ठरल्याप्रमाणे सगळे चार वाजता तिथे जमतात.... वरुण ने सांगितल्याप्रमाणे या मिशन बद्दल एकही चकार शब्द न काढता एकदम नॉर्मल असतात.... वरुण आणि विनीत तिथे आधीच येऊन थांबलेले असतात.... सगळ्यात आधी विनीत प्रसन्न चा मोबाईल घेतो आणि सेटिंग मध्ये जाऊन काहीतरी करतो... तसंच सुमितच्या मोबाईल मध्ये सुद्धा करतो! आता आपण बोलू शकतो! मी गेम ने मागितलेल्या मोबाईल च्या स्पीकर, कॅमेरा, कॉन्टॅक्ट सगळ्याची परमिशन कॅन्सल केली आहे...
वरुण:- मी आणि विनीत ने सगळी हनी ट्रॅप ची तयारी केली आहे... हॅकर आता लवकरच आपल्या तावडीत सापडेल...
अरुंधती आणि जान्हवी (एकत्र):- काय हॅकर?
विनीत:- हो! प्रसन्न आणि सुमित दोघांचे मोबाईल हॅक झालेत! मी आत्ता परमिशन काढून घेतल्या आहेत आणि ज्या काही एक्स्ट्रा फाईल्स क्रियेट झाल्या होत्या त्या पण डिलिट केल्यात..... हे त्या हॅकर ला कळेल तेव्हा नक्कीच तो काहीतरी करेल.....
नचिकेत:- पण सर हनी ट्रॅप म्हणजे काय?
वरुण:- सांगतो! हॅकर ला यात अडकवण्यासाठी एक डमी डिव्हाईस तयार करायचं.... ज्यावर त्याने अटॅक करायचा प्रयत्न केला की तो यात अडकणार.... थोडक्यात सांगायचं झालं तर, हनी ट्रॅप म्हणजे एक प्रकारचं जाळं.... आम्ही दोघांनी मिळून आता प्रसन्न आणि सुमित दोघांचे मोबाईल क्लोन केले आहेत. त्यामुळे त्या लेव्हल च्या पुढे आम्हाला सुरु करता येईल.... आणि या दोघांच्या मोबाईल मधला डेटा सुद्धा सेफ राहील.... मी जेव्हा सकाळी ती लिंक पाहिली होती तेव्हा माझ्या लक्षात आलंय हा हॅकर काही रुळलेला नाही.... नवीनच आहे... पण भरपूर ज्ञान सुद्धा आहे याला.... त्याने त्याच्या डिव्हाईस चा IP ऍड्रेस सुद्धा बदलला आहे म्हणून हा ट्रॅप लावावा लागतोय.... पण काही काळजी करण्याची गरज नाही... त्याच्या लक्षात आलं तरी जास्त काही तो नुकसान करू शकणार नाही.... त्या आधी आपण त्याला पकडू....
विनीत:- तुम्ही सगळे आता निर्धास्त रहा...
वरुण:- विनीत! हे बघ अडकला हा आपल्या जाळ्यात! आता थोडं खेळू याच्या बरोबर... म्हणजे त्याला संशय नाही येणार.... तू ट्रॅकिंग करायला घे...
इतक्यात नचिकेत च्या मोबाईल वर लिंक च्या द्वारे एक व्हिडिओ क्लिप येते.... तो विनीत ला याबद्दल सांगतो... ती लिंक नचिकेत च्या फोन मध्ये उघडणे म्हणजे रिस्क असते.... कारण त्यात जर कोणता वायरस असेल तर सगळ्या डिटेल्स ना धोका निर्माण होऊ शकतो.... म्हणून वरुण त्याच्या कडचा एक्सष्ट्रा मोबाईल जो त्याने अशाच कामासाठी ठेवलेला असतो तो देतो. या मध्ये ओपन करून बघा यात हा व्हिडीओ डाउनलोड पण होईल... म्हणजे लिंक वरून त्याने डिलिट केला तरी आपल्याकडे पुरावा राहील.
व्हिडिओ मध्ये प्रसन्न ला कुठेतरी बांधून ठेवलंय असं दृश्य असतं! सोबत धमकी असते... जर तुझ्या मुलाला जिवंत बघायचं असेल तर लवकरात लवकर अजून एक लिंक येईल त्यावर जाऊन दहा लाख रुपये भर उद्या पर्यंतची मुदत आहे तुला.... नाहीतर याच्या जीवाचं काही खरं नाही..... आणि व्हिडिओ कट होतो.
नचिकेत:- सर, पण प्रसन्न तर इथे आपल्या बरोबर आहे... मग हे?
वरुण:- सांगतो सगळं नंतर! विनीत, हा आता बरोबर अडकलाय.... फक्त आता दुसरी लिंक आली की तो अडकलाच पूर्ण जाळ्यात...
थोड्याच वेळात दुसरी लिंक येते... त्यात सगळे बँक डिटेल्स भरून पैसे ट्रान्सफर करायचे असतात.... सगळं ठरल्या प्रमाणेच घडत असतं! शेवटी त्या हॅकर च खरं लोकेशन काही techniques वापरून दोघं मिळून शोधतात...
विनीत; अरुंधती आणि जान्हवी ला मुलांना घेऊन तुम्ही घरी जा आम्ही बघतो पुढचं असं म्हणून घरी पाठवतो. नचिकेत, प्रशांत, विनीत आणि वरुण लोकेशन ट्रेस करत करत एका कमी रहदारीच्या रस्त्यावर येऊन पोहोचतात. जेमतेम चार पाच घरं.... ती ही बऱ्याच अंतरावर....
विनीत:- वरुण! अरे हे बघ... लोकेशन ट्रेस व्हायचं बंद झालं! इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे...
वरुण:- अरे विनीत... जरा नीट बघ.. त्या झाडावर बहुतेक नेटवर्क जॅमअर लावलेलं दिसतंय.... त्याचं लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेतली आहे त्याने.... मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त हुशार निघाला हा! पुढे कॅमेरा हि असू शकतो... आपल्याला कोणतीही शक्यता नाकारता येत नाही... आता जे काही करायचं ते एकदम सावधपणे केलं पाहिजे....
प्रशांत:- पण मग आता काय करायचं? कसं समजणार आपल्याला तो आहे कुठे?
विनीत:- नचिकेत सर! मला तो व्हिडिओ दाखवा एकदा...
नचिकेत:- हो! हे घ्या..
विनीत:- वरुण अरे हे बघ... यात खिडकीच्या बाहेर काहीतरी दिसतंय... बहुतेक कसलातरी बोर्ड आहे.... आणि कसलातरी आवाज पण येतोय असं वाटतंय पण क्लिअर नाहीये.... थोडा बॅकग्राऊंड चा आवाज क्लिअर करून ऐकुया...
विनीत बॅकग्राऊंड चा आवाज थोडा क्लिअर करतो. वरुण आणि विनित दोघं मिळून आवाज ऐकतात... भेळ वाला असतो तो! भेल ले लो भेल.... असं ओरडत असतो!
प्रशांत:- इतक्या कमी रहदारी असणाऱ्या ठिकाणी भेळ वाला कशाला असेल?
वरुण:- नाही! तो इथे नाहीये... हि घराची मागची बाजू वाटतेय... आणि तो बोर्ड म्हणजे बहुतेक गार्डन च्या नावाचा असणार... कारण या व्हिडिओ मध्ये थोडा थोडा आवाज लहान मुलांचा पण येत होता आणि झोक्याचा आवाज आल्या सारखं पण वाटलं मला! विनीत एक काम कर, या जागेच्या आसपास कुठे बाग आहे बघ जरा... आपला अपराधी आपल्याला तिथेच सापडेल.
विनीत:- हो! इथून निघूया आधी आपण... थोडं माघारी गेलो की नेटवर्क सुद्धा येईल.
नचिकेत:- सर एक request करायची होती... आपलं हे काम झालं की प्लिझ तुम्ही आमच्या सोसायटी मध्ये एक सेमिनार घेऊन कसं या सगळ्या पासून स्वतःला प्रोटेक्ट करायचं ते सांगा ना प्लिझ...
वरुण:- हो नक्की!
आता पुढे हा हॅकर कसा तावडीत सापडतोय आणि का त्याने हे सगळं केलं हे पाहूया पुढच्या भागात.... आणि हो विनीत आणि वरुण सुद्धा सेमिनार घेऊन काही टिप्स देणार आहेत बरं का.. त्यामुळे पुढचा भाग मिस नका करू....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा