Login

द सायको किलर (भाग-५)

In Faorensic Lab Dr.Nishad Find The Approximately Hight Of Killer.


द सायको किलर..... भाग 5.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, डॉक्टर निशादकडे सायलीची बॉडी पाठवण्यात आली.... तर सुहासला कस्तुरीच्या घरी मिळालेल्या फोनमध्ये काही मिळतंय का? ते ए.सी.पी सरांनी बघायला सांगितलं.....इकडे रुपेश रागिणीच्या ऑफिसमध्ये पोहोचला.......आता पुढे.....)


"साहेब अहो, तुम्ही असं आतमध्ये नाही जाऊ शकत...!" रागिणीच्या ऑफिसचा सेक्युरिटी गार्ड रुपेशला अडवत ऑफिसच्या आत आला.....

"ओ साहेssब, कोण आहात तुम्ही? आणि असे आत कसे शिरलात? सेक्युरिटीs....!, काय चाललंय हे?तुम्हाला काय फुकट पगार देतो का आम्ही...!" एक सुटबुटातील व्यक्ती सेक्युरिटी गार्डला विचारत होती.....

"एक मिनिट..! मी सी.आय.डी ऑफिसर रुपेश...!" रुपेश त्या व्यक्तीला म्हणाला.....

"ओह..! सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही....
काय झालं सर? आमच्याकडून काही चूक झाली आहे का?..." समोरच्या व्यक्तीने विचारलं.....

"आपलं नाव?.."रुपेश ने त्या व्यक्तीला विचारलं.....

"मनोज पाटील...! मी ह्या कंपनीचा मॅनेजर आहे...."मनोज म्हणाला.....

"नाइस टू मीट यू...! मी इथे मिसेस रागिणी घोरपडे यांच्याविषयी चौकशी करायला आलो आहे..." रुपेश म्हणाला.....

"सर, गेले तीन-चार दिवस मॅडम आल्या नाहीयेत...!"सेक्युरिटी गार्ड ने रुपेशला सांगितलं....

"आज येतील त्या, आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर मीटिंग आहे त्यांची....!

मी सगळी तयारी सुद्धा करून ठेवली आहे....आता थोड्याच वेळात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सुद्धा येतील....." मनोज म्हणाला....

"बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं माहिती नाही, पण तुमच्या रागिणी मॅडम आता येऊ शकत नाहीत...!" रुपेश म्हणाला.....

"म्हणजे?.."मनोज रुपेशला अडवत म्हणाला.....

"त्यांचा खून झाला आहे...! त्याच संबंधात चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे.... तुम्ही सगळे co-operate कराल अशी आशा आहे....."रुपेश म्हणाला....

"खून ss...!" मनोज ने विचारलं......

"हो...!जरा सगळे इकडे या plz.....

मला सांगा ऑफिसमध्ये रागिणीचं कोणाशी वैर होतं का?" रुपेश ने ऑफिस मधील सगळ्यांना एकत्र बोलावून विचारलं.....

"हो सर...! रागिणी मॅडमशी त्यादिवशी समीर चं भांडण झालं होतं..." एक लेडी एम्प्लॉयी म्हणाली.....

"एss, नुपूरss..! तोंड सांभाळून बोल.... माझं मॅडमशी भांडण झालं म्हणजे काय मी त्यांचा जीव घेतला असं होतं का?..."समीर चिडून म्हणाला.....

"शांत हो समीर...!" मनोजने समीर आणि नुपूरच्या मध्ये मध्यस्ती केली......

"सर, ती कसं बोलतेय...!माझ्यावर सरळ सरळ आरोप करतेय...!" समीर अजूनही चिडलेला होता....

"तुम्ही सगळे शांत व्हा...! मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं द्या, बाकी कोणी काय केलं ते शोधण्याचं काम आमचं आहे...!" रुपेशने सगळ्यांना शांत केलं.....

"सरss, दोन-तीन दिवसांपूर्वी मॅडम अचानक हाफ डे घेऊन घरी गेल्या, त्यांना बरं वाटत नव्हतं असं म्हणाल्या..... तेव्हापासून त्यांचा फोन त्यांच्या केबिन मध्येच राहिला आहे, नंतर त्या ऑफिसला आल्याचं नाहीत...." नुपूर रुपेशला म्हणाली.....

"ओss, मला रागिणी मॅडमची केबिन चेक करायची आहे?...."रुपेशने मनोजला सांगितलं.....

"या सर...! ही रागिणी मॅडमची केबिन...!"मनोज रुपेशला रागिणीच्या केबिनमध्ये घेऊन आला......

रुपेशने सगळी केबिन चेक करायला सुरुवात केली.....रुपेशला नुपूरने सांगितल्याप्रमाणे एक फोन तिथे मिळाला.....

"हा रागिणी मॅडमचा फोन आहे का?..." रुपेशने मनोजला विचारलं.....

"हो सर...!" मनोज म्हणाला.....

रुपेशने सगळी केबिन व्यवस्थित चेक केली.... त्याला केबिनमध्ये रागिणीचा लॅपटॉप आणि एक फाईल सापडली...... त्या फाईलमध्ये बऱ्याच लोकांची नावं लिहिलेली होती, आणि काही नावं खोडली होती......त्याला संशय आला म्हणून त्याने ती फाईल स्वतःबरोबर घेतली......

"मी रागिणी मॅडमचा फोन, लॅपटॉप आणि ही फाईल नेतोय...!काही गरज वाटली तर पुन्हा येईन....." रुपेश मनोजला म्हणाला......

"ओके सर...!" मनोज असं म्हणेपर्यंत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स केतकी, यश, गार्गी आणि वैभव ऑफिसमध्ये आले.....

"गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम...!" संपूर्ण स्टाफ म्हणाला.....

"गुड मॉर्निंग...! हे काय आपल्या कंपनीत नवीन एम्प्लॉयी जॉईन झालाय वाटतं...." संपूर्ण स्टाफ मंडई वेगळ्या रुपेशला पाहून केतकी मॅडम म्हणाल्या.....

"नाही मॅडम...! हे सी.आय.डी ऑफिसर रुपेश...!
आणि सर हे आमच्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स...!"मनोजने ओळख करून दिली......

"मनोजss...! काय झालं आहे नक्की? तुम्हाला माहिती आहे ना की, आम्हाला कोणतंही काम चुकीच्या मार्गाने केलेलं चालत नाही...!" गार्गी चिडून म्हणाली....

"नाही मॅम, तसं काहीच नाहीये...!
आपल्या रागिणी मॅडम चा खून झालाय...! त्यांच्याच चौकशीसाठी सर इथे आले होते..." मनोजने सांगितलं.....

"खून? रागिणीचा स्वभावच सगळ्याला नडला आहे...! तिच्या ह्या भांडखोर स्वभावामुळे आपल्या कंपनीला मिळणारे अनेक मोठं-मोठे contract हातातून गेले...."सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपापसात बोलू लागले......

"तुमच्या पैकी कोणाला माहितीये का? किंवा आयडिया आहे का? हे सगळं कोणी केलं असेल?" रुपेशने विचारलं.....

"नाही सर...! आम्हाला नाही माहिती....!" यश म्हणाला.....

"ओके...! काही गरज लागली तर मी पुन्हा येईन असं म्हणून रुपेश ब्युरोमध्ये यायला निघाला.....

_______________________________________


इकडे मनस्वीसुद्धा कस्तुरीच्या ऑफिसमध्ये पोहोचली.....

"हॅलो मॅम...!हाऊ कॅन आय हेल्प यू?..." ऑफिसमधील रिसेप्शन वरील व्यक्तीने मनस्वीला विचारलं......

"मी सी.आय.डी इन्स्पेक्टर मनस्वी...! मला कस्तुरी मोरे यांच्याबद्दल थोडी चौकशी करायची आहे.... तुम्ही सगळ्यांना इथे बोलवा..." मनस्वीने सांगितलं.....

तशी ती व्यक्ती लगेचच एका केबिनकडे गेली.....
सगळा ऑफिस स्टाफ तिथे एकत्र जमा झाला.....

"हॅलो मॅम, मी ह्या कंपनी चा मालक....! मिस्टर रॉबर्ट डिसोझा.....! मी आज इथे सगळ्यांची कामं करण्याची पद्धत पाहायला आलो आहे....
तुम्ही इथे कसं येणं केलंत?..." मिस्टर रॉबर्ट म्हणाले.....

"मला इथे कस्तुरी मोरे यांच्याविषयी थोडी माहिती हवी आहे....." मनस्वी मिस्टर रॉबर्टना म्हणाली.....

"ओह..! आय अम सॉरी मॅम, बट गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी त्यांना भेटायला इथे येतोय, त्या आमच्या कंपनीच्या CEO आहेत ना....! पण त्या कामावर आल्याच नाहीयेत...." मिस्टर रॉबर्ट म्हणाले.....

"हो, त्यांचा खून झालाय....! त्या संबंधित चौकशीसाठी मी इथे आले आहे...."मनस्वी मिस्टर रॉबर्टना म्हणाली.....

"व्हॉट? कस्तुरी खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाची होती..... सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची.....multi-national level पर्यंत कंपनी नेण्यासाठी कस्तुरी फार मेहनत घ्यायची....." मिस्टर रॉबर्टना अश्रू अनावर झाले.....

"तुम्ही शांत व्हा...!" मनस्वी म्हणाली.....

"तुम्हाला हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत मॅडम...!" मिस्टर रॉबर्ट म्हणाले.....

"मला सांगा, ऑफिसमध्ये कस्तुरीचं कोणाशी भांडण होऊ शकत नाही किंवा झालं नाही असं तुम्ही म्हणालात....... मग कस्तुरीचं बाहेर कोणाशी भांडण किंवा दुष्मनी होती?..." मनस्वीने विचारलं......

"नाही मॅडम...!" संपूर्ण स्टाफ म्हणाला....

"हो मॅडम...! म्हणजे नक्की माहिती नाही पण असू शकते...!" स्टाफ मधील एक जण पुढे येऊन म्हणाला.....

"म्हणजे?.." मनस्वीने विचारलं.....

"मी ऋषिकेश...! कस्तुरी मॅडम गेल्या आठवड्यात खूप टेंशन मध्ये दिसत होत्या..... त्यांना सतत कोणाचा तरी फोन येत होता, त्या फोनवरील व्यक्तीवर बऱ्याच वेळा भडकल्या आणि नंतर अचानक शांत, घाबरल्यासारख्या झाल्या.....

पुढचे काही दिवस त्या शांतच होत्या, मग गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्या ऑफिसला आल्याचं नाहीयेत...." ऋषिकेश म्हणाला.....

"त्या कोणाशी बोलायच्या काही आयडिया?..."मनस्वीने ऋषीकेशला विचारलं....

"नो मॅम...!" ऋषिकेश म्हणाला.....

"ओके..! काही गरज वाटली तर पुन्हा येईन...!" असं म्हणून मनस्वी तिथून निघाली.....

_______________________________________


फॉरेन्सिक लॅबमध्ये डॉक्टर निशाद चाकूचे घाव नक्की कोणत्या दिशेने केले गेले ते पाहत होते.....

"दिग्विजयss..! मला सांग रागिणीची आणि कस्तुरीची बॉडी ज्या खुर्चीत होती, त्या दोन्ही खुर्च्या अंदाजे किती फूट उंच असतील?..." डॉक्टर निशाद नी ए.सी.पी सरांना विचारलं.....

" एक साधारण एवढी...! आणि दुसरी त्यापेक्षा थोडी मोठी....!"ए.सी.पी सरांनी हाताने खूण करून सांगितलं.....

"म्हणजे अर्धा फूट आणि एक फूट...!" डॉक्टर निशाद ए.सी.पी साहेबांना म्हणाले.....

"नाही माहिती रे...! तू तुझं तू बघ काय ते...!" ए.सी.पी सर डॉक्टर निशाद ना म्हणाले.....

हे सगळं पाहून डॉक्टर तेजस ना हसू आवरलं नाही, आणि ते एकदम हसले.....

"तुला काय झालं हसायला?..ये इकडे मला मदत कर...!"डॉक्टर निशाद म्हणाले.....

"हो सर...!" डॉक्टर तेजस हसतच पुढे आले....

"दिग्विजय...! रागिणीच्या शरीरावरील चाकूचे वार वरून खाली करण्यात आले आहेत..... म्हणजे नक्कीच खुनी रागिणीपेक्षा थोडासा उंच असावा....

आणि कस्तुरीच्या शरीरावरील चाकूचे वार हे थोडेसेच वरून खाली आहेत..... म्हणजे कस्तुरी आणि खुनी ह्यांच्या उंचीतील फरक जास्त नसावा....

तसेच सायलीच्या शरीरावरील चाकूचे घाव हे सरळ आहेत....कारण ती तुम्हाला जमिनीवर पडलेल्या अवस्थेत सापडली....." डॉक्टर निशाद म्हणाले......

"आम्हाला वाटणाऱ्या संशयितांमध्ये अशी एकही व्यक्ती नाहीये....म्हणजे हे सगळं कोणीतरी वेगळीच व्यक्ती करतेय....!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"आणखी एक महत्वाची गोष्ट, त्या गुन्हेगाराची उंची साधारणतः पाच ते सहा फूट असेल.......

ह्या तिघींवर झालेल्या चाकूचे वार हे थोडे ओबडधोबड असल्यासारखे आहेत.....

ह्याचा अर्थ गुन्हेगाराचा वार करताना वापरलेला गेलेला हात थरथरणारा असू शकतो...." डॉक्टर निशाद म्हणाले.....

अविनाश विमलचं स्केच आणि मिस्टर रवींनी दिलेला फोन नंबर सतत लावला, पण तो नंबर चुकीचा होता..... ह्याची अविनाशला खात्रीच होती.....

म्हणून मिस्टर रवींनी दिलेला पत्ता घेऊन अविनाश विमलचा शोध घेत-घेत त्या पत्त्यावरील एका गावात पोहोचला......


*******************************************

रागिणीच्या केबिनमधून रुपेशला मिळालेल्या पुराव्यांमधून काही सापडेल?....

कस्तुरीला कोणाचा फोन येत असेल?....

डॉक्टर निशाद नी सांगितलेली गुन्हेगाराची शरीररचना अशीच असेल?....

पाहूया पुढच्या भागात.....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all