Login

द सायको किलर (भाग ३)

Shantaa Bai Can Go Away From Mayur And Harsh. Shantaa Bai Gives Information About Vimal. But Now New Case Can Come, The Murder Of Kasturi.


द सायको किलर..... भाग 3.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(मागील भागात आपण पाहिलं, डॉक्टर निशाद नी रागिणीच्या मृत्यूचं कारण सांगितलं.....
मयूर आणि हर्ष शांताबाईंच्या घरी गेले असता, घराला कुलूप होतं..... पण मयूरबरोबर अनोळखी व्यक्तीला पाहून शांताबाई त्यांच्यापासून लांब पळाल्या..... आता पुढे....)


"शांता मावशीsss....! अहो, थांबा ना...!" मयूर शांताबाईंच्या मागे पळाला....

"थांबा...! मयूर तुम्हाला किती हाका मारतोय...!" अचानक हर्ष दुसऱ्या गल्लीतून शांताबाईंच्या समोर आला.....

"शांता मावशी, अहो का पळत होतात तुम्ही?....आम्हाला पण दमवलंत..." मयूर म्हणाला.....

"मी... मी कशाला पळू...!" शांताबाई घाबरत म्हणाल्या....

"मावशी आपण तुमच्या घरी जाऊन बोलूयात का?" मयूर ने शांता मावशींना विचारलं.....

"ह.... हो...!"शांताबाई अजूनही घाबरलेल्याच होत्या....

मयूर, हर्ष, आणि शांताबाई त्यांच्या घरात आले.... मयूरनेच शांताबाईंना पाणी दिलं आणि विचारलं,"काय झालं मावशी? तुम्ही मला आणि हर्ष ला बघून एवढ्या का घाबरलात?..."

"हा तुझा मित्र आहे का?" शांता मावशींनी विचारलं....

"नाही...! हा माझ्या मित्राचा कलीग आहे... सी.आय.डी ऑफिसर आहे...."मयूरने असं सांगताच अचानक शांताबाई रडू लागल्या व म्हणाल्या,"मला माफ करा साहेब...! मला माहिती नव्हतं विमल नक्की स्वभावाने कशी आहे...!"

"एक, एक मिनिट...! विमल कशी आहे म्हणजे? आम्हाला नीट सांगा..."हर्ष म्हणाला.....

"साहेब, काही दिवसांपूर्वी विमल माझ्याकडे आली.... म्हणजे माझी आणि तिची ती पहिलीच भेट होती..... तिला कुठेतरी काम हवं होतं, मला म्हणाली मला कामाची खूप गरज आहे..... म्हणून मी तिला रागिणी मॅडमकडे आणि आणखी दोन-चार ठिकाणी कामाला लावलं....."शांताबाई सांगू लागल्या....

"मावशी रागिणी मॅडमकडे तुम्ही जात होतात ना?" मयूर ने विचारलं.....

"हे बघ मयूर, तुला रागिणी मॅडम चा स्वभाव माहिती नसेल....

पण त्यांच्याकडे एकही कामवाली एका आठवड्याच्या वर टिकू शकत नाही....मी सुद्धा तिथलं काम दोन आठवड्यांपासून सोडलं.....

माझ्या जागी मी तिथे विमल ला लावलं.....विमल तिथे दोन आठवडे कशी टिकली ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय...."शांताबाई म्हणाल्या.......

"पण मग विमल नी असं काय केलं की तुम्ही म्हणताय तुम्हाला आधी माहिती नव्हतं?..."मयूर ने विचारलं.....

"ती विमल कामासाठी म्हणून आली पण नंतर नंतर बरेच जणं तिची तक्रार करू लागले..... ती लोकांच्या घरांत चोरी करू लागली.....

आणि काही दिवसांपासून बरेच गुंड माझ्याकडे येऊन विमलचा पत्ता विचारतायत, मला तिला शोधून काढण्यासाठी धमकी देतायत.....

म्हणूनच मी कोणी अनोळखी माणूस आला तर त्या माणसासमोर येत नाही....पण काय झालं तुम्ही हे सगळं का विचारताय?..." शांताबाईंनी विचारलं......

"रागिणी मॅडम चा खून झालाय....!"हर्ष म्हणाला.....

"काय खून?..." शांताबाई जवळपास ओरडल्या......

"हो..! तुम्हाला कोणावर संशय?..."हर्षने विचारलं.....

"साहेब,मी तुम्ही कोणासमोर माझं नाव घेऊ नका.....
त्या सावंत काकू आहेत ना, त्यांचं बऱ्याच वेळा रागिणी मॅडमशी भांडण व्हायचं....

गेल्याच आठवड्यात सावंत काकूंचा कचरा बाहेर राहिल्यामुळे त्यांचं रागिणी मॅडमशी भांडण झालं होतं.....
तेव्हा दोघींनी एकमेकींना जीवे मारण्याची धमकी दिली होती.....

आणि मी जेव्हा त्यांच्याकडे काम करत होते तेव्हा त्यांना बऱ्याच जणांचे फोन यायचे पण त्या लोकांना मी ओळखत नाही......त्यातला एक फोन मात्र अशोक साहेबांचा फोन यायचा ते मला माहिती आहे...... त्यांच्यात देखील खूप वाद व्हायचे......

बाकीचे फोन कोणाचे आणि कुठून यायचे ते काही मला माहिती नाही...." शांताबाईंनी त्यांच्याजवळ असलेली सर्व माहिती दिली.....

"काळजी करू नका, तुमचं नाव मध्ये येणार नाही.....!

तुम्ही त्या विमलचं स्केच बनवायला मदत करू शकता का?..." हर्ष नी विचारलं......

"हो...!" शांताबाई म्हणाल्या.....

"ठीक आहे, तुम्हाला माझ्याबरोबर ब्युरोमध्ये यावं लागेल...!"हर्ष म्हणाला.....

"थँक्स मयूर...! तुझी गरज लागली तर अविनाश सर तुला फोन करतील, तू आता येऊ शकतोस....!"हर्ष ने मयुरला जायला सांगितलं......

हर्ष शांताबाईंना घेऊन ब्युरोमध्ये आला…..

"सरss...! शांताबाई विमलचं स्केच बनवायला तयार आहेत..." हर्ष म्हणाला.....

"गुड...! अविनाश आपल्या स्केच आर्टिस्ट राघव ला बोलावून घे आणि विमलचं स्केच बनवून घे....!"ए.सी.पी सरांनी अविनाशला सांगितलं.....

स्केच आर्टिस्ट आल्यानंतर स्केच तयार होईपर्यंत हर्षने शांताबाईंनी दिलेली सर्व माहिती ए.सी.पी सरांना सांगितली.....

"सर..! स्केच तयार आहे...!" राघव म्हणाला.....

"गुड...!
शांताबाई तुम्ही येऊ शकता.... काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ..." ए.सी.पी सर म्हणाले.....

"म्हणजे रागिणीच्या केस मध्ये आपले तीन संशयित आहेत.....एक रागिणीचा नवरा अशोक, दुसऱ्या सावंत काकू आणि तिसरी म्हणजे विमल....."ए.सी.पी सर म्हणाले.......

तेवढ्यात ब्युरोतील फोन वाजला......

"हॅलो, सी.आय.डी ब्युरो, सिनिअर इन्स्पेक्टर अविनाश हिअर...!" अविनाशने फोन उचलला....

"सर, मी शहापूर एरियातून \"देवगिरी\" सोसायटीतून सेक्रेटरी मिस्टर अजय देसाई बोलतोय..... आमच्या सोसायटीत एक खून झाला आहे....." समोरून एका व्यक्तीचा आवाज आला.....

"ठीक आहे, आम्ही तिथे पोहोचतो....!"अविनाश म्हणाला.....

"सरss...! शहापूर एरियात आणखी एक खून झाला आहे..." अविनाश ए.सी.पी सरांना म्हणाला.....

"हर्ष तू आणि मनस्वी जाऊन या अशोक चा पत्ता शोधा.....!रुपेशsss, तू ह्या विमल चा कुठे पत्ता लागतो का ते बघा...! तोवर आम्ही जाऊन ही दुसरी केस हँडल करतो..."ए.सी.पी सर म्हणाले.....

अवनी, अविनाश आणि ए.सी.पी सर देवगिरी सोसायटीत आले.....

"सर, या मी मिस्टर रवी देसाई या सोसायटीचा सेक्रेटरी...! मीच तुम्हाला फोन केला होता...."मिस्टर रवी म्हणाले....आणि ए.सी.पी सरांना तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले.....

"हे बघा सर....!" घरातील एका स्त्रीच्या बॉडीकडे बोट दाखवत मिस्टर रवी म्हणाले.....

"ह्यांचं नाव काय?" अविनाशनी मिस्टर रवींना विचारलं....

"मिसेस कस्तुरी भालचंद्र मोरे....!"मिस्टर रवी म्हणाले....

"सरss, ह्यांच्या शरीरावर सुद्धा खोलवर चाकूने घाव केले आहेत...."अवनी बॉडी चेक करत म्हणाली....

"अवनी, बॉडी फॉरेन्सिकला पाठवून दे...!"ए.सी.पी सर म्हणाले......

"ओके सर...!" अवनी म्हणाली....

"ह्या इथे एकट्याच राहतात का?"ए.सी.पी सरांनी मिस्टर रवींना विचारलं.....

"हो सर...! म्हणजे ह्या 2 वर्षांपूर्वीच ह्या सोसायटीत राहायला आल्या आहेत..... ह्यांच्या घरचे पुण्याला राहतात, ते इथे येऊन- जाऊन असतात....."मिस्टर रवी म्हणाले.....

"ओ... त्यांना कळवलं का?" अविनाशनी मिस्टर रवींना विचारलं......

"हो सर, ते येतच असतील...!"मिस्टर रवी म्हणाले....

"सरss..! हा फोन मिळाला आहे, पण कोणीतरी हा फोन तोडण्याचा प्रयत्न केला आहे.... ह्यात सिमकार्ड सुद्धा नाहीये....." अवनी म्हणाली....

"हा फोन आपण आपल्या एक्स्पर्ट सुहास कडे देऊयात..... हा फोन तोडण्यात आला आहे, म्हणजे नक्कीच ह्यात काहीतरी आहे, सुहास ते नक्की शोधून काढेल याची मला खात्री आहे...." अविनाश अवनीला म्हणाल.....

"कस्तुरीss...!" मिस्टर भालचंद्र रडतच घराजवळ आले....पण तोपर्यंत कस्तुरीची बॉडी फॉरेन्सिकला पाठवण्यात आली होती.....

"excuse me, तुम्ही असं आत नाही येऊ शकत..."अविनाश मिस्टर भालचंद्र ना थांबवत म्हणाला.....

"साहेबss, माझी बायको...! काय झालं तिला? कोणी केलं हे सगळं? मी सोडणार नाही त्याला....!" भालचंद्र च्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही दिसत होतं.....

"ते आम्ही शोधून काढू तुम्ही शांत व्हा...!"ए.सी.पी सर म्हणाले.....

"हे सगळ्यात आधी कोणी पाहिलं?..." अविनाश नी विचारलं......

"ह्यांच्या कामवाल्या मावशींनी पाहिलं साहेब, त्या मावशींकडे कस्तुरी मॅडम च्या घराची दुसरी चावीसुद्धा आहे..... त्यांनीच हा सगळा प्रकार आधी पाहिला....." सोसायटीचे वॉचमन प्रीतकुमार म्हणाले.....

"कुठे आहेत त्या?"ए.सी.पी सरांनी विचारलं....

"साहेब, त्या ह्या सगळ्या प्रकाराला घाबरल्या आहेत.....!" प्रीतकुमार म्हणाले.....

"बोलवा त्यांना...!"ए.सी.पी सर म्हणाले.....

"शांताबाईss, पुढे या...!" प्रीतकुमार नी शांताबाईंना आवाज दिलेला पाहून ए.सी.पी सरांना आता शांताबाईंवर संशय येत होता.....

"साहेब, मला खरंच काहीच माहिती नाही हो...! मी नेहमीसारखी कामावर आले आणि पाहते तर....!" शांताबाई अचानक रडू लागल्या.....

"शांत व्हा तुम्ही...!" अवनी शांताबाईंना शांत करत म्हणाली.....

"ह्यांची कोणाशी दुष्मनी?" ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"नाही साहेब, कस्तुरी \"रॉबर्ट कन्स्ट्रक्शन\" कंपनीची सर्वेसर्वा होती...!ऑफिसमध्ये सगळ्यांना काय हवं- नको ते नीट पहायची...!

गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या कंपनीची इथे नवीन ब्रांच तयार झाली आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी कस्तुरीची इथे बदली केली...!" भालचंद्र म्हणाला.....

"प्रीतकुमारss, तुम्ही ह्या सोसायटीचे सेक्युरिटी गार्ड आहात, तुम्ही कोणत्या अनोळखी व्यक्तीला आत येताना पाहिलं आहे का?" ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"नाही साहेब...! अनोळखी असं कोणी आलं नाही...पण हो रवी साहेबांच्या कामवाल्या बाई तीन-चार दिवसांपूर्वी शांताबाईंची चौकशी करत होत्या.....
नंतर त्या कस्तुरी मॅडम च्या घरी देखील गेल्या होत्या आणि त्यांच्यात कशावरून तरी वाद झाला..... पुढे काय झालं ते काय मला माहिती नाही साहेब....!"प्रीतकुमार म्हणाले.....

"काय? कस्तुरी आणि भांडण? शक्यच नाही सर...! कस्तुरीचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि साधा होता.....ती परक्याला सुद्धा आपलं मानायची.....

आमच्या लग्नाला तीन वर्ष होऊन गेली अजूनही आम्हाला मुलबाळ नाही, म्हणून बरीच लोकं कस्तुरीच्या टोमणे मारायची, तुझ्यातच काहीतरी दोष आहे असं म्हणायची..... पण तरी ती त्याकडे दुर्लक्ष करून शांत राहायची..... कधीच कोणाशी वाद घालायची नाही....!" भालचंद्र म्हणाला......

"मिस्ट रवी तुमच्याकडे येणाऱ्या कामवाल्या मावशींचं नाव, नंबर आणि पत्ता आम्हाला सांगा...!" अविनाश मिस्टर रवींना म्हणाला.....

"विमलss...! विमल नाव आहे त्यांचं....!पण त्या कधीच कोणाशी भांडत नाहीत, खूप चांगल्या आहेत....त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून त्या आज कामावर आल्या नाहीत.....हा घ्या त्यांचा पत्ता आणि फोन नंबर...."मिस्टर रवींनी पत्ता आणि नंबर दिला.....

"ठीक आहे..! तुम्ही सगळे आता या...!
सॉरी मिस्टर भालचंद्र, पण तुम्हाला इथे ह्या घरात राहता येणार नाही...! आम्ही लवकरात लवकर गुन्हेगाराला शोधून काढू...!" असं म्हणून ए.सी.पी सर आणि त्यांची टीम तिथून निघाले.....

"सर..! मला वाटतंय की रागिणीचा आणि कस्तुरी चा खुनी एकच असावा....." अवनी म्हणाली.....

"हो अवनी मला सुद्धा तेच वाटतंय...! पण त्याआधी आपल्याला कस्तुरीच्या ऑफिसचा आणि महत्वाचं म्हणजे विमल चा पत्ता मिळाला आहे, आपल्याला त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागेल......मग आपण लवकरच गुन्हेगारपर्यंत पोहोचू असं मला वाटतंय...!"अविनाश म्हणाला.....

"नाही अविनाश...! ते वाटतंय तेवढं सोप्प नाहीये...!पण एवढं मात्र नक्की की ह्या शांताबाई जरी दाखवत नसल्या तरी त्या आपल्यापासून काहीतरी लपवतायत....! तुमचे काही खबरी शांताबाईंच्या मागावर लावा...." ए.सी.पी सर म्हणाले......

इकडे हर्ष आणि मनस्वी ने अशोक चा पत्ता रागिणीच्या घरात काही फाईल्स मध्ये अशोकच्या documents च्या झेरॉक्स होत्या त्यावरून शोधून काढला.....ते दोघेही अशोकच्या पत्त्यावर येऊन पोहोचले....


*******************************************

कस्तुरीच्या घरी मिळालेल्या फोन मध्ये काही सापडेल?....

हर्ष आणि अवनीला मिळालेला अशोकचा पत्ता खरा असेल?.....

ए.सी.पी सरांचा शांताबाईंवर असलेला संशय खरा असेल?.....

पाहुयात पुढच्या भागात.....

क्रमशः

(माझं फेसबुक अकाउंट नसल्याने मी गूगलवरून आपल्या ईराचं होम पेज बघत असते, मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचते....
ज्या वाचकांनी मला फेसबुकला कमेंट केल्या, करतायत आणि करतील त्यांना सगळ्यांना थँक्स....! मी रिप्लाय केला नाही म्हणून प्लीज कोणी नाराज होऊ नका....)
0

🎭 Series Post

View all