Login

द सायको किलर (भाग-१०)

Kasturi's Husband Can Tell About That Village House.
द सायको किलर... भाग 10.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, अविनाश त्या गावाकडच्या घरातले पुरावे घेऊन ब्युरोमध्ये आला.....तर हर्ष \"एम.एल कन्स्ट्रक्शन\" कंपनीत चौकशी करून आला..... मिस्टर कमलेशनी तयार केलेले सॉफ्टवेअर त्या फोन आणि लॅपटॉपला सपोर्ट करत होतं.... आता पुढे...)


"मिस्टर सुहास...! तुम्ही ह्यात काही मिळतंय का ते पाहू शकता......" मिस्टर कमलेश सुहासला म्हणाले.....

सुहासने संपूर्ण फोन चेक केला परंतु त्या फोन मध्ये काही सापडलं नाही....

"सर, ह्या फोन मध्ये काहीच नाहीये...!" सुहास ए.सी.पी सरांना म्हणाला....

"सर, आजकाल फोनमध्ये स्पेस राहण्यासाठी बहुतांश लोकं महत्वाचा डेटा गूगल ड्राईव्ह ला सेव करतात आणि गूगल ड्राईव्ह disable करतात...!" अवनी म्हणाली.....

"सुहास, त्या फोन मधलं गूगल ड्राईव्ह चेक कर अवनी म्हणते तसं त्यात काही असेल तर?....." ए.सी.पी सर सुहासला म्हणाले.....

सुहास ने लगेचच गूगल ड्राईव्ह enable करून त्यात काही डेटा आहे का? ते पाहिलं.....

"सर, ह्यात बराच डेटा आहे...!" सुहास ए.सी.पी सरांना म्हणाला.....

"बघू...!" ए.सी.पी सरांनी त्यातील एक-एक फाईल ओपन करायला सुरुवात केली....

त्या फाईल्स मध्ये बऱ्याच मोठ-मोठ्या कन्स्ट्रक्शन्स च्या ब्लू प्रिंट होत्या..... आणि दुसऱ्या काही फाईल्स मध्ये त्या ब्लू प्रिंटच्या टॉय structure चे फोटो होते..... तर काही ब्लू प्रिंट्स आणि टॉय structure च्या फाईल्स स्टार करून ठेवण्यात आल्या होत्या.....

"सर, ह्या सगळ्या ब्लू प्रिंट्स आणि टॉय structure एवढ्या सांभाळून का ठेवल्या असतील?..." रुपेशने ए.सी.पी सरांना विचारलं.....

"ह्या नुसत्या ब्लू प्रिंट्स फक्त दिसतायत, पण ह्यात नक्कीच काहीतरी आहे जे असूनही आपल्याला दिसत नाहीये....!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"म्हणजे?..." रुपेशने विचारलं....

"म्हणजे रुपेश हे बघ, ह्या ब्लू प्रिंट्सच्या खाली कोपऱ्यात बघ, एकदम बारीक अक्षरात काहीतरी लिहिलंय..... सुहास थोडं झूम कर...!आणि काय लिहिलंय ते वाच जरा...." अविनाश सुहासला म्हणाला.....

"मिस्टर अमन आठवले...!असं नाव लिहिलं आहे ह्यात..." सुहासने त्या ब्लू प्रिंट वरील नाव वाचलं.....

"हे तर शशिकांत कुलकर्णी यांच्या जुन्या \"शशी कन्स्ट्रक्शन\" कंपनीचे एम्प्लॉयी होते...पण त्यांचा ह्या सगळ्याशी काय संबंध असेल?..." रुपेश म्हणाला....

"सर, ह्या केसचा गुंता सुटायच्याऐवजी आणखी वाढत चाललाय...!" हर्ष ए.सी.पी सरांना म्हणाला......

"मिस्टर कमलेश, ह्या तुटक्या फोनला हे सॉफ्टवेअर कनेक्ट होतंय का ते बघता का?..." ए.सी.पी सर मिस्टर कमलेश ना म्हणाले.....

"हो सर, हे सॉफ्टवेअर त्या फोनला नक्की सपोर्ट करेल....!" मिस्टर कमलेश म्हणाले.....

"That\"s Great...! लवकर ते सॉफ्टवेअर ह्या फोनला कनेक्ट करा...!" ए.सी.पी सर मिस्टर कमलेश ना म्हणाले.....

मिस्टर कमलेशनी ते सॉफ्टवेअर तुटक्या फोनला जोडलं.....

"सर, ह्या मेमरी कार्डमधील सगळा डेटा उडाला आहे...!" मिस्टर कमलेश म्हणाले.....

"काय?.... कसं शक्य आहे?... आम्ही एकदाही मेमरी कार्डमध्ये पासवर्ड टाकला नव्हता....!" रुपेश म्हणाला....

"ओह नो...! म्हणजे मगाशी आपण मी बनवलेलं सॉफ्टवेअर ह्या फोनला कनेक्ट केलं होतं, ते सॉफ्टवेअर कनेक्ट केल्यामुळेच हे झालं असेल...!" सुहास म्हणाला.....

"हो, मगाशी मिस्टर उमेश म्हणालेच होते...!" ए.सी.पी सर म्हणाले....

"पण मग मिस्टर कमलेश, आता काही होऊच शकत नाही का? म्हणजे आपण त्यातला डेटा रिकव्हर नाही करू शकणार का?..." अविनाशने मिस्टर कमलेश ना विचारलं.....

"नाही सर...! त्यातील डेटा कोणी डिलीट केल्यानंतर किंवा डिलीट झाल्यानंतर पुन्हा रिकव्हर होऊ नये, किंवा पर्सनल डेटा लिक होऊ नये, म्हणून तर उमेश सरांनी अशी टेक्नॉलॉजी बनवण्याचा निर्णय घेतला होता...!" मिस्टर कमलेश म्हणाले....

"सर, कस्तुरीच्या ऑफिसमधील ऋषिकेश नावाच्या एम्प्लॉयीने सांगितलं होतं की कस्तुरीला गेल्या आठवड्यात सतत कोणाचातरी फोन यायचा आणि त्यानंतर ती टेंन्स व्हायची, कदाचित आपल्याला ह्या फोनमधून त्या व्यक्तीविषयी माहिती मिळेल....!" मनस्वी म्हणाली.....

"एक मिनिट,मी चेक करतो....!" सुहास म्हणाला.....

सुहासने फोनमधील कॉललॉग चेक केला.....
आणि ए.सी.पी सरांना म्हणाला,"सर, गेल्या आठवड्याभरात कस्तुरीला वेगवेगळ्या अननोन नंबरवरून कॉल्स आले आहेत....! त्यातला हा एक नंबर आहे, जो तीन ते चार वेळा आला आहे...!"

"हर्ष, मोबाईल कंपनीकडून ह्या नंबरचे सगळे डिटेल्स मागवून घे...!" ए.सी.पी सर हर्षला म्हणाले.....

_______________________________________


इकडे ए.सी.पी सरांनी सांगितल्याप्रमाणे अविनाशचा एक विश्वासू खबरी शांताबाईंच्या मागावर गेला होता....त्याने अविनाशला फोन लावला....

"हॅलो, साहेब...! \"कबुली\" बोलतोय....!" खबरी म्हणाला....

अविनाशचा खबरी \"कबुली\" हा अतिशय प्रामाणिक, आणि महत्वाचं म्हणजे आधीचा एक क्रिमिनल जो बऱ्याच वेळा जेलची हवा खाऊन आला होता, अश्या कबुलीला अविनाशने चांगल्या मार्गी लावलं होतं.....

कबुलीने आता बरीच चांगली कामं करत होता.... सगळ्या सी.आय.डी टीमला मदत करणं हेच त्याचं ध्येय त्याने ठरवलं होतं......

"बोल कबुली...! शांताबाईंविषयी काही माहिती मिळाली?..." अविनाशने विचारलं.....

"साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेले दोन दिवस शांताबाईंच्या मागावर आहे......

ही शांताबाई दिसते तेवढी साधी नाहीये..... भोळेपणाचा आव आणत ही शांताबाई.....
ती सतत घाबरलेली सुद्धा असते....तिच्या घरी एक-दोन माणसं येऊन-जाऊन असतात....

ती माणसं शांताबाईला नेहमी येतील तेव्हा दारातूनच एक खाकी रंगाचं पाकीट देऊन निघून जातात.....

ती काही घरांची घर कामं करते, आणि एका शांत, कमी रहदारी असणाऱ्या रस्त्याने एका मोठ्या बंगल्याकडे जाते....

त्या बंगल्याला बाहेरून कुलूप असतं, ते कुलूप उघडून ती आत जाते..... मला आधी असं वाटायचं की ती ह्या बंगल्याची देखरेख करत असावी, पण ती आत गेल्यावर असं मला जाणवतं की तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी आत आहे....

मी बऱ्याच वेळा आत कोणी आहे का? ते पाहण्याचा प्रयत्न केला.... पण बाहेरून त्या घरातलं काहीच दिसत नाही..... दारं, खिडक्या, पडदे सगळंकाही बंद असतं....." कबुली ने सगळी माहिती दिली.....

"काय?... तुला खात्री आहे की, त्या घरात नक्की कोणीतरी असतं?..." अविनाशने कबुलीला विचारलं.....

"काय साहेब?... \"कबुली\" ने दिलेली कबुली कधीच चुकीची नसते, हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही...." कबुली म्हणाला.....

"हो रे बाबा...! पण तू त्या शांताबाईंचा पाठलाग करत राहा....! मी तुझ्याशी नंतर बोलतो..." असं म्हणून अविनाशने फोन कट केला.....

ब्युरोमध्ये सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता, ते पाहून अविनाशने विचारलं,"काय झालं सर? कोणाचा आहे तो नंबर?...."

"तो नंबर तन्मय राऊत या नावाने रजिस्टर आहे...!" ए.सी.पी सर म्हणाले....

"मग मोबाईल कंपनीकडे त्यांचा पत्ता असेलच....!" अविनाश म्हणाला......

"सर actually, त्यांचं नाव तन्मय राऊत नसून दक्ष राऊत असं आहे.... आणि तो पत्ता देखील त्यांचा नाहीये, ते बाहेरगावी असतात..... रागिणी, कस्तुरी आणि सायली ह्यांच्याकडून मिळालेल्या फाईल्समध्ये त्यांचं नाव होतं....!" रुपेश म्हणाला.....

"ओह...! हर्ष तू एक काम कर ह्या नंबरवर फोन लाव...!" अविनाश म्हणाला....

अविनाशने सांगितल्याप्रमाणे हर्षने त्या नंबरवर फोन लावला, "सर, नंबर अस्तित्त्वात नाहीये...!" हर्ष म्हणाला.....

"नाहीच लागणार...!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"म्हणजे?" अविनाश म्हणाला....

"जो माणूस आपलं नाव खोटं लावून फिरू शकतो, त्या माणसाला सिम कार्ड नष्ट करावं एवढी बुद्धी नक्कीच असेल....!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"हो सर ते सुद्धा आहेच...!" मनस्वी म्हणाली.....

"सर, आपण मिस्टर महेश ना कॉल करून बघूयात का?...." हर्ष ने विचारलं....

"हो...! लाव, बघू त्यांच्याकडून काही माहिती मिळते का?..." ए.सी.पी सर म्हणाले.....

हर्ष ने मिस्टर महेश ना फोन लावला.... रिंग जात असूनही कोणी फोन उचलत नव्हतं....म्हणून शेवटी हर्षने व्हिडिओ कॉल लावला..... तीन-चार रिंग झाल्यानंतर मिस्टर महेश नी फोन उचलला.....

"हॅलो, मिस्टर महेश लिमये हिअर...!" मिस्टर महेश म्हणाले....

"हॅलो, मी सी.आय.डी मधून ए.सी.पी दिग्विजय देशपांडे बोलतोय....! आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे...." ए.सी.पी सर मिस्टर महेश ना म्हणाले.....

"माझ्याकडून?... माझ्याकडून कसली माहिती हवी आहे तुम्हाला?..." मिस्टर महेश म्हणाले.....

"तुमच्या कॉम्पिटिटर्स कंपनीच्या सर्वेसर्वांविषयी म्हणजेच रागिणी, कस्तुरी आणि सायली यांच्याविषयी आम्हाला थोडी माहिती हवी होती.....खरंतर आमचा एक ऑफिसर तुमच्या ऑफिसमध्ये गेला होता..... पण तुमच्या ऑफिसमधून समजलं की, तुम्ही इथे नसता...." अविनाश म्हणाला......

"हो, मी माझा business expand केला आहे.... so, मला बाहेरगावी मिटिंगसाठी यावं लागतं....!सॉरी सर...! पण माझ्याकडे त्या तिघींविषयी काहीच माहिती नाहीये....." मिस्टर महेश म्हणाले.....

"ईट्स ओके मिस्टर महेश...!"असं म्हणून ए.सी.पी सरांनी फोन कट केला......

_______________________________________


तेवढ्यात मिस्टर भालचंद्र ब्युरोमध्ये आले.....

"सर, कस्तुरीचा खुनी कोण आहे ते कळलं का?..." मिस्टर भालचंद्र नी विचारलं.....

"नाही....! आम्हाला तुमची मदत हवी आहे... हा फोटो बघा...!" ए.सी.पी सरांनी मिस्टर भालचंद्र ना फोटो दाखवला.....

"हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला?..." मिस्टर भालचंद्र नी आश्चर्याने विचारलं.....

तेव्हा अविनाशने त्या गावच्या घराचं वर्णन आणि पत्ता सांगितला.....

"म्हणजे हा फोटो तिथेच पडला होता...! कस्तुरीचा सगळ्यात आवडता फोटो होता हा.... ती ह्या फोटोची मोठी फ्रेम करून घरात लावणार होती पण....." मिस्टर भालचंद्र च्या डोळ्यात पाणी आलं.....

"शांत व्हा...! हा फोटो तिथेच पडला ह्याचा अर्थ मला समजला नाही.... तुम्ही त्या जागी गेला होतात का?...." अविनाशने विचारलं.....

"हो, म्हणजे आधी आम्ही तिथेच राहायचो....!

पण मग आम्हाला तिथून ऑफिससाठी येणं-जाणं कठीण होऊ लागलं..... म्हणून शेवटी आम्ही ते घर विकलं, अगदी फर्निचर सकट....!

तसंही माझ्या लग्नानंतर एक-दोन वर्षात माझी बदली पुण्याला झाली.....मग कस्तुरीने एकटीने अशा शांत ठिकाणी राहणं मला धोकादायक वाटलं....

म्हणून मी कस्तुरीसाठी मुंबईत फ्लॅट घेतला..... मुंबईसारख्या ठिकाणी कस्तुरी एकटी राहत असली तरी सुखरूप राहील असा विचार करून मी बिनधास्त पुण्याला राहायचो आणि शनिवार-रविवार मुंबईला यायचो....."मिस्टर भालचंद्र म्हणाले.....

"तुमच्याबरोबर फोटोमध्ये ज्या आहेत त्या कोण आहेत?..." अविनाशने विचारलं.....

"सर, ही तर विमल आहे...! आमच्या घरातली सगळी कामं तीच करायची आणि आमच्याच घरी राहायची.... ती जरी कस्तुरीबरोबर थांबली असती तरी मी ते चांगलं घर विकलं नसतं, पण अचानक विमलच्या भावाची तब्येत बिघडली म्हणून तिला गावी जावं लागलं....." मिस्टर भालचंद्र म्हणाले....

"आत्ता सध्या कुठे असतात त्या?..." ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"सर, ती गावाला गेली ती परत आलीच नाही...! तिने एकदा गावावरून फोन केला होता, की मी आता तिथे येऊ शकत नाही माझा भाऊ जागेवर आहे, त्याचं सगळं करावं लागतं.....

असं म्हंटल्यावर आम्ही तिला जबरदस्ती केली नाही आम्ही घर बदलण्याचा निर्णय घेतला....." मिस्टर भालचंद्र म्हणाले.....

"तुम्ही ते घर कोणाला विकलं? काही आठवतंय का?..." अविनाशने मिस्टर भालचंद्र ना विचारलं.....


*******************************************


कस्तुरीच्या तुटक्या फोन मध्ये आणखी काही सापडेल?...

शांताबाई नक्की कोणत्या बंगल्यावर जात असतील? आणि का?....

भालचंद्र नी ते घर कोणाला विकलं असेल?....


पाहूया पुढच्या भागात.....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all