Login

द पेमॉन (भाग 12)

Satan And Girl Love Story

द पेमॉन (भाग १२)

एलिझाबेथ आणि मिखाईल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दररोज रात्री न चुकता एलिझाबेथ मिखाईलला भेटायला जायची आणि मिखाईल तिला रोज भेटायचा. त्यांच्या भेटी इतक्या गहिऱ्या आणि नितांत होत्या की वेळ कधी निघून जात असे याचे भानच राहत नसे. एलिझाबेथ आणि मिखाईलच्या या प्रेमाला आठ नऊ महिने होत आले होते. पण अजूनही मिखाईलला एलिझाबेथच्या नावाच्या व्यतिरिक्त अजून काहीच माहिती नव्हती. तिचे कुटुंब, तिचे घर, तिचे मागचे जीवन, काहीच नाही. फक्त तिचे नाव आणि तिच्या डोळ्यांमधली ती अनंत प्रेमळ चमक एवढेच त्याच्याकडे होते.

मिखाईलने मात्र त्याचा भाऊ टॉनी आणि त्याचा मित्र ब्रदर निकोबेल यांच्याशी तिची भेट घालून दिली होती. टॉनीने तर तिला आपली वहिनीही मानले होते. तो तिला वाहिनीच म्हणून हाक मारत असायचा.

निकोबेल आणि एलिझाबेथचीही चांगली मैत्री झाली होती. निकोबेल तिला बहिण मानू लागला. तो तिच्याशी बोलताना नेहमी थोडे संयमाने, पण मनापासून बोलायचा. तिच्या डोळ्यांत काहीतरी लपलेले आहे हे त्याला जाणवत होते.

पण ब्रदर निकोबेलला मात्र एलिझाबेथवर काहीतरी अमानवी संशय वाटायचा. कधीकधी बहुतेक ती या जगातीलच नाही असे त्याला वाटायचे. तिच्या चालण्यात, बोलण्यात, हसण्यात एक वेगळीच जादू होती, जी माणवी ऑररा असणाऱ्याकडे नसते. कधी तिच्या सभोवताली हलकेसे प्रकाशाचे कण नाचत असल्यासारखे वाटायचे. त्याने तिला तिला सरळ तसे विचारलेही होते.
“एलिझाबेथ, तू खरंच या जगाची आहेस का?” आपण योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी सांगेल हे एलिझाबेथने त्याला वचनही दिले होते. निकोबेलने त्या वचनावर विश्वास ठेवला होता, पण त्याच्या मनातली अस्वस्थता कधीच पूर्णपणे जाऊन राहिली नव्हती.

आज अर्धी रात्र झाली होती. सुमुद्रात आपल्या बोटीत, मिखाईल एलिझाबेथच्या आत रिता होऊन पाठीवर झोपला होता. लाटांचा हलका आवाज, बोटीची हलकेच होणारी हलकाफुलका हेलकावा, आणि त्या दोघांच्या श्वासांचा एकत्रित नाद, सगळे काही इतके शांत आणि सुंदर होते की वेळ थांबल्यासारखे वाटत होते. नग्न एलिझाबेथ निवस्त्र मिखाईलच्या मजबूत शरीरात स्वतःला झोकून झोपली होती. तिचे केस त्याच्या छातीवर पसरले होते, आणि तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवलेला होता. जणू त्याचे ठोके तिच्या आत्म्याशी बोलत होते.

एलिझाबेथला काही दिवसांच्या पासून विचित्रच वाटत होते. शरीरात एक वेगळी थकवा, छातीत एक हलकीशी अस्वस्थता, आणि कधीकधी अचानक येणारी भूक सगळेच काही वेगळे होते. जवळपास रात्र संपायला आली होती. एलिझाबेथ उठुन कपडे घालायला उभी राहिली तोच भोवळ येऊन ती मिखाईलच्या बाहुपाशात कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर अंधूकपणा आला आणि ती बेशुद्ध पडली.

सकाळी तिला जाग आली ती मिखाईलच्या अजूनही घरी बेडवर होती. नीट उजाडले नव्हते. खिडकीतून फक्त हलकासा सोनेरी प्रकाश आत येत होता. पण तिच्या आजूबाजूला निकोबेल, टॉनी, समोर मिखाईल उभे होते. तिच्या समोर बेडवर एक स्त्री डॉक्टर बसली होती. तिने एलिझाबेथला तपासले, तिची नाडी चेक केली, पोटावर हलकेच हात फिरवला आणि काही सेकंद शांत राहून विचार केला. ती उठून मिखाईल जवळ गेली. आणि हळू आवाजात त्याच्याशी काही म्हणत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू होते.

ती परत आली आणि एलिझाबेथचे अभिनंदन करून बाहेर गेली. मिखाईल धावतच आत आला आणि त्याने उठून उभ्या राहिलेल्या एलिझाबेथला मिठीत उचलून किस्स केले.

"थँक्स एलिझाबेथ थँक्स, तु मला खूप ओठी गुड न्यूज दिलीस."

"निकोबेल आय बिकम द डॅड"... मिखाईल एकदम खुशीत होता. त्याच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू चमकत होते. तो वारंवार एलिझाबेथला मिठीत घेत होता, तिच्या कपाळावर, गालांवर, डोळ्यांवर चुंबन घेत होता.

एलिझाबेथच्या मात्र चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिचे हात थरथरत होते. मागच्या महिन्यात तिची पाळीही आली नव्हती. त्यामुळे जरा ती चिंतेत होती. पण गर्भधारणा आणि त्याचा अनुभव या पासून ती अनभिज्ञ होती. तिला कधीच असा अनुभव आला नव्हता. त्यामुळे तिला समजले नाही. पण आता मात्र तिच्या पाचावर धारण बसली. तिने बळेच हसू दाखवून दिले. पण त्या हसण्यात आनंदापेक्षा भीती आणि गोंधळ जास्त होता.

"एलिझाबेथ आर यु मॅरी मी ?"... मिखाईलने आपल्या खिशातील रिंग काढून तिच्या समोर करत म्हटले.

मिखाईलने त्यांच्या लग्नासाठी रिंग बनवुन खिशातच घेऊन हिंडत होता दोन महिने. प्रत्येक वेळी तिला भेटायला जाताना त्याच्या मनात हा विचार यायचा आज सांगावे का? पण भीती वाटायची. पण आज बहुतेक देवानेच त्यांचे प्रारब्ध जुळवले होते. त्या आनंदात त्याने तिला लग्नाची मागणी घातली.

एलिझाबेथच्या डोळ्यात अश्रू आले,. तिने मानेनेच होकार दिला. तिला हक्काचा पुरुष भेटला होता ज्यावर ती आणि तो तिच्यावर नितांत प्रेम करत होते. पण मदर मीरिंडाला माहीत झाले तर काय होईल आणि मिखाईलला माहीत झाले ती एक चेटकीण आहे तर तो तिला स्वीकारेल? याची तिला खात्री नव्हती. ती त्याचे बाळ घेऊन आपल्या जगात जाऊ शकत नव्हती. आणि एक चेटकीण म्हणून तो तिचा स्वीकार करेल याची तिला शाश्वती नव्हती. तिच्या मनात हजारो प्रश्न एकाच वेळी घुमत होत.

मिखाईलला सत्य कळले तर? टॉनी आणि निकोबेल काय म्हणतील? गावकरी, चर्च, लोक सगळे काय करतील? तिने अज्ञातात जायचा निर्धार करून तिथून कायमस्वरूपी निघायचा विचार केला. कारण मिखाईलने जरी स्वीकारले तरी जर कुणाला माहीत झाले तर लोकं तिच्या बरोबर त्याचा त्याच्या भावाचा जीव ही घ्यायला मागेपुढे बघणार नव्हते.

एलिझाबेथ पुन्हा आपल्या मितीत जाण्यासाठी निघाली होतीच तोच ब्रदर निकोबेल तिच्या समोर आला.

"एलिझाबेथ थांब .."... त्याने तिला रोखले. त्याच्या आवाजात ठामपणा होता, पण डोळ्यात काळजीही दिसत होती.

"ओहह निक, काय झाले."... अचानक निकोबेलला समोर पाहून ती घाबरली. तिचा श्वास थांबल्यासारखा झाला.

"मला माहित आहे तु या जगातील नाही. तु एक विच आहेस. पण हे ही तितकेच खरे आहे की मिखाईल तुझ्यावर खरं प्रेम करतो. तुझ्या विच असण्याचा त्याला काहीच प्रॉब्लेम नसणार. आणि एक तुझ्या पोटात माझा भाचा आहे. एक मामा म्हणुन मी सदैव त्याचे रक्षण करेल हे वचन देतो तुला. तु घरी सांगून परत ये. एक भाऊ म्हणून मी तुझे लग्न लावून देईल."... ब्रदर निकोबेलने तिला आश्वत केल्यावर तिला धीर आला.

त्याच्या शब्दांत एक वेगळीच ताकद होती. जी फक्त खऱ्या भावनेतून येऊ शकते. तिने निकोबेलच्या गळ्यात मिठी मारून आपले दुःख डोळ्यांच्या पाण्यातून बाहेर काढले. ती रडत होती, पण त्यात आता फक्त दुःख नव्हते. आशेचा एक किरणही होता. आणि मग ती आपल्या मितीत गायब झाली.

ती घरात आली तेव्हाच तर मदर मीरिंडा तर तिची वाटच पाहत उभी होती. कारण आज तिला यायला खूप उशीर झाला होता. घरातील वातावरण गंभीर होते. हवेत तणाव होता. तिने पाहिले की एनाबेला आणि एलिना दोघीही मान खाली घालून कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांत भीती आणि अपराधी भावना दिसत होती. याचाच अर्थ की तिचे बिंग फुटले होते. मदर ने त्या दोघींची चांगलीच खरडपट्टी काढलेली दिसत होती.

मदरने आपल्या जादुई क्रिस्टल मध्ये एलिझाबेथ कोठे आणि कुणा बरोबर होती हे पहिले होतेच. त्यामुळे एलिझाबेथला काहीही स्पष्टीकरण देता येणार नव्हते. एलिझाबेथला पाहताच मदरची तळपायाची आग मस्तकात गेली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने एक सणसणीत तिच्या कानाखाली वाजवली. ती आवाज घरात घुमला. एलिझाबेथच्या गालावर मिरिंडाच्या हाताचा लालबुंद पंजा उमटला. मदरने तिचा हात घट्ट पकडून ओढतच तिला आत दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. दरवाजा जोरात बंद झाला.

आतून येणारा मदरचा रागीट आवाज आणि एलिझाबेथचे शांत, पण थरथरते शब्द बाहेर ऐकू येत होते.
0

🎭 Series Post

View all