Login

द सायको किलर (भाग-९)

Software Can Ready To Attached A Laptop And Phone.


द सायको किलर... भाग 9.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(मागील भागात आपण पाहिलं, मिस्टर उमेश नी त्या न्यू टेक्नॉलॉजीचे संपूर्ण डिटेल्स मागवले....तर हर्ष \"एम.एल.कन्स्ट्रक्शन\" कंपनी मध्ये चौकशीसाठी गेला..... मनस्वी, अवनी आणि रुपेश फाईल मधील व्यक्तींचा पत्ता शोधत होते..... रुपेशने पत्त्यावरील घराचं दार वाजवलं..... आता पुढे....)


"मिस्टर शशिकांत कुलकर्णी इथेच राहतात का?..." रुपेश ने दार उघडणाऱ्या व्यक्तीला विचारलं.....

"नाही...! मी मिस्टर अमन आठवले, त्यांच्या जुन्या \"शशी कन्स्ट्रक्शन\" चा एम्प्लॉयी....!"मिस्टर अमन म्हणाले......

"ओss, हेच आहेत का ते?..." रुपेशने मिस्टर अमन ना शशिकांत चा फोटो दाखवून विचारलं.....

"हो...! पण आता सध्या ते बाहेरगावी असतात असं ऐकलं आहे...! म्हणजे आमच्या कंपनीला मध्ये लॉस झाला त्यांनतर कंपनी बंद पडली.....तेव्हापासून ते इथे नाहीत असं माझ्या ऐकिवात आलं....." मिस्टर अमन म्हणाले.....

"ओके...! तुमच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का?..." रुपेशने मिस्टर अमन ना विचारलं.....

"नाही...! पण तुम्ही कोण आहात?..." मिस्टर अमन नी विचारलं.....

"मी रुपेश...! माझं त्यांच्याकडे थोडं पर्सनल काम होतं...! जाऊदेत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद...." असं म्हणून रुपेश ब्युरोमध्ये जायला निघाला......

_______________________________________


इकडे अविनाशनी बुक केलेली कॅब आली..... अविनाश कॅब मध्ये बसला आणि ब्युरोमध्ये यायला निघाला.....

"साहेब, इथल्या मेन रोड च्या रस्त्यावर तेलाच्या टँकर चा अपघात झाला आहे....! त्यामुळे आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल....." कॅबच्या ड्रायव्हर नी अविनाशला सांगितलं......

"ओके, त्या रस्त्याने आपल्याला सी.आय.डी ब्युरोपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल?" अविनाश ने ड्रायव्हर ला विचारलं.....

"कमीत कमी दीड तास लागेल साहेब...!" ड्रायव्हर नी अविनाशला अंदाजे सांगितलं......

"ओके, चला...!" अविनाश म्हणाला......

_______________________________________


तोवर अवनी, रुपेश, आणि मनस्वी तिघेही ब्युरोमध्ये पोहोचले.....

"सर, मिस्टर विजय यांची एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती, ती कंपनी लॉस मध्ये गेली त्यांनतर ते बाहेरगावी गेले असं समजलं..... पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळाला....!" मनस्वी म्हणाली.....

"सर, मिस्टर तन्मय यांचं नाव तन्मय नसून दक्ष राऊत असं आहे....! त्यांची सुद्धा कंपनी लॉस मध्ये गेली आणि बंद झाली....... आणि ते सुद्धा बाहेरगावी गेले आहेत असं समजलं....." अवनी म्हणाली.....

"सर, मिस्टर शशिकांत ची सुद्धा कंपनी बंद झाली आणि ते सुद्धा बाहेरगावी गेले....!" रुपेश म्हणाला.....

"काय? सगळ्यांची कंपनी एकाच वेळी कशी लॉस मध्ये जाऊ शकते? ह्यामागे नक्कीच काहीतरी वेगळा डाव आहे....!" ए.सी.पी सर तिघांना म्हणाले.....

तेवढ्यात ए.सी.पी सरांना अविनाश चा फोन आला......

"हॅलो, सर...! मी इथून निघालो आहे, मला त्या घरात बरेच पुरावे देखील मिळाले आहेत..... पण मला यायला थोडा....." अविनाश सांगत होता.....

"हॅलो, अविनाश...! तुझा आवाज येत नाहीये...!" ए.सी.पी सर म्हणाले......

"हॅलो, सर...! माझा आवाज येतोय का? हॅलो....!" तितक्यात अविनाशचा फोन कट झाला......

"साहेब, ह्या एरियात नेटवर्क पकडत नाही....!" ड्रायव्हर अविनाशला म्हणाला......

ए.सी.पी सरांनी पुन्हा अविनाशला फोन लावला, पण फोन लागला नाही.....

तेव्हा मनस्वीने ए.सी.पी सरांना विचारलं,"सर...! कोणाचा फोन होता?..."

"अविनाश चा फोन होता...! तो काहीतरी सांगत होता पण बहुतेक नेटवर्क गेल्यामुळे फोन कट झाला...." ए.सी.पी सर म्हणाले.....

"सर, टेक्निकल टीमचा हेड आला आहे....!" मिस्टर उमेश म्हणाले.....

"बोलवा त्यांना...!"ए.सी.पी सर म्हणाले......

"हॅलो सर...! मी मिस्टर कमलेश निकम....\"न्यू फॉर फ्यु\" कंपनीतील टेक्निकल कंपनीचा हेड....!" मिस्टर कमलेश म्हणाले.....

"हॅलो...! तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा पासवर्ड ब्रेक करू शकता का?..."ए.सी.पी सरांनी विचारलं......

"हो सर..! पण त्यासाठी मला त्यात वापरलेली टेक्नॉलॉजी काढावी लागेल...!" मिस्टर कमलेश म्हणाले......

"म्हणजे? नक्की काय करणार तुम्ही?..."रुपेशने विचारलं.....

"त्यासाठी मला एक सॉफ्टवेअर तयार करावं लागेल, जे ह्या फोन्स आणि लॅपटॉप ला सपोर्ट करेल....! जोपर्यंत ते सॉफ्टवेअर तयार होत नाही, तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही....!" मिस्टर कमलेश म्हणाले......

"मग ते सॉफ्टवेअर बनवायला किती वेळ लागेल?..." ए.सी.पी सरांनी मिस्टर कमलेश ना विचारलं.....

"कमीत कमी दीड ते दोन तास...!" मिस्टर कमलेश म्हणाले.....

"प्लीज, लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा...!" मनस्वी मिस्टर कमलेश ना म्हणाली.....

"आय विल ट्राय माय बेस्ट...!" मिस्टर कलमेश म्हणाले....

"मिस्टर उमेश...! सॉरी, पण ही केस solve होईपर्यंत तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी चं लॉंचिंग करू शकत नाही...!" ए.सी.पी सर मिस्टर उमेश ना म्हणाले.....

"काय? सर, आम्ही दोन वर्ष ह्या टेक्नॉलॉजी चं काम सिक्रेट ठेवून केलं आहे आणि आता...." मिस्टर उमेश म्हणाले.....

"हो, आम्हाला मान्य आहे...! पण ही केस solve होईपर्यंत तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी चं लॉंचिंग करू शकत नाही..." ए.सी.पी सर म्हणाले......

"ओके सर...!" मिस्टर उमेश थोडे उदास होऊन म्हणाले.....

"सर...! सॉफ्टवेअर तयार होत आलं आहे...." मिस्टर कमलेश ए.सी.पी सरांना म्हणाले.....

"अरे वा...! म्हणजे आपल्याला केस solve करायला मदत होईल....." ए.सी.पी सर म्हणाले.....


_______________________________________


तिकडे हर्ष \"एम.एल.कन्स्ट्रक्शन\" च्या ऑफिस मध्ये पोहोचला.....

"हॅलो सर...!" रिसेप्शन वरील व्यक्ती म्हणाली.....

"हॅलो...! मला ह्या कंपनीच्या मालकांना भेटायचं आहे..." हर्ष म्हणाला.....

"तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का?..." रिसेप्शन वरील व्यक्तीने विचारलं.....

"नाही..! मी सी.आय.डी इन्स्पेक्टर हर्ष...! माझं तुमच्या सरांकडे काम आहे..." हर्ष म्हणाला....

मी सी.आय.डी इन्स्पेक्टर हे वाक्य ऐकताच एक एम्प्लॉयी धावत पुढे आला आणि म्हणाला, " साहेब, मी मिस्टर परेश शिरसाट...! आमच्या सरांचा राईट हॅन्ड....!" मिस्टर परेश म्हणाले.....

"ओह, हॅलो...! मला तुमच्या सरांकडे काम आहे, तुम्ही त्यांना बोलवता का मी केबिनमध्ये जाऊ..." हर्ष ने विचारलं.....

"आमचे सर इथे नसतात...! ते तर बाहेरगावी असतात...!" मिस्टर परेश म्हणाले....

"नाव काय तुमच्या सरांचं?..." हर्ष ने विचारलं.....

