द परफ्युम फॅक्टरी (भाग ७)
प्रसादच्या आत्याने सुधाच्या आईला सुधास त्यांच्या सोबत राहू देण्याविषयी समजावून सांगितले. आत्याबाईंच्या सांगण्यावरून सुधाच्या आई पण तयार झाल्या. आत्याने आता प्रसादला शेवटची संधी दिली, सुधाशी बोलण्याची. त्याच्या मनातील भावना सुधाकडे व्यक्त करण्याची. ह्या तीन महिन्यामध्ये, प्रसादची मात्र कसोटी लागणार होती. प्रसादनेही अत्याकडून वचन घेतले कि ती ह्याविषयी कोणाशीच काही बोलणार नाही. आत्याला अतिशय खात्री आहे कि प्रसाद सुधाचे मन नक्कीच जिंकून घेईल.
तिथून पुढे...
"आत्या, खूप खूप थँक्यू ! तुम्ही सोबत आहात म्हणूनच आईने परवानगी दिली मला." घरी पोहोचल्याबरोबर सुधा आत्याबाईना म्हणाली.
सुधाच्या फायनल एक्साम संपल्या आणि आता कंपनी जॉईन करण्यासाठी एक दिवस आधी सुधा पुण्याला पोहोचली. प्रसाद चार दिवस आधीच आत्याला घेऊन पुण्याला पोहोचला होता. सुधाला पाहून आत्याबाईंनाही खूप आनंद झाला होता. प्रसादला तर अजूनही समजत न्हवते, कि कसे आणि काय होईल. सुधाला कसे आणि कधी सांगायचे काहीच ठरवले न्हवते त्याने. पण एक मात्र खरे होते कि त्याचा आंनद फक्त सुधाच्या आंनदात होता. त्याला सुधाला नेहमी आंनदी बघायचे होते. यासाठी तो काहीही करायला तयार होता.
"ठीक आहे गं! पण हे बघ घरात सगळी मदत करावी लागेल हं तुला. आणि थोड्यावेळाने प्रसाद तुला रोज ऑफिस ला जायचा यायचा रास्ता दाखवेल. तेव्हा नीट लक्षात ठेव. एकटीला जमलं पाहिजे ना रोज?"
"हो आत्या. मी करेन सगळी घरात सगळी मदत. खरच किती काळजी घेताय तुम्ही माझी! किती वाजता जायचंय प्रसाद?"
प्रसादच तर लक्षच न्हवते. विचारातच होता अजूनही तो. सुधाचा आवाज ऐकून भानावर आला आणि म्हणाला "कुठे जायचं आहे?"
"अरे तिला ऑफिस ला जायचा यायचा रस्ता दाखवशील ना आज? तिला काही माहिती आहे का इथली? तू दाखवून ये थोड्यावेळाने." आत्याबाई म्हणाल्या. "खरच कसं होणारेय ह्या मुलाचं? काहीच नाही कळत याला. मी एवढं सगळं जुळवून आणतिये पण कधी बोलणार काय माहित हा!" आत्याबाई मनातच विचार करत राहिल्या.
सामान सुमान लावून विश्रांती घेतल्यानंतर,प्रसाद तयार झाला बाहेर जाण्यासाठी. ब्लू कलरची जीन्स आणि काळा टी शर्ट एकदम खुलून दिसत होता त्याला. आत्याने खुणेनेच छान दिसत आहे असे सांगितले. तेवढ्यात सुधापण तयार होऊन आली. नेहमीप्रमाणेच सुधाने जीन्स आणि येलो टॉप घातला होता. प्रसादला बघून एक छानसे स्मित करत म्हणाली,"प्रसाद तुला असे कपडे खूप सूट करतात. नेहमी घालत जा."
खरतर सुधाच्या बोलण्याने प्रसाद खूप खुश झाला पण तसे न दाखवता म्हणाला,"हो का? पण शेतात काम करता नाही येत ना अशा कपड्यामध्ये! "
"अरे हो शेतात राहूदे पण एरवी तर घालू शकतोस?"
"हो, मग आज घातले ना! देश तसा वेष! बरोबर ना?... बरं चल आता लवकर"
प्रसादने तिला ऑफिस ला जायचा रस्ता, बस स्टॉप, इ माहिती दिली. आणि आजूबाजूची दुकाने डॉक्टर, मेडिकलचे दुकान हि पण माहिती दिली. बस नाही मिळाली तर रिक्षा कुठुन करायची हे पण सांगिले. प्रसाद सगळी माहिती काळजीपूर्वक तिला समजावून देत होता.
सुधा थोडी घाबरली होती. एवढ्या मोठ्या शहरात आता तिला एकटीला सगळे जमवायचे होते.
तीच्या चेहऱ्यावरची काळजी बघून प्रसाद म्हणला, "अगं काळजी नको करू. नीट जमेल तुला सगळं. "जमेल ना? खूप स्वप्न आहेत रे माझी."
"सगळी स्वप्न पूर्ण होतील बघ. हुशार आहेसच तू. स्वतःवर विश्वास ठेव."
"थँक्यू प्रसाद, तू नेहमी माझा कॉन्फिडन्स वाढवतोस! आणि खरतर आज तुझ्या घरच्यांमुळेच मला इकडे येण्याची परवानगी दिली आईबाबांनी."
"हो हो... बास आता तुझे आभार प्रदर्शन. चला लवकर घरी पोहोचुया आत्या वाट बघत असेल."
दोघे घरी परतले. जेवणं वैगेरे झाल्यावर सुधा म्हणाली, "प्रसाद आत्याच्या घरी पण तुझ्या शेतात यायचा तसा सुवास येतो आहे. तू काही रोपं घेऊन आला आहेस का? आणि आई म्हणत होती कि तुझेपणं काही काम असणार आहे इकडे?"
"रोपं? सगळी नाही पण थोडी आणली आहेत बाल्कनी मध्ये लावायला." सुधा उत्सुकतेने बाल्कनीकडे निघाली एव्हढ्यात प्रसाद म्हणाला "उद्या सकाळी बघ आता... लवकर झोप ऑफिस ला जायचेय ना सकाळी ? "
"हो रे... थोडी तयारी पण बाकी आहे अजून. पण तुझ्या कामाचे काय?"
“"अगं काही मशिन्स घ्यायची आहेत. फुलांपासून परफ्यूम तयार करण्याची. आणि अजूनही खूप महत्वाची कामं आहेत."
"अच्छा , म्हणजे हा तुझा अजून एक नवीन प्रयोग! वाह... कशा आयडिया येतात ना तुला? खूपच मस्त प्लॅन आहे तुझा! ऑल द बेस्ट! म्हणजे आता तू परफ्युम ची फॅक्टरी काढणार! आणि तुझ्याकडे ते स्पेशल रोप आहे ना त्याचा पण बनव हं. खूप मस्त आहे तो वास! कुठेच नाही मिळणार असा!"
"ओके ...ओके ... पण फॅक्टरी नाही डिस्टिलरी म्हणतात त्याला."
यार हि नेहमी कोणत्या फुलांच्या वासाबद्दल बोलते कळतच नाही. असा मनात विचार करतच होता तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला. फोन झाल्यानंतर तो म्हणाला,"बरं मला उद्या गावाला जावे लागेल. तिकडेही कामं थांबली आहेत. तिथे थोडी व्यवस्था लावून यावी लागेल. तसेही इथे लगेचच नाही आहे माझे काम. "
"ठीक आहे."
"गुड नाईट. आणि तुलाही तुझ्या नवीन कामासाठी खूप शुभेच्छा! मन लावून काम कर ऑफिस मध्ये. ऑल द बेस्ट!"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा