©साक्षी माजगांवकर.
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)
*******************************************
(मागील भागात आपण पाहिलं, हर्षला मिस्टर शेखर वर संशय आला.....तर फाईलमधील व्यक्तीच्या पत्त्यावर रुपेश, अवनी आणि मनस्वी गेले...... हर्ष \"एम.एल.कन्स्ट्रक्शन\" मध्ये चौकशीसाठी गेला.....इकडे ब्युरोमध्ये मिस्टर उमेश टेक्नॉलॉजी विषयी माहिती द्यायला तयार झाले..... आता पुढे.....)
"हॅलो, सुरेश...! आपल्या न्यू टेक्नॉलॉजी चे सगळे डिटेल्स घेऊन सी.आय.डी ब्युरोमध्ये ये.....!" मिस्टर उमेश नी सुरेश नावाच्या व्यक्तीला फोन करून सांगितलं......
"सर...! माझा असिस्टंट सुरेश थोड्याच वेळात डिटेल्स घेऊन येईल....!" मिस्टर उमेश ए.सी.पी सरांना म्हणाले......
"तोवर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी चे फीचर्स आम्हाला सांगा....!" ए.सी.पी साहेब मिस्टर उमेश ना म्हणाले.....
"येस सर...! पण तुम्ही मला सांगू शकता का ही टेक्नॉलॉजी कोणी वापरली आहे? मला त्यांना भेटायचंय...!" मिस्टर उमेश म्हणाले.......
"ही टेक्नॉलॉजी ज्यांनी वापरली आहे त्यांचा खून झाला आहे....! आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे...." ए.सी.पी सर म्हणाले.....
"ओके सर...!" मिस्टर उमेश म्हणाले......
"सर...! ह्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी हालचाल जाणवते आहे.... म्हणजे ह्यात काहीतरी आतल्या आत घडतंय...!" सुहास म्हणाला......
"माय गॉड...! हे सॉफ्टवेअर लवकरात लवकर ह्या फोन पासून डिसकनेक्ट करा, नाहीतर ह्यातला सगळा डेटा उडेल आणि पुन्हा रिकव्हर करता येणार नाही....." मिस्टर उमेश त्या सॉफ्टवेअर मधील हालचाली पाहत म्हणाले......
सुहासने लगेचच ते सॉफ्टवेअर डिसकनेक्ट केलं.....
"मिस्टर उमेशss, ह्यातील काही डेटा तर उडाला नसेल ना?..." सुहास ने विचारलं.....
"डोन्ट नो...! म्हणजे ही टेक्नॉलॉजी, एखाद्या व्यक्तीची पर्सनल इन्फॉर्मेशन सेफली ठेवण्यासाठी बनवण्यात आलेली आहे.....
जेव्हा एखादा सायबर क्राईम होतो..... तेव्हा गुन्हेगार एखादं सॉफ्टवेअर जोडून व्यक्तीची पर्सनल माहिती घेतो आणि त्याचा गैरवापर करतो.....
हे सगळं रोखण्यासाठी आम्ही ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे..... म्हणजे जरी कोणी एखादं सॉफ्टवेअर जोडून ही टेक्नॉलॉजी वापरलेल्या फोन अथवा लॅपटॉप मधून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर त्या फोन मधील सर्व माहिती डिलीट होऊ शकते.....
महत्वाचं म्हणजे नंतर कितीही प्रयत्न केले तरी ती माहिती किंवा डेटा रिकव्हर होऊ शकत नाही.....
पासवर्ड सुद्धा उघडण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही....
पासवर्ड सुद्धा उघडण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही....
एकदाच बरोबर पासवर्ड टाकावा लागतो.... नाहीतर चुकीच्या पासवर्डमुळे देखील ह्यातला डेटा उडू शकतो......
त्यामुळे पासवर्ड टाकताना तिथे वॉर्निंग देण्याचं फिचर आम्ही सेट केलं आहे...." मिस्टर उमेश नी त्या टेक्नॉलॉजी विषयीची थोडक्यात माहिती दिली.....
"ह्या टेक्नॉलॉजी चं नाव काय आहे?..." ए.सी.पी सरांनी विचारलं.....
"ह्याचं नाव थोडं वेगळं आहे, \"सायब्योरिटी\" हे ह्या टेक्नॉलॉजी चं नाव आम्ही डीसाईड केलं आहे....!" मिस्टर उमेश म्हणाले......
"ओके...! पण मग तुमच्या टेक्निकल टीमला ह्या टेक्नॉलॉजी ला कसं ब्रेक करायचं हे माहिती असेलच ना?...." ए.सी.पी सरांनी मिस्टर उमेश ना विचारलं......
"हो सर...!"मिस्टर उमेश म्हणाले......
"मग वाट कसली बघताय? लवकर बोलवा त्यांना इकडे...!" ए.सी.पी सर म्हणाले......
_______________________________________
मनस्वी त्या फाईल मधील पहिल्या नावाच्या व्यक्तीचा म्हणजेच विजय गावडे यांचा पत्ता शोधत होती......
तो पत्ता असा होता:- \"स्मूर्ती\" बंगला, शांती नगर, देवगड गार्डनजवळ......
"काका...! हे शांती नगरचं \"देवगड\" गार्डनजवळ \"स्मूर्ती\" बंगला कुठे आहे?..." मनस्वी ने रस्त्यातील एका गृहस्थांना विचारलं......
"इथून सरळ जावा आणि डावीकडे वळा...!" ते गृहस्थ म्हणाले.....
"ओके, थँक्स...!" मनस्वी पुढे गेली......
मनस्वी त्या पत्त्यावर आली, पण तो बंगला बऱ्याच वर्षांपर्यंत बंद आहे असं वाटत होतं......
आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली.....
"काकू, ह्यांना इथे कधी पाहिलं आहे का?...." मनस्वीने एका काकूंना विचारलं.....
"नाही ग...! हा बंगला गेली कित्येक वर्षे बंद आहे..."समोरील काकू म्हणाल्या......
"ओके, थँक्स...!" असं म्हणून मनस्वी तिथून निघाली आणि विजय गावडे यांच्या दुसऱ्या पत्त्यावर जायला निघाली......
दुसरा पत्ता असा होता:- \"हवाई\" क्रमांक 4. उदय नगर \"लाईक होम-मेड टेस्ट\" हॉटेलजवळ......
"काका...! हे हॉटेल कुठे आहे माहिती आहे का?..." मनस्वीने एका झाडाजवळील भाजी विक्रेत्याला विचारलं.....
"अहो मॅडम, असं कोणतंच हॉटेल इथे जवळपास नाहीये....!" ते काका म्हणाले......
"मग हा पत्ता बघा ना...!" मनस्वीने त्या काकांना तो पत्ता दाखवला.....
"नाही मॅडम, हा पत्ता लिहिताना तुमची काहीतरी चूक झाली असेल.... असा पत्ता इथे नाहीये...." काका म्हणाले.....
"तुम्ही ह्यांना इथे कुठे आजूबाजूला बघितलं आहे का?....." मनस्वीने विचारलं......
"नाही...!" काका म्हणाले......
"ओके, थँक्स....!" असं म्हणून मनस्वी तिसऱ्या पत्त्यावर जायला निघाली......
तिसरा पत्ता असा होता:- इरामपूर पॅलेस घर क्रमांक 10, चंद्रा नगर....
पत्ता शोधत असतानाच तिने तिन्ही फोन नंबर डायल करून पाहिले..... पण तिन्ही नंबर अस्तित्वात नव्हते......
"काकू, घर क्रमांक 10 कोणता?...." मनस्वीने इरामपूर पॅलेस मध्ये येऊन एका काकूंना विचारलं......
"तो बघ तो...!" काकूंनी घर क्रमांक 10 कडे बोट दाखवलं......
मनस्वी घर क्रमांक 10 च्या दाराजवळ आली, आणि दार वाजवलं.....आतून एका व्यक्तीने दार उघडलं.....
"आपण कोण?..." समोरील व्यक्तीने विचारलं.....
"मी मनस्वी...! आपलं नाव?..."मनस्वीने विचारलं.....
"मी मिस्टर विनायक देवळेकर...!तुम्हाला कोण हवं आहे?" मिस्टर विनायकनी विचारलं .....
"मिस्टर विजय गावडे इथेच राहतात का?..." मनस्वीने विचारलं......
"कोण विजय गावडे?...." मिस्टर विनायक नी विचारलं......
"ह्यांना ओळखता का?..." मनस्वीने मिस्टर विनायक ना विजय गावडे चा फोटो दाखवला.....
"हो, हे तर आमच्या जुन्या कंपनीचे मालक आहेत....!" मिस्टर विनायक म्हणाले.....
"जुन्या कंपनीचे मालक?..." मिस्टर विनायक असं बोलल्याने मनस्वी गोंधळली.....
"हो, म्हणजे आमची जुनी कंपनी होती.....\"विजय कन्स्ट्रक्शन\" या कंपनीचे ते मालक होते..... पण चार-पाच वर्षांपूर्वी आमची कंपनी लॉस मध्ये गेली आणि बंद पडली....." मिस्टर विनायक म्हणाले.......
"ओह...! मग सध्या ते कुठे असतात काही माहिती आहे का?..." मनस्वीने विचारलं......
"ते बाहेरगावी असतात....! म्हणजे आमची कंपनी बंद झाल्यानंतर ते बाहेरगावी गेले असं ऐकलं आहे...." मिस्टर विनायक म्हणाले.....
"त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडे?..." मनस्वीने विचारलं.....
"नाही...! पण तुम्ही कोण आहात? आणि सरांची चौकशी का करताय?...." मिस्टर विनायक नी विचारलं.....
"माझं त्यांच्याकडे पर्सनल काम होतं...!मी येते...!"असं म्हणून मनस्वी ब्युरोमध्ये जायला निघाली.....
_______________________________________
इकडे अवनी त्या फाईल्स मधील दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजेच तन्मय राऊत यांचा पत्ता शोधत होती......
अवनीने देखील सगळे फोन नंबर आधी लावून पाहिले, पण ते नंबर सुद्धा अस्तित्वात नव्हते......
त्यातील पहिला पत्ता असा होता:- राणीमार्ग, राजकुमार सोसायटी, बी विंग दुसरा मजला, राणीपार्क जवळ......
अवनीने राणीमार्ग ते राणीपार्क सगळा एरिया पालथा घातला..... पण तिला राजकुमार सोसायटी सापडली नाही.....ती रस्त्यावर नारळपाणी विकत असलेल्या दादांजवळ गेली.....
"दादा...! हा पत्ता सांगता का?..." अवनी ने विचारलं.....
"ताई, असा पत्ता राणीमार्ग किंवा राणीपार्क मध्ये नाहीये..... तुमचा पत्ता लिहिण्यात काहीतरी घोळ झाला असेल...!" ते दादा म्हणाले.....
"हो का...! धन्यवाद...!" असं म्हणून अवनी ने दुसरा पत्ता पाहिला......
त्यातला दुसरा पत्ता असा होता:- तेलीकोट नगर, साईचरित्र अपार्टमेंट, पहिला मजला, तेलाच्या घाण्याजवळ.....
अवनीने तेलीकोट नगर मधील तेलाचा घाणा शोधून काढला......तेलाच्या घाण्यासमोरच साईचरित्र अपार्टमेंट तिला दिसली.....
पत्त्यात लिहिल्याप्रमाणे ती पहिल्या मजल्यावर आली..... पहिल्या मजल्यावरील फक्त एकच घर उघडं होतं.... बाकी सगळ्या घरांना कुलूप होतं, म्हणून तिने त्या घराची बेल वाजवली.....
"नमस्कार...! तन्मय राऊत इथेच राहतात का?..." अवनीने दार उघडलेल्या व्यक्तीला विचारलं......
"नाही...! मी मिस्टर एलरॉन फिटो...! कोण तन्मय राऊत?..." मिस्टर एलरॉन नी विचारलं.....
" ह्यांना ओळखता का?..." अवनी तन्मय राऊत यांचा फोटो दाखवत म्हणाली.....
"हो...! ह्यांचं नाव दक्ष राऊत आहे.... हे आमच्या जुन्या \"दक्ष कन्स्ट्रक्शन\" चे मालक आहेत.....चार-पाच वर्षांपूर्वी कंपनीला अचानक लॉस होऊ लागला म्हणून कंपनी बंद करावी लागली......
पण तुम्ही त्यांची चौकशी का करताय?... कोण आहात तुम्ही?...." मिस्टर एलरॉन नी विचारलं.....
"माझं थोडं पर्सनल काम होतं त्यांच्याकडे...! मला एका माझ्या मित्राने त्यांचा नंबर आणि पत्ता दिला.... पण दोन्ही चुकीचे निघाले....! तुम्ही त्यांचा नंबर किंवा पत्ता देऊ शकता का?..." अवनी ने मिस्टर एलरॉन ना विचारलं......
"नाही...! पण कंपनी बंद केल्यानंतर ते बाहेरगावी जाणार होते असं ऐकलं होतं...!" मिस्टर एलरॉन म्हणाले......
"ओके, थँक्स...!" असं म्हणून अवनी ब्युरोमध्ये जायला निघाली......
_______________________________________
रुपेश फाईल मधील तिसऱ्या व्यक्तीचा म्हणजेच शशिकांत कुलकर्णी यांचा पत्ता शोधत होता.....
त्यातील पहिला पत्ता असा होता:- उल्हासनगर, हाऊस नंबर 2, कबुतरखान्याजवळ.....
रुपेश कबुतरखान्याजवळील हाऊस नंबर 2 मध्ये आला..... त्याने दारावरची बेल वाजवली.....
बराच वेळ बेल वाजवल्यानंतर आतील व्यक्तीने दार उघडलं.......
*******************************************
फोन ला सॉफ्टवेअर जोडल्यामुळे त्यातला डेटा उडाला असेल का?.....
मिस्टर उमेश यांची टेक्निकल टीम पासवर्ड कसा ब्रेक करेल?.....
नक्की कोण असतील हे विजय, दक्ष आणि शशिकांत?....
पाहुयात पुढच्या भागात.......
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा