले त्याच वेळी तिला वाटलं होतं , त्यांचं घरटं बाहेर नेऊन ठेवावे पण आपण हात लावल्यावर ती पक्षी पण अंड्यांना उबवत नाही हे तिने ऐकलं होतं. त्यामुळे यावेळी तिने ठरवलं की आता यावेळी पिल्ले गेले की आता त्यांना अंगणात घर बांधू द्यायचं नाही.

नेमकी त्याच दरम्यान तिच्या सासूबाईंची तब्येत एकदम बिघडली. आठवडाभर त्यांना शहराच्या दवाखान्यात ठेवावे लागले. श्वासाचा खूप जास्त त्रास होत होता . सुप्त असलेला अस्थमा वाढला होता .
डॉक्ट रानी विचारलं की घरामध्ये काही धूळ, केमिकल किंवा पाळीव प्राणी पक्षी काही आहेत का? "
ती म्हणाली," पाळीव नाही ,पण पक्षी येतात."

" कुठले पक्षी? कीटक वगैरे घरामध्ये येतात का?"

ती जेव्हा म्हणाली की आमच्या अडगळीच्या खोलीत अंगणात कबूतर आहेत.
डॉक्टर म्हणाले," त्यांचा संपर्क टाळा ! कारण कबुतरांच्या पंखामधून कधी कधी इन्फेक्शन येत असते शिवाय त्यांची विष्ठा आणि वासाने खूप जणांना श्वासाचा वगैरे त्रास होतो.

तिने ठरवलं की परत गेल्यानंतर त्यांना पुन्हा येऊ द्यायचं नाही. आता सासूबाईंना वेगळ्या खोलीत ठेवलं.
पिल्ले अजून लहान होते, त्यांना कसं बाहेर काढायचं तिला कळत नव्हतं.
त्यावेळी तिच्या सासूबाईंना भेटण्यासाठी जाऊ बाईची आई आली. तिने ते कबूतर पाहिलं आणि ते आपल्या मुलीला रागवायला लागली ," रमे,त्यांना घरात कशाला घुसू दिलं, ते तुला घरातून काढून टाकतील ."

जाऊ म्हणाली ," आम्ही काही कबूतर पाळलं नाही, त्यांनीच घरटं बांधलं."

"अग तुला कळायला पाहिजे, आधीच दोघींना लेकरू बाळ नाही, घरात म्हातारे माणस आहेत. कबूतर येऊच कसं दिलं. . . मी सांगते हे कबूतर तुला घरातून पळवून लावल काळजी घे."

आणि तिच्या जाऊबाई सारखे तिला म्हणायला लागली," वीणा कबुतराचे घरटे काढून टाक, तू लाड केलाs म्हणून त्या कबुतरांनी ते घर बनवलं माझी आई सांगून गेली आहे, कबूतर भग्न वा स्तूत राहतात, घुमटामध्ये राहतात."

" अहो ताई , ते एकदा पिल्ले थोडीशी उडायला लागली की आपण त्यांना नाही राहू द्यायचे."
नेमके पुढच्या आठवड्यात तिच्या नवऱ्याची बदली शहरात झाली. तिची तिकडे जाण्याची इच्छा नव्हती पण सासूबाईंच्या ट्रीट मेंट साठी आणि नवऱ्याचे जेवणाची हाल होऊ नये म्हणून तीला शहरात जावं लागलं. अगोदर नवरा-बायको दोघे पुढे गेले .

भाड्याचं घर पाहिला, सामान लावलं आणि नेमका जावेचा फोन आला," बाबांना अटॅक आला आहे आणि ते सिरीयस आहेत.

धावत पळत घरी पोहोचले. जाईपर्यंत बाबांची शेवटची भेट झाली नाही. डॉक्टरला घरी बोलावलं होतं आणि त्यांनी हार्ट अटॅक ने बाबा गेले असं सांगितलं. हा धक्का वंशीधर साठी खूप वाईट होता कारण वडिलांची तब्येत इतकी चांगली होती, त्यांना औषध गोळ्या काहीच नव्हत्या. बीपीचा त्रास आहे नव्हता, असा अटक कसा आला तेच कळेना.
शिवाय सगळे शेताचे व्यवहार वडीलच पाहत होते.

ते म्हणाले होते की "मी तुझ्या हाती सगळ देईना वंशी तुला निवांत वेळ असेल तेव्हा सांग."
त्याला कधी निवांतपणा मिळालाच नाही.
तो धाय मोकलून रडू लागला. वडील गेले .वडिलांचे क्रिया कर्म झालं. सामान बांधून घेऊन ते दोघे निघाले. सासूबाई मात्र यायला तयार नव्हत्या. चाळीस दिवस होईपर्यंत मी इथून हलणार नाही म्हणाल्या .

क्रमशः

©® स्वाती बालूरकर,सखी
दिनांक २५.०८.२५
0

🎭 Series Post

View all