"मिस्टर महेश लिमये...!" मिस्टर परेश म्हणाले.....

"ठीक आहे, मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या...! मी त्यांच्याशी फोनवर बोलून घेतो...." हर्ष म्हणाला.....

मिस्टर परेश नी हर्षला मिस्टर महेश चा नंबर दिला पण फोन बंद येत होता.....

"फोन switch off येतोय...!" हर्ष म्हणाला.....

"सर, तिकडे आत्ता रात्र असेल ना, सरांना रात्रीचा फोन बंद ठेवण्याची सवय आहे....!"मिस्टर परेश म्हणाले......

"बरं...!मला सांगा तुम्ही इथे किती वर्ष झाली काम करताय?..." हर्षने मिस्टर परेश ना विचारलं.....

"ही कंपनी सुरू झाल्यापासून....!" मिस्टर परेश म्हणाले......

"मग मला सांगा, मिस्टर महेश नी \"एम अँड सी कन्स्ट्रक्शन\" या कंपनीवर केस का केली होती?...." हर्षने विचारलं......

"सर, अहो त्या कंपनीने आमच्या कंपनीचे काही structures चोरले होते...... आणि सगळा फायदा स्वतःच्या कंपनीला करून घेतला.....

ते structure बनवण्यासाठीची ब्लू प्रिंट आणि टॉय sturcture तयार करण्यासाठीची मेहनत व खर्च सगळा आमच्या कंपनीचा होता....

अशा वेळी कसं कोणी गप्प बसेल सर?...." मिस्टर परेश म्हणाले.....

"ओके, काही गरज लागली तर परत येईन...!" असं म्हणून हर्ष तिथून ब्युरोमध्ये जायला निघाला......

हर्ष जेव्हा ब्युरोमध्ये पोहोचला तेव्हाच अविनाशही ब्युरोमध्ये आला......

"सर, मी \"एम.एल.कन्स्ट्रक्शन\" मध्ये जाऊन आलो.... त्या कंपनीचे मालक म्हणजेच मिस्टर महेश लिमये बाहेरगावी असतात... त्यांच्या कंपनीचे काही structures \"एम अँड सी कन्स्ट्रक्शन\" कंपनीने चोरले होते, असं त्यांच्या एका विश्वासू एम्प्लॉयीकडून समजलं....मिस्टर महेश लिमये यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मिळाला आहे....!" हर्ष ए.सी.पी सरांना म्हणाला.....

_______________________________________


"सर, हे घ्या त्या बंद घरातील पुरावे...!" अविनाश कॅबचे पैसे देऊन आला आणि ए.सी.पी सरांना म्हणाला......

"विमलबरोबर ह्या फोटोत दिसणारी फॅमिली तर कस्तुरीची फॅमिली वाटतेय...!" ए.सी.पी सर त्यातील जुन्या फोटोकडे बघत म्हणाले.....

"हो सर...! मलाही तेच वाटतंय...!"अविनाश म्हणाला.....

"हर्ष...! मिस्टर भालचंद्र ना फोन करून बोलावून घे...!" ए.सी.पी सरांनी हर्षला सांगितलं......

हर्ष ने मिस्टर भालचंद्र ना फोन करून ब्युरोमध्ये यायला सांगितलं......

"सर, हे सॉफ्टवेअर ह्या फोन आणि लॅपटॉपला सपोर्ट करतंय....!" मिस्टर कमलेश ए.सी.पी सरांना म्हणाले.....

"व्हेरी गुड...! आता लवकर ह्या फोनचा पासवर्ड ब्रेक करा...." ए.सी.पी सर मिस्टर कमलेश ना म्हणाले.....

"हो सर... हे सॉफ्टवेअर आपण ह्या फोनला आणि लॅपटॉप ला attached करूयात.... म्हणजे ह्या दोन्ही मध्ये जे पासवर्ड ठेवण्यात आले आहेत ते न टाकता आपण माझ्या लॅपटॉप मध्ये त्यातील सगळा डेटा पाहू शकतो....!" मिस्टर कमलेश म्हणाले....

मिस्टर कमलेश नी सगळ्यात आधी रागिणीचा फोन सॉफ्टवेअरला attached केला.....

*******************************************


न्यू टेक्नॉलॉजी लॉंचिंगपूर्वी बाहेर कशी वापरण्यात आली?....

भालचंद्र चा आणि त्या गावच्या घराचा काय संबंध असेल?.....

रागिणीचा फोन सॉफ्टवेअरला जोडल्याने उघडला गेला पण त्यात काही माहिती मिळेल?.....

पाहुयात पुढच्या भागात.....