चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जलदलेखन
संस्काराचं बीज - भाग ३ (अंतिम)
"अहो, दृष्ट काढावी लागते."
"बस इथं!"
"बस इथं!"
तात्यांनी गुणाजीची परिस्थिती द्वारकामाईस सांगितली. विचारांच वावटळ मनात पिंगा घेत होतं!
एका आशेवर तेवत असलेला दिवा आज फडफडत होता. निष्कर्ष वेगवेगळे निघत होते. तात्यांचे डोळे आधाराची वाट पाहत होते. दिवस सरून दिवे लागणीची वेळ झाली होती.
माई देवासमोर दिवा लावून अळूची पाने धुवून अंगणात तात्याजवळ येऊन बसली.
"स्वामीदादा आला, स्वामीदादा आला."
गल्लीतल्या मुलांचा गोंगाट कानावर पडताच
ताड़कन दोघे ही अवाक झाले. आशेने पाणावलेले डोळे अन् पापण्यांची सीमारेषा ओलांडलेले अश्रू माई, पदरात लपवत मीठ आणि मिरची आणायला आत गेली.

"तात्या कसे आहात?"
स्वामी तात्यांच्या मांडीवर हात ठेवत म्हणाला.
स्वामी तात्यांच्या मांडीवर हात ठेवत म्हणाला.
या तीन शब्दांनी तात्याचं वाटीभर रक्त जागेवरच वाढलं होतं!
"एकदम ठणठणीत !"
तात्याच्या आवाजात अचानक बळ आलं होतं. जामवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून द्यावी अगदी तशीच!
तात्याच्या आवाजात अचानक बळ आलं होतं. जामवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून द्यावी अगदी तशीच!
माईने डोक्यापासून