Login

द पेमॉन (भाग ८)

Satan And Humans Love Story


सूर्यास्ताच्या नारिंगी किरणांनी समुद्राच्या लाटा सोनेरी रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. कोको गावाच्या या छोट्याशा, शांत समुद्रकिनाऱ्यावर हलक्या वाऱ्याने वाळूवर रेषा काढत होत्या. त्या रेषांमध्ये मिखाईल एकटाच उभा होता. त्याच्या उजव्या हातात तीच मोत्यांची माळ होती, जी काल त्या अनोळखी मुलीने हरवली होती. माळेच्या प्रत्येक मणीवर सूर्यकिरण पडून चमकत होते.

जणू ती स्वतःच त्याला सांगत होती, “ती येईल... ती नक्की येईल.”

मिखाईलला खात्री होती. का माहीत नाही, पण त्याच्या मनात एक अवर्णनीय विश्वास निर्माण झाला होता. ती मुलगी, जी फक्त एका क्षणासाठी त्याच्या आयुष्यात आली आणि निघून गेली, ती परत येईल.

त्याला जणू एलिझाबेथची अवस्था समजत असावी. तिच्या डोळ्यांतली ती अस्वस्थता, तिच्या चेहऱ्यावरची ती हळवी चिंता. ती माळ हरवल्यामुळे तिला किती त्रास होत असेल, हे त्याला जाणवत होते. आणि म्हणूनच तो इथे, याच ठिकाणी, तिची वाट पाहत उभा होता. जणू जगातील इतर सर्व गोष्टी थांबल्या असतील आणि फक्त हा क्षण महत्त्वाचा असेल.

त्याला तिचे नाव माहीत नव्हते. तिची भाषा, तिचे घर, तिचे जग काहीच माहीत नव्हते. तरीही फक्त एका नजरेत, निमिषार्धाच्या त्या छोट्याशा क्षणात तिने त्याचे संपूर्ण हृदय चोरले होते. तो तरुण होता, पंचवीस वर्षांचा. आयुष्यात अजून बरेच काही पाहायचे होते, अनुभवायचे होते. पण असे वाटत होते की, तो क्षणच त्याच्या आयुष्याचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा होता.

एलिझाबेथला भेटण्यापूर्वी त्याने कधी कुणावर प्रेम केले नव्हते.

पण त्या दिवशी एलिझाबेथ आणि त्याची टक्कर झाली. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. आता त्याचे जीवनच पालटले होते.

इथे समुद्र तटावर मिखाईल हातात माळ घेऊन तिचीच वाट पाहत होता. त्याला माहित होते ती आपली हरवलेली माळ शोधत परत येईल. का माहीत नाही पण फक्त एका नजरेतच मिखाईलचे हृदय तिने चोरले होते. मिखाईलला तिचे नाव ही माहीत नव्हते. त्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते. फक्त निमिषमात्र नजरानजर मध्ये तो तिच्यावर घायाळ झाला. तो तरुण होता. त्याला अचानक तिच्यावर प्रेम झाले.

आता जेव्हा तो होडीत समुद्रात जायचा, तेव्हा त्याला तिची आठवण यायची. लाटांमध्ये त्याला तिचे लांब केस दिसायचे, क्षितिजावर तिचे निळे डोळे चमकायचे. तो विचार करायचा कधी तरी तिला इथे आणावे, या किनाऱ्यावर. तिला होडीत बसवावे, लाटांवर घेऊन जावे. बाहुपाशात गुंफून प्रेम करावे.

मिखाईल कोको गावात मासेमारीचे काम करत होता. हे छोटेसे, शांत गाव समुद्रकिनाऱ्याला चिकटून वसलेले होते, जिथे प्रत्येक सकाळी लाटांच्या आवाजाने दिवस सुरू होत असे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या रंगांनी सगळं आकाश भरून जाई. मिखाईल रोज पहाटे उजाडताच आपल्या छोट्या लाकडी नावेत बसायचा. हातात मजबूत जाळे, डोळ्यात समुद्राची ओढ आणि मनात आज काय मिळेल याची चिंता हेच त्याचे आयुष्य होते.

तो सहा फूट उंच होता, रुंद छातीचा, बळकट स्नायूंनी भरलेला तगडा तरुण. कामाच्या जोराने त्याचे खांदे आणि हात इतके मजबूत झाले होते की, जाळे ओढताना किंवा भारी मासे नावेत चढवताना त्याला कधीही थकवा जाणवत नसे. त्याची तांबूस केस माने मागे समुद्राच्या खारट वाऱ्याने नेहमीच थोडीशी उडत असे, आणि त्याचा गोरवर्णी चेहरा सूर्याच्या किरणांनी हलकासा तांबडा झालेला असायचा. देखणा चेहरा, खोल डोळे आणि सौम्य हसू हे सगळं मिळून त्याला असाधारण आकर्षक बनवत असे.

गावातील अनेक तरुणी त्याच्याकडे पाहून मनातल्या मनात स्वप्नं बघायच्या. काहींनी तर थेट डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा प्रयत्नही केला होता. पण मिखाईल कधीच कुणाला त्या दृष्टीने पाहिले नव्हते. त्याचे मन नेहमीच स्वतंत्र राहिले होते. त्याला वाटायचे की, प्रेम हे काही सक्तीने येत नाही. ते येईल तेव्हा येईल, आणि जेव्हा येईल तेव्हा ते इतके खोल आणि खरे असेल की इतर कोणत्याही गोष्टीला जागा उरणार नाही. आणि मग एक दिवस तेच घडले. ती अनोळखी मुलगी समुद्रकिनाऱ्यावर आली, आणि फक्त एका नजरेत मिखाईलचे संपूर्ण जग बदलून गेले. हे प्रकरण वेगळे होते. खरोखरच वेगळे. त्याला पहिल्यांदाच खरे प्रेम झाले होते. ते प्रेम जे शब्दांत सांगता येत नाही, फक्त अनुभवता येते.

मिखाईल आणि त्याचा लहान भाऊ टॉनी एकत्र राहत होते. त्यांचे छोटेसे घर समुद्राच्या शेजारीच होते. मातीच्या भिंती, कौलारू छत मोठे अंगण. अंगणात माडे पकडायची जाळी, मासे जमा करायच्या टोपल्या. बाकी समान असायचे.

घरात गरिबी असली तरीही प्रेमाचा आणि समाधानाचा उबदारपाना होता . त्याचे आई-वडील त्यांना लहान असतानाच देवाघरी गेले होते. एका अपघातात दोघेही गेले, आणि तेव्हापासून हे दोन भाऊ एकमेकांचे विश्व झाले. मिखाईल पंचवीस वर्षांचा, तर टॉनी वीसचा. तरीही दोघांमध्ये फक्त तीन वर्षांचा फरक असला तरी मिखाईल नेहमीच टॉनीचा रक्षक, मार्गदर्शक आणि सर्वांत जवळचा मित्र होता.

घरची परिस्थिती श्रीमंत म्हणता येणारी नव्हती, पण एकदम बेताचीही नव्हती. मिखाईलची मासेमारी आणि टॉनीचा बाजारात मासे विकण्याचा धंदा यामुळे दोघांना पुरेसे पैसे मिळत. घरात नेहमीच ताजे मासे, थोडेसे भाजीपाला आणि हसणे असायचे. ते दोघेही खाऊन-पिऊन सुखी होते. सकाळी मिखाईल नावेत जायचा, दुपारी परत यायचा, आणि संध्याकाळी दोघे एकत्र बसून दिवसभराच्या गोष्टी सांगायचे. टॉनीला मिखाईलच्या कामात मदत करायला आवडायचे, आणि मिखाईल टॉनीला नेहमीच म्हणायचा, “तू फक्त शिक, बाकीची जबाबदारी माझ्यावर सोड.”

दोघे भाऊ धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांचे जीवन देवावर, प्रार्थनेवर आणि इमानदारीवर आधारलेले होते. दर रविवारी ते गावातील चर्चमध्ये जात. ते चर्च खूप जुने होते. ती जागा इतकी शांत आणि पवित्र की तिथे गेल्यावर मनाला खूप समाधान वाटायचे . मिखाईल तिथे पियानो वाजवायचा. त्याचे बोटे जेव्हा काळ्या-पांढऱ्या कळ्यांवर नाचत, तेव्हा संपूर्ण चर्चमध्ये एक प्रकारची आध्यात्मिक शांतता पसरायची.

फादर, प्रिस्ट, सिस्टर्स सगळेच त्याच्या संगीताचे चाहते होते. त्याच्या वाजवण्यात एक वेगळीच जादू होती . जणू तो फक्त कळ्या दाबत नव्हता, तर आपल्या भावना, दुःख आणि आनंद सगळं संगीतातून व्यक्त करत होता.

चर्चमधील प्रिस्ट निकोबेल हे मिखाईलचे एकदम जिगरी दोस्त होते. वयाने त्याच्याच वयाचे असले तरी दोघांमध्ये सख्ख्या भावासारखे नाते होते. फादर निकोबेल अनेकदा मिखाईलला चर्चच्या मागच्या छोट्या बागेत बसवून आयुष्याच्या गोष्टी सांगायचे. कधी प्रेमाबद्दल, कधी विश्वासाबद्दल, कधी दुःख कसे सहन करावे याबद्दल. मिखाईल त्यांच्या बोलण्यातून खूप काही शिकायचा. आणि निकोबेल सुद्धा मिखाईलच्या संगीतातून आणि त्याच्या साध्या, प्रामाणिक आयुष्यातून प्रेरणा घ्यायचे.

मिखाईलचे जीवन साधे होते, पण त्यात एक प्रकारची पूर्णता होती. समुद्र, भाऊ, चर्च आणि आता... ती अनोळखी मुलगी. तिच्या एका नजरेने त्याच्या या साध्या जीवनात एक नवीन रंग भरला होता. तो रंग जो कधीच फिका पडणार नव्हता..

“प्रेम हे देवाने दिलेले सर्वांत मोठे वरदान आहे, मिखाईल,” फादर निकोबेल म्हणायचे, “पण ते येईल तेव्हा ओळखायला हवे. कारण ते कधी पूर्वसूचना देत नाही.”

आज मिखाईलला फादर निकोबेलचे हे शब्द खूप खोलवर जाणवत होते.

आणि मग तो विचार – जो त्याला सतावत होता. ती मुलगी... ती वेगळ्या जगातून आली होती. तिच्या कपड्यांवरचा तो वेगळा पद्धतीचा रंग, तिच्या बोलण्याचा लहेजा, तिच्या हातातली ती माळ... ती या जगाची नव्हती. तरीही तिचे डोळे मिखाईलला इतके आपले वाटले होते. जणू ती त्याचीच वाट पाहत होती, आणि तो तिची.

एक विच आणि एक मनुष्य. दोन वेगळ्या मिती. दोन वेगळी आयुष्ये. तरीही एका क्षणात त्यांचे मन एक झाले. हे प्रेम किती विचित्र, किती अशक्य, किती अविश्वसनीय होते. पण प्रेमाला नियम नसतात. प्रेमाला सीमा नसतात. प्रेमाला मिती नसतात.

म्हणूनच मिखाईल इथे उभा होता, हातात ती माळ घेऊन. सूर्य आता क्षितिजावर जवळजवळ बुडत आला होता. लाटा जोरात येत होत्या. वारा थंड होत होता. पण मिखाईलच्या मनात एकच विचार होता.

‘ती येईल. तिला ही माळ परत हवी आहे. आणि मला ती हवी आहे.’

तो तिथेच थांबला. डोळे समुद्राच्या दिशेने. हृदय तिच्या नावावर. आणि आत्मा त्या एका नजरेत हरवलेला.
0

🎭 Series Post

View all