ओल्या सांजवेळी
शाळेची शेवटची घंटा वाजली. वर्गातल्या मुलांनी एकच कल्लोळ केला पण अविनाश वर्गात असल्यान, दोन मिनिटातच सारा वर्ग शांत झाला आणि मुलं आपापली दप्तर आवरून, दोन्ही हात जोडून, डोळे मिटून, एकाच आवाजात \"सदा सर्वदा योग तुझा घडावा\" म्हणू लागली.
मुलांच्या प्रार्थनेच्या आवाजात बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाचा आवाज पण मिसळुन गेला. शाळेच्या ऑफिसातली आपली बॅग आणि छत्री घेऊन अविनाश रस्त्याने चालू लागला. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच होती तेवढ्यात कोणीतरी अविनाशला हाक दिली
" अविनाश"- एक गोड स्वर.
पण अविनाशने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पायाखालचा पावसाने ओला झालेला काळाकुट्ट डांबरी रस्ता तो तुडवू लागला.
"अविनाssश "- परत एक आर्त,
हृदयाच्या तळातून हाक आली.
तरीही अविनाश आपली वहिवाट सोडायला तयार नव्हता. पण आता त्याच्या चालण्याचा वेग मात्र मंदावला होता.
"अविss"- एक पुसटशी कुजबुज जणू कोणीतरी अवि ला त्याची इच्छा नसतानाही थांबवत होतं, आणि अवि मात्र त्या आर्त सादेला अजिबात ओss देत नव्हता.
" अरे असं काय करतो? जरा हळू नाss . ओल्या रस्त्याने मला नाही चालता येत तुझ्यासारखं भरभर"-अवनी काकुळतीला येऊन म्हणत होती.
अविनाश -" अगं तुला कोणी म्हटलं माझ्यासोबत भराभरा चालायला. मी काही आमंत्रण घेऊन आलो नव्हतो तुझ्याकडे. " अविनाशच चिडक उत्तर.
अवनी -" अवि ऐ अवि ". अवनीच्या स्वरातली अर्जंवं आणखीनच वाढली.
अविनाश -"काय आहे?". त्याचा परत तोच तुसडा स्वर.
अवनी -"मला तुझ्याशी बोलायचयं!".
अविनाश -"आता बोलून काय उपयोग? काय फायदा?"
अवनी - "अवि!प्रत्येकाच गोष्टीचा केवळ फायदा आणि तोटा म्हणून विचार नाही ना केला जाउ शकत!"
अविनाश - "अरे वाह!हे तु मला सांगते आहेस. तू तुझ्या आयुष्यात फायदा आणि तोट्या शिवाय कशाचाही कधी तरी विचार केलाय का?"
अवनी -"या चिम चिम पावसात तुझ्यासोबत चालून पाय दुखलेत माझे. चल ना!त्या तळ्या काठच्या घाटावर बसु या!".
अविनाश -"अगं काय बोलते आहॆस तु? संध्याकाळचे सहा वाजत आहे, आकाशात ढग दाटून आले आहे, पावसाची रिमझिम सुरु आहे आणि तूला तळ्याकाठी जायचे आहे? तुला स्वतःला तरी तुझ्या बोलण्याचा अर्थ कळतो आहे का? ".
अवनी -"अव्या आता चालतो का?की, मी एकटीच जाऊन बसू तळ्या काठी?"
. अवनी च्या आवाजातली जरब म्हणा किंवा हृदयातली हाक अविनाश अवनी च्या मागे, मागे तळ्या कडे निघाला. दहाव्या मिनिटाला दोघेही टाळ्याकाठी बसले होते. वरून रिमझिम पाऊस सुरु होता. पावसाचे नाजुक थेंब तळ्याच्या पाण्यात पडून अनेक गोलाकार वर्तुळा चे वलयं बनून तळ्याच्या पाण्याच्या कुशीत एकरूप होत होते.
. किती तरी वेळ शांततेत गेल्यावर अवनीनेच मौन तोडले-
अवनी -"अविनाश कसा आहॆस? ". अवनी चा काळजी युक्त स्वर.
अविनाश -"तू जसं मला सोडून गेली होतीस तसाच ". आपल्या विस्कतलेल्या केसामधून हात फिरवत अवि म्हणाला.
अवनी -"मी कुठे तुला सोडलं?"
अविनाश -"त्या दिवशी शब्द देऊन सुद्धा तू आली नाही ना, मला भेटायला. "
अवनी -"त्या गोष्टीला आता दीड वर्ष उलटलं अवि. "
©® राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा