शीर्षक- घरटे (भाग ३)
लेखिका- स्वाती बालूरकर, सखी
वीणाने सहज जाऊन पाहिल, त्या अडगळीच्या खोलीत अतिशय दुर्गंधी पसरली होती आणि आता दोन च्या ऐवजी तीन चार कबुतरांच्या जोड्याने तिथे अंडी दिली होती.
त्यांच्या विष्ठेचा उग्र दर्प सगळीकडे पसरला होता.
ती जावेला म्हणाली ," ताई, आई आजारी होत्या मी तर तिकडे राहायला गेले, तुम्ही का नाही काढल ते?"
" मला वेळ नव्हता, आता काढते , आता मी ते कबुतराला काय कुणालाच इथे राहू देणार नाही. . म्हणजे उपऱ्या लोकांना पण येथे राहू देणार नाही."
वीणाला त्याचा अर्थ कळला नाही. ती शहरात गेली आणि पंधरा दिवसात सासूबाईंचा फोन आला .
" काही करा, मला इथून घेऊन जा. दोघे जन घाईने पुन्हा गावी आले तर जाऊ बाईने सासूबाईंचे सगळं सामान आणि वीणा चे पण घरात असलेले सामान तयार करून बांधून एका बाजूला ठेवून टाकल होत.
तिला आश्चर्य वाटलं," काय झालं ?"
" जा. . . म्हणजे आता कायमचं शहरात जाऊन राहायचं."
" असं का म्हणता? घर आपला आहे ?"
" होतं, आता नाही. माझ्या सासर्यांच्या नावाने असलेले घर तुमच्या वडिलांनी रजिस्ट्री ऑफिस नोकरी होती म्हणून त्यांच्या नावावर करून ठेवलं होतं आणि उपकार केल्यासारखा आम्हाला इथे राहू दिल होते. पण हो जाण्यापूर्वी काकांनी हे घर यांच्या नावाने केला आहे आणि मला आता कुणाच बाहेरच्या माणसांमध्ये इथे राहू द्यायचं नाही."

वंशीधर आणि वीणा साठी हा खूप मोठा धक्का होता.
कागदपत्र तपासला गेली, खरंच त्याच्या वडिलांची सही कागदांवरती होती आणि त्यांनी सोयीचे ते घर चुलत भावाच्या नावाने केलं होतं.
आता मात्र वंशीधरला शंका आली यात काहीतरी घातपाताची शक्यता आहे .वडिलांचा मृत्यू देखील नैसर्गिक होता की नाही माहित नाही!
सर्वांसमोर इतका व्यवस्थित राहणारे भाऊ एकदम बदलून गेला आणि म्हणाला," कोर्टात केस घाल आपण आता कोर्टातच भेटू."
सर्वांसमोर इतका व्यवस्थित राहणारे भाऊ एकदम बदलून गेला आणि म्हणाला," कोर्टात केस घाल आपण आता कोर्टातच भेटू."
या कबुतरांना तर बाहेर काढणारच आहे, जावेने साफसफाई करणाऱ्या बाईला बोलावलं आणि तिला सांगितलं," अडगळीत मला काहीच पसरा नको, तिकडे मी जाळी लावून टाकणार आहे .कबूतरही नको आणि कबुतरा सारखी घरात घुसणारी माणसं पण नको. सगळं स्वच्छ करून टाक .पिल्ले आहेत अंडे आहेत काहीच पाहू नकोस.
एक गोष्ट वीणा च्या खूप जिव्हारी लागली.
नाईलाजाने त्यांनी गाडी बोलावली आणि आपल्या भाड्याच्या राहते घरात सामानासकट आईला घेऊन परत निघाले.
आईची तब्येत नाजूक होती त्यामुळे तिला तिथे ठेवण्यात काही अर्थ नव्हता .तिथे शहरातल्या भाड्याच्या घरी आले. वेळाने सासूचे सासूची खूप सेवा केली .

सहा महिने झाले असतील दुसऱ्या मजल्यावर जी घरात वरची प्रकाश येण्यासाठी खिडकी असते व्हेंटिलेटर तिथे पुन्हा पक्षांचा किलबिलॅट ऐकू येऊ लागला आणि थोड्या दिवसात कबुतराचे गुटुरगुतीच्या कानावरती पडली.
गावाच्या घरात कबुतरामुळे झालेले प्रकरण तिला खूप जिव्हारी लागलं होतं त्या खिडकीचा तो भाग बाहेर असल्यामुळे तिथे ती पोहोचू शकत नव्हते पण कबुतरांना पाहिलं की ती बेचैन व्हायची. तोच वास पुन्हा यायला लागला. त्यांची पंख उडून घरात यायला लागली .
तो रम्य वाटणारा पक्षांच्या पिल्लांचा आवाज सुद्धा तिला आता नकोस वाटायला लागला.
त्यादरम्यान सासूबाई पुन्हा एकदा आजारी पडल्या. डॉक्टरांनी सांगितलं धुळीची, पक्षांची काही केमिकल्स चे त्यांना ऍलर्जी आहे त्यामुळे त्यांना जपा.
जेव्हा त्यांची तब्येत ठीक होत नव्हती, मालकाने त्यांना घर रिकामं करण्यासाठी सांगितलं कारण त्यांचा मुलगा तिथे राहायला येणार होता.
हे आलेले संकट वीणा आणि वंशीधर यांना खूपच अपेक्षित होतं. आता मात्र तिला जाऊ बाई च्या आईचे शब्द आठवले.
कबूतर माणसाचं घर उध्वस्त करतात,
घराचं खंडहर व्हायला वेळ लागत नाही. सगळं बदलून जातं कारण कबूतर चांगल्या वास्तूत राहत नाही. जुन्या वास्तुत ,किल्ल्यांमध्ये, पडक्या इमारती किंवा घुमट्यांमध्ये राहतात.
हे तिच्या डोक्यात कोरलं गेलं .
घराचं खंडहर व्हायला वेळ लागत नाही. सगळं बदलून जातं कारण कबूतर चांगल्या वास्तूत राहत नाही. जुन्या वास्तुत ,किल्ल्यांमध्ये, पडक्या इमारती किंवा घुमट्यांमध्ये राहतात.
हे तिच्या डोक्यात कोरलं गेलं .
स्वतःच्या घरातून तरी या कबुतराने काढलच आहे भाड्याच्या घरात पण राहू देत नाहीत या गोष्टीने तिने कबुतरांची खूपच धास्ती घेतली, पण हे सगळं ती नवऱ्याला सांगू शकली नाही कारण याच्यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता.
त्याने आपल्या एका वकील मित्राला सांगून कोर्टात केस टाकली होती .दुसरे भाड्याचं घर पाहिला.
तिथे पुन्हा सामान लावणे, पुन्हा संसारमांडणे तिच्या खूप जीवावरती आलं होतं.
या घरी सहा महिन्यात हळूहळू सासूबाईंची तब्येत सुधारू लागली. या किरायाच्या घरात ती प्रयत्न करत होती की कुठूनही कबूतर येऊ नये. सगळीकडे अगदी व्यवस्थित बंदोबस्त केला होता. बाल्कनी नसेल तरी चालेल म्हणून तिने बाल्कनी नसलेला फ्लॅट घेतला होता.

सुदैवाने हे घर त्यांना फळले . घरात येऊन आठ नऊ महिने झाले असतील कोर्टाचा निकाल आला आणि त्या वडिलोपार्जित घरात वंशीधर याचा पण बरोबर वाटा आहे हे सिद्ध झालं. चुलत भावाने घरात वाटा देण्याची तयारी दाखवली नव्हती पण त्याने त्या किमतीचे पैसे देण्याचं कबूल केलं आणि मुदतीत दिले पण.
अशाप्रकारे एकत्रच मोठी रक्कम मिळाल्यामुळे मग वीणाच्या वडिलांनी आणि भावाने देखील काही मदत केली आणि ' घर हफ्त्याने घेण्याच्या ऐवजी एकत्रच घ्या, हवे तर आमचे पैसे पुन्हा परत द्या' असे सांगून त्यांना नगदच तो फ्लॅट घ्यायला लावला.
वंशीधर वीणाने शहरामध्ये स्वतःचाच फ्लॅट विकत घेतला. वडील तर समोर नव्हते, किमान आईसमोर स्वतःच घर व्हावे या इच्छेने, सगळ्या पाहुणेरावळ्यांना बोलावून व्यवस्थित वास्तुशांती आणि गृहप्रवेश केला. फेब्रिकेशन वाल्याला जाळीची ऑर्डर दिली होती पण अपार्टमेंट मध्ये सगळ्या फ्लॅटला एकदाच जाळी बसवली जाते त्यामुळे खिडकीच्या जाळ्या आणि बाल्कनीच्या जाळ्या लावायच्या बाकी होत्या.
स्वतःच्या घराच्या आनंदापोटी छोटे-मोठे काम बाकी राहू नये म्हणून ते फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते.
स्वतःच्या घराच्या आनंदापोटी छोटे-मोठे काम बाकी राहू नये म्हणून ते फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते.
वीणा ने महिनाभरात घरात सामान लावलं होतं, यावेळी स्वतःच्या घरात सामान लावण्याचा आनंद वेगळाच होता.
आणि आज दुपारी जेव्हा तिने खिडकीत कबूतर येऊन बसलेले पाहिलं, भूतकाळात झालेल्या सगळ्या घटना डोळ्या समोरून गेल्या. आपलं हे घर पण आता भग्न होऊन जाईल आणि आपण पुन्हा बेघर होऊन बाहेर पडू या भीतीपोटी कबुतराला पाहून किंचाळली होती .
आणि लवकरच तिने बालकणी आणि खिडक्यांना अशा जाळ्या लावून घेतल्या ज्यामुळे कुठूनच कबूतर घरात येऊ शकत नाही किंवा ते त्याच घर बांधू शकत नाही .
(यात विश्वास किती, अंधविश्वास किती? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि एखाद्या माणसाला कशाची भीती बसते तेव्हा केवळ तोच त्या भीतीचं कारण समजू शकतो.)
(टीप - या कथेचा उद्देश्य लोकांना या भ्रमातून बाहेर काढण्याचा आहे, कुठलाच गैर समज किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. वीणा सोबत जे झालं ते तिचा स्वतः समज आहे, लेखिका अशा कुठल्याच पक्षी किंवा प्राण्याबद्दल अमानवी भावना किंवा धारणेचे समर्थन करत नाही.)
समाप्त.
©® स्वाती बालूरकर,सखी
दिनांक २५.०८.२५
दिनांक २५.०८.२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा