Login

द पेमॉन (भाग १०)

Satan And Human Love Story
पेमॉन (भाग १०)

अंधारलेली रात्र समुद्राला आपल्या काळ्या कुशीत घट्ट मिठी मारून झोपवत होती. लाटा हळुवारपणे खडकांना चुंबन घेत होत्या, जणू निसर्ग स्वतःच प्रेमाची कुजबुज करत होता. आकाशात चंद्र नव्हता पूर्ण, फक्त एक पातळ, चांदीसारखा अर्धचंद्र, ज्याचा मंद प्रकाश समुद्रावर चांदीचे धागे विणत होता. वारा शांतपणे येत होता, थंड शितलहर घेऊन, आणि पुन्हा निघून जात होता, जणू त्यालाही कळत होतं की आज रात्री काहीतरी खास घडणार आहे.

खडकावर मिखाईल एकटा बसला होता. हातात लाकडी शीत घेऊन तो हळूहळू तोडत होता, पण त्याचे डोळे समुद्राच्या दिशेने खिळलेले होते. मनात एकच प्रश्न बारंबार फिरत होता

ती येईल का? खरंच येईल का?

तिने रात्री यायचा वायदा केला होता, पण तरीही त्याच्या मनात एक सौम्य भीती, एक गोड अनिश्चितता होती. प्रत्येक लाटेच्या आवाजात त्याला तिचा पायघोळ ऐकू येत होता, प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत तिचा सुगंध येत होता.

अचानक.एक मुलायम, उबदार हात हळूच त्याच्या खांद्यावर पडला. मिखाईलने हृदय थांबून मागे वळून पाहिलं.

मागे एलिझाबेथ उभी होती.

चांदण्याच्या मंद प्रकाशात ती जणू स्वप्नातून बाहेर पडलेली होती. पांढरा, हलका, रेशमी ड्रेस तिच्या शरीराला इतका जवळून मिठी मारत होता की तो ड्रेस नव्हे तर चंद्रप्रकाशच तिच्यावर वाहत होता असं वाटत होतं. तिचे सोनेरी केस लाटांप्रमाणे मोकळे सोडलेले, वाऱ्यात हलकेच नाचत होते. निळसर डोळे जणू समुद्राच्या गहन गाभ्यातून उगवलेले दोन तारे. तिच्या ओठांवर हलकं, लाजाळू हसू.

मिखाईल तिचे सौंदर्य पाहुन स्तब्ध झाला. त्याचे श्वास थांबले. काळीज धडधडू लागले. हातातली लाकडी शीत खाली पडली, पण त्याला कळलंच नाही.

"हॅलो... काय झालं?" एलिझाबेथने हात हलवत, खोडकरपणे विचारलं.

"ओह... काही नाही... सहज..." मिखाईल भानावर येत आपल्या डोक्याला टपली मारत म्हणाला. पण त्याचा आवाज लाजेने थरथरत होता.

पहिल्यांदाच कुणा तरुणीला तो रात्री भेटला होता आणि तिच्याशी बोलत होता.

मिखाईलच्या लाजलेल्या चेहऱ्याकडे पाहून एलिझाबेथ खळखळून हसली.
तिच्या हास्याने रात्र अधिक उजळली. त्या हास्यात इतकी मधुरता होती की समुद्राच्या लाटाही थांबून ऐकत होत्या.

दोघांच्या नजरा एक झाल्या. त्यांना खूप काही बोलायचे होते पण शब्द तोंडातून निघत नव्हते.

"मला तू गाव फिरवणार होतास ना ?" एलिझाबेथने विचारले.

"हो हो, नक्कीच मला आवडेल." मिखाईलने अदबीने तिच्या पुढ्यात हात केला. एलिझाबेथने त्याच्या हातात हात ठेवला. दोघांच्या ही शरीरात एकमेकांच्या स्पर्शाने रोमांच उठले.

दोघे हातात हात घालून चालू लागले.

मिखाईल तिला आपल्या गावाच्या छोट्या छोट्या गल्लीतून फिरवत होता. जुने दिवे, लाकडी घरं, मासेमारीच्या जाळ्या टांगलेल्या, छोटं चर्च जिथे निकोबेल प्रार्थना करत असे सगळं काही तिला दाखवत होता. एलिझाबेथ त्याच्या हातात हात घालून, डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून चालत होती. कधी ती थांबून समुद्राकडे पाहत होती, कधी त्याच्या चेहऱ्याकडे. दोघांचे हात एकमेकांत गुंफलेले, बोटं बोटांत अडकलेली, जणू कधीच सोडायची नव्हती.

रात्र जसजशी खोल होत गेली, तसतसं जग शांत होत गेलं. फक्त लाटांचा आवाज आणि दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते.

ते परत समुद्रकिनाऱ्यावर आले. चांदणं आता अधिक उजळ झालं होतं. मिखाईल थांबला. त्याने तिच्या हातातून हात सोडला, एक पाऊल मागे सरकलं आणि तिच्या डोळ्यांत पाहिलं.

"एलिझाबेथ..." त्याचा आवाज हळू, गंभीर, पण प्रेमाने भरलेला होता.

"मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं वाटतंय. तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. तुझ्या डोळ्यांत मी हरवतो, तुझ्या हास्यात मी जगतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. खूप खूप प्रेम करतो." त्याने खिशातून एक लाल गुलाब काढला.

सकाळपासून खिशात ठेवलेला गुलाब सुकून गेला होता. पण त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तो पुरेसा होता.

एलिझाबेथचे डोळे पाणावले. तिने हळूच गुलाब घेतला. तिच्या ओठांवर थरथरतं हसू आलं.

"मला पण... तुझ्यावर प्रेम आहे, मिखाईल. खूप खूप प्रेम आहे."

ती त्याच्या जवळ आली. दोघे एकमेकांच्या डोळ्यांत हरवले. वेळ थांबला. जग थांबलं. फक्त दोन हृदयांचे ठोके एकमेकांत मिसळले.

मग त्यांचे ओठ एकमेकांना भिडले.
त्या दोघांचे पहिलं चुंबन होतं. मंद, नाजूक, पण आतून जवानीच्या ज्वाळा उफाळून येत होत्या. ते प्रेमाने इतके भरलेले की त्यांना काहीही भीती वाटत नव्हती.

ते समुद्राच्या किनाऱ्यावर, चांदण्याच्या साक्षीने, एकमेकांत विलीन झाले.
प्रेमाच्या त्या उष्णतेत, स्पर्शाच्या त्या जादूने, ते दोघेही विसरले की जगात आणखी काही आहे.
&&&&&&

ते चुंबन आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलं होतं.
मिखाईलने, एलिझाबेथच्या ओठांना इतक्या तीव्रतेने चुम्बन दिलं की तिच्या श्वासात आनंदाचा लाव्हा उफाळला.
त्याची जीभ आता तिच्या तोंडात खोलवर घुसली होती, तिच्या जीभेला पकडून, तिला आपल्याशी लढवत, खेचत, मिसळवत. दोन्ही जिभा एकमेकांवरून इतक्या वेगाने फिरत होत्या की जणू एकमेकांना खाऊन टाकायच्या स्पर्धेत होत्या.

तिने त्याच्या केसांत बोटं खुपसली, त्याच्या डोक्याला जवळ ओढलं आणि जोराने त्याचा वरवर ओठ दातात पकडला. मिखाईल ने एक हात एलिझाबेथच्या मानेच्या मागे घातला, दुसरा हात तिच्या कंबरेवर, तिला आपल्या शरीरावर इतक्या जोरात दाबून ठेवलं की त्यांच्या छात्या एकमेकांवर चिकटल्या होत्या. तिच्या हृदयाचे ठोके त्याच्या छातीवर जाणवत होते

आता ते फक्त चुंबन नव्हतं तर ते एक प्रकारचं प्रेमयुद्ध होतं. मिखाईल आवेशात आला होता. त्याने तिच्या खालच्या ओठाला हलकेच दातांनी चावलं
ती कण्हली, पण त्या कण्हणीत वेदना नव्हती . तर फक्त अधिक हव असल्याचं संकेत.
तिने बदल्यात त्याच्या वरच्या ओठाला आपल्या दातांनी पकडलं, हलकेच ओढलं, मग आपली जीभ त्याच्या तोंडात इतकी खोलवर घातली की त्याचा श्वास अडखळला.

त्यांच्या ओठांमधून छोटे छोटे आवाज येत होते – ओले, चिकट, गरम...
"म्हम..." तिच्या तोंडातून निघालेला आवाज त्याच्या कानात गेला आणि त्याला आणखी वेड लावलं.

त्याने तिच्या तोंडातून जीभ काढली, मग तिच्या खालच्या ओठावरून जीभ फिरवली, मानेवर खाली सरकली आणि तिथे हलकेच चुम्बन घेतले. हलकेच चावणं, तिच्या त्वचेवर छोटीशी लाल खुण सोडत.

ती थरथरली, डोळे मिटले, आणि त्याच्या केसांत बोटं आणखी घट्ट पकडली.
"अजून..." तिने फुसफुसत म्हटलं, आवाज इतका कमी की फक्त त्यालाच ऐकू आला.
त्याने पुन्हा तिच्या ओठांना पकडलं, यावेळी पूर्ण ताकदीने जीभ आत, ओठ चोखण, श्वास एकमेकांत मिसळणं, हात तिच्या शरीरावर फिरत, तिला अजून जवळ ओढत.

हे चुंबन आता जणू त्यांच्या

कधी सूर्योदय झाला, हे त्यांना कळलंच नाही. सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणांनी समुद्रावर सोनेरी छटा पसरवली तसे एलिझाबेथला भान आलं.

"आता मला.. जावं लागेल..." तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यांत भीती आणि प्रेम दोन्ही होते.

मिखाईलने तिला घट्ट मिठी मारली. "जाऊ नकोस... प्लीज..."

"मला जावंच लागेल... पण मी परत येईन. वचन देते"

तिने त्याच्या गालावर हात ठेवला, एक शेवटचं चुंबन घेतलं आणि धावतच जादुई दरवाज्याकडे निघाली आणि क्षणार्धात ती गायब झाली.

मिखाईल तिथेच उभा राहिला. समुद्राकडे पाहत राहिला.
त्याच्या ओठांवर अजूनही तिच्या ओठांचा उरलेला उबदार स्पर्श होता.
त्याच्या छातीत त्याचे हृदय तिच्याच नावाने धडकत होते.

सकाळ झाली होती. पण मिखाईलच्या मनात अजूनही रात्र होती. ती रात्र जिच्यात त्याचं प्रेम जन्मलं होतं.

दुसरीकडे, एलिझाबेथ जादुई दरवाज्यातून आपल्या खोलीत परत आली.
तिने हळूच दार बंद केलं. कपडे नीट केले, केस विंचरले, आणि जणू काहीच घडलं नाही या अविर्भावात घरात वावरू लागली.

पण तिच्या डोळ्यांत... त्या निळ्या डोळ्यांत आता फक्त मिखाईल होता.
आणि तिच्या ओठांवर अजूनही त्याच्या चुंबनाचा गोडवा होता.
0

🎭 Series Post

View all