पेमॉन (भाग 22)
असेच सहा दिवस निघून गेले. एलेना आणि एनाबेला यांनी त्या छोट्या मुलाला सांभाळायचा निर्णय घेतला होता. कारण ते मूल एलिझाबेथची शेवटची आठवण होती. एक जीवंत स्मृती, ज्याने त्यांच्या हृदयात आईचे प्रेम होते. सात दिवसांचे ते मूल शांतपणे खेळत राहिले. एनाबेलाच्या कुशीत ते तिला पाहून हसत असे, जणू काही त्याच्या छोट्या डोळ्यांतून एक अनोखी जादू वाहत होती. एलेना आणि एनाबेला त्याला खेळवत राहिल्या, त्याच्या हसण्याने त्यांच्या दुःखाला थोडेसे हलके करत होते.
पण हे शांत क्षण फार काळ टिकले नाहीत. अचानक एक गडगडाटी आवाज गूंजला, आणि आकाशातून एक विशाल ड्रॅगन उडत येताना दिसला. त्याच्या पाठीवर बसलेला शंग्रीला ' तेराईचा क्रूर रक्षक' ओरडला.
"एलेना आणि एनाबेला, बाहेर या! तुम्ही तेराईचा नियम मोडला आहे. तुम्ही मानवी मुलाला आत आणलेत. ते मूल माझ्या ताब्यात द्या!" त्याचा आवाज इतका भयंकर होता की गुहेतील भिंती हादरल्या. तो उडत्या ड्रॅगनवर बसूनच ओरडत होता, जणू काही तो स्वतः एक तुफान होता.
एनाबेला आणि एलेना घाबरून गेल्या. त्यांनी गुहेच्या आत अंग चोरून लपण्याचा प्रयत्न केला, पण त्या गडगडाटी आवाजाने मूल रडू लागले. त्याचे रडणे गुहेत गूंजले, आणि शंग्रीलाला त्याचा मागोवा घेणे सोपे झाले. त्याने ड्रॅगनला आदेश दिला, आणि ड्रॅगनने गुहेकडे एक प्रचंड आगीचा भपकारा सोडला. गरम झळ गुहेत आतपर्यंत पोहोचली, हवा जळू लागली, आणि धूर सर्वत्र पसरला. आता याच्याशी मुकाबला करण्याशिवाय पर्याय नव्हता. एलेना आणि एनाबेला यांनी एकमेकांकडे पाहिले, आणि एलेनाने निर्णय घेतला.
"एनाबेला, मी त्याला गुंतावून ठेवते. निकोबेल केव्हाही मितीच्या दरवाज्यापर्यंत येईल. तू मुलाला घेऊन तेथे पळ काढून मानवी वस्तीत निघून जा," एलेनाने निर्देश देत तिच्या उत्तराची वाट न पाहता बाहेर पडली. तिच्या डोळ्यांत निर्धार होता, जणू काही ती एक योद्धा विच असावी.
एलेनाला पाहताच शंग्रीलाने आपल्या ड्रॅगनला आदेश दिला.
"ड्रॅगन, अग्नीवमण लक्षभेदन!" त्यासरशी ड्रॅगनच्या तोंडातून एक प्रचंड आगीचा गोळा एलेनाच्या अंगावर झेपावला. तो गोळा इतका वेगवान आणि गरम होता की हवा जळून काळी होत होती.
पण एलेनाने ही त्याआधीच चपळाईने आपली जादुई छडी काढली आणि मंत्र उच्चारला.
"हिमकवच संरक्षणार्थ भिंतीरूपक फट्ट!" तिच्या आजूबाजूला एक मोठी बर्फाची भिंत तयार झाली.
जणू काही हिमालयातील एक भाग तेथे अवतरला असावा. ड्रॅगनची आग त्या भिंतीला लागून शांत झाली, आणि भिंत वितळून पाणी होऊन वाहू लागली, पण एलेना सुरक्षित राहिली.
एलेनाने आकाशाकडे छडी धरून मंत्र म्हटला. त्याच बरोबर एक निळी प्रकाशशलाका आकाशात उमटली, आणि त्यातून एक चमकदार युनिकॉर्न उडत तिच्या दिशेने आला. युनिकॉर्नचे शिंग सोनेरी प्रकाशाने चमकत होते, आणि त्याच्या पंखांनी हवा कापली. एलेनाने सराईतपणे त्याच्यावर उडी मारली आणि आकाशात झेप घेत शंग्रीलाच्या समोर युद्धासाठी उभी राहिली.
आता युद्धाची सुरुवात झाली होती. एक घमासान, हिंसक लढाई, ज्यात जादू, शक्ती आणि रक्तरंजित धैर्याची परीक्षा होणार होती.
तिने युनिकॉर्नला इशारा करताच, युनिकॉर्नच्या शिंगातून असंख्य तीक्ष्ण काटे ड्रॅगनच्या अंगावर जाऊन आदळले. ते काटे इतके वेगवान आणि धारदार होते की ड्रॅगनच्या कठीण कवचात खोलवर घुसले, रक्ताच्या फुटक्या उडवल्या, आणि ड्रॅगन वेदनेने किंचाळला. तो सरभ्रमित होऊन हवेत लटपटला, त्याच्या पंखांनी हवा फाडली, आणि रक्ताचे थेंब खाली पडू लागले.
पण शंग्रीला शांत राहिला नाही; त्याचा चेहरा क्रोधाने लाल झाला. त्याने शिफातीने ड्रॅगनला सावरले आणि आपली छडी उचलली.
"विषनाग धारा, शत्रूभेदन फट्ट!" एलेनाने मंत्र टाकला, आणि हवेत एक अजस्त्र विषारी नाग निर्माण झाला. तो नाग इतका भीमकाय होता की त्याचे सुळे विषाने टपकत होते, आणि तो शंग्रीलावर झेपावला, त्याच्या दातांनी हवा चिरली.
शंग्रीलाने लगेच उत्तर दिले. "गरुडधारण विषमर्दनम फट्ट!" त्याने आपल्या सभोवताली छडी फिरवत एक अग्नीगोल तयार केला.
त्या अग्नीतून एक आगीचा महाकाय गरुड निर्माण होऊन उदयास आला. गरुडाने डोळे लाल करून त्या नागाला चोचीत पकडले, त्याचे शरीर चिरून टाकले, रक्त आणि विष सर्वत्र उडवले, आणि शेवटी राख करून हवेत लुप्त केले.
आता शंग्रीलाने आक्रमक भूमिका घेतली. "पिशाच्चसैना विममर्दन शत्रूनाशक!" त्याने मंत्र म्हणून छडीतून एक काळा तरंग एलेनावर सोडला.
हवेतून चित्रविचित्र चेहऱ्याचे, विकृत आकाराचे असंख्य पिशाच्च निर्माण झाले. ते पिशाच्च किंचाळत एलेनावर धाव घेतले, त्यांच्या नखांनी हवा फाडली, आणि त्यांच्या दातांनी मांस चिरण्याची तयारी दाखवली.
एलेना घाबरली नाही. "पितृदेवम संरक्षणम!" तिने मंत्र उच्चारला आणि त्यावर विद्युतप्रवाह सोडला. ते विद्युतकिरण इतके तीव्र होते की पिशाच्च जळून भस्म झाले, त्यांचे शरीर फुटून रक्त आणि अवशेष सर्वत्र पसरले, आणि हवा धुराने आणि दुर्गंधाने भरली.
पण शंग्रीला थांबला नाही. त्याने ड्रॅगनला पुन्हा आदेश दिला, आणि ड्रॅगनने एक प्रचंड आगीची वावटळ एलेनाकडे सोडली. ती वावटळ इतकी हिंसक होती की तिने आजूबाजूच्या झाडांना जाळून टाकले, आणि एलेनाच्या युनिकॉर्नला धडक दिली.
एलेनाने युनिकॉर्नला वळवले आणि "वज्रकवच अभेद्य फट्ट!" म्हणून एक विद्युतकवच तयार केले. आग आणि विद्युत एकमेकांवर आदळले, आणि आकाशात एक प्रचंड स्फोट झाला. धमाक्याने गुहेतील दगड हादरले, काही दगड कोसळले, आणि हवा गरम होऊन गेली. स्फोटाच्या लहरीने एलेनाच्या युनिकॉर्नला जखम झाली, त्याचे पंख जळू लागले.
एलेना आणि शंग्रीला एकमेकांवर वार पालटवार करत होते. कोणीही हार मानायला तयार नव्हते. शंग्रीला समजत होता त्यापेक्षा एलेना कितीतरी शक्तिशाली निघाली होती. त्याच्या प्रत्येक मंत्राचे उत्तर तिच्याकडे होते.
त्याने "अंधकारबाण शत्रूघातक!" म्हणून एक काळ्या छायेचे बाण सोडले, जे एलेनाच्या दिशेने वेगाने आले. ते बाण इतके धारदार होते की ते युनिकॉर्नच्या एका पंखात घुसले, रक्त सांडले, आणि युनिकॉर्न वेदनेने किंचाळला.
एलेनाने "प्रकाशढाल संरक्षण फट्ट!" म्हणून एक चमकदार ढाल तयार केली, आणि उरलेले बाण ढालीवर आदळून नष्ट झाले. मग एलेनाने "जलप्रवाह महाविनाश!" म्हणून एक प्रचंड जलधारा शंग्रीलावर सोडली. ते पाणी इतके वेगवान आणि दाबदार होते की ड्रॅगनला भिजवून त्याची आग शांत करण्याचा प्रयत्न केला, आणि ड्रॅगनच्या कवचावर खोल खाचा पडल्या.
शंग्रीलाने हसत हसत उत्तर दिले. "वाष्पकरण अग्नीप्रहार!" त्याच्या मंत्राने पाणी वाफ होऊन गेले, आणि त्यातून नवीन आग निर्माण झाली, जी एलेनाकडे झेपावली आणि तिच्या युनिकॉर्नला जळवू लागली.
आता लढाई अधिक घमासान आणि हिंसक झाली. एलेनाने युनिकॉर्नच्या शिंगातून एक प्रकाशबीम सोडला, ज्याने ड्रॅगनच्या डोळ्यांना आंधळे केले आणि त्याच्या एका डोळ्यात खोल जखम केली, रक्त ओघळू लागले. ड्रॅगन आंधळेपणाने हवेत लटपटला, आणि शंग्रीला त्याला सावरत होता.
त्याने "भूकंप तरंग शत्रूभंजन!" म्हणून जमिनीवरून एक कंपन सोडले, ज्याने गुहेच्या आजूबाजूला दगड कोसळू लागले. एक मोठा दगड एलेनाच्या युनिकॉर्नला लागला, त्याचे हाड तुटले, आणि तो वेदनेने ओरडला.
पण शंग्रीला अजून थांबला नाही. त्याने एक नवीन, अधिक हिंसक मंत्र उच्चारला: "डिमॉनसैना रक्तपातक शत्रूनाश!"
हवेतून एक काळा धूर उमटला, आणि त्यातून असंख्य राक्षसी प्राणीbनिर्माण झाले. ते डिमॉन्स विकृत चेहरे, लांब नखे आणि दात असलेले होते, त्यांचे डोळे रक्तवर्णी चमकत होते. ते किंचाळत एलेनावर धाव घेतले, एकाने युनिकॉर्नच्या पंखात नखे घुसवली, रक्त सांडवले; दुसऱ्याने एलेनाच्या छडीकडे झेप घेतली, तिच्या हातावर खोल जखम केली. एलेनाने वेदनेने ओरडली,
पण तिने मंत्र म्हटला: "दिव्यशक्ति डिमॉननाश फट्ट!" एक चमकदार प्रकाश उमटला, ज्याने काही डिमॉन्स जळून भस्म झाले, त्यांचे अवशेष आणि रक्त हवेत पसरले. पण अजून डिमॉन्स येत होते. एकाने ड्रॅगनला युनिकॉर्नला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याने एलेनाच्या पायावर हल्ला केला, तिच्या मांसात दात घुसवले.
लढाई आता रक्तरंजित झाली होती. एलेनाच्या जखमा रक्ताळल्या होत्या, युनिकॉर्न जखमी होऊन लटपटत होता, तर ड्रॅगन आणि शंग्रीलाही जखमा झाल्या होत्या. डिमॉन्सची सेना हवेत गोंधळ घालत होती, किंचाळत, नखे आणि दातांनी हल्ले करत.
एलेनाने एक मोठा मंत्र उच्चारला: "महाविद्युत तरंग डिमॉनभंजन!" विद्युतच्या लहरींनी डिमॉन्सला भेदले, त्यांचे शरीर फुटून रक्त आणि अवशेष सर्वत्र उडवले. पण शंग्रीलाने नवीन डिमॉन्स बोलावले, आणि लढाई अधिक तीव्र झाली डिमॉन्स एलेनाच्या सभोवताली वळसे घालत, तिच्या जादूला आव्हान देत होते.
एलेनाने खाली पाहिले. एनाबेला बाळाला घेऊन जायच्या तयारीत होती. तिने हवेचे वावटळ उठवले आणि त्यात शंग्रीलाला त्याच्या ड्रॅगन आणि डिमॉन्ससोबत अडकवून ठेवले. त्या वावटळाची तीव्रता इतकी होती की हवा गर्जत होती, डिमॉन्स वावटळात फिरत फिरत जखमी होत होते, आणि शंग्रीला आत अडकला. त्याची कोणतीही शक्ती, मंत्र त्यात निष्क्रिय ठरत होते. त्याने रागात येऊन हातातील छडी आपल्या ड्रॅगनच्या मानेत घुसवली. ड्रॅगन वेदनेने आणि रागाने पिसाटला, आणि चोहु बाजूने आग ओकू लागला. त्या प्रचंड अग्नीने वावटळाची तीव्रता कमी झाली, डिमॉन्स मुक्त होऊन पुन्हा हल्ला करू लागले, आणि शंग्रीला बाहेर पडला.
एनाबेलला जाताना पाहून शंग्रीला जाम चिडला. त्याने एनाबेलावर बंदिस्तपाशची शक्ती फेकली. तो पाश विद्युतगतीने एनाबेलाच्या दिशेने सोसावला. एनाबेला बस्स काहीच अंतर त्या मितीच्या दरवाज्यापासून दूर होती.
हे एलेनाच्या लक्षात येताच तिने युनिकॉर्नला टाच मारून त्या पाशाच्या आणि एनाबेलाच्या मध्ये उभी झाली. त्याच बरोबर तो पाश एलेनाला बंदिस्त करून गेला. आणि एनाबेला एलेनाकडे पाहून अश्रूयुक्त डोळ्यांनी पाहत बाहेर पडून तिने ते द्वार आपल्या जादूने बाहेरून बंद केले.
पण इथे मात्र एलेना शंग्रीलाच्या कैदेत कायमची अडकली गेली, डिमॉन्सच्या किंचाळण्यात आणि रक्ताच्या दुर्गंधात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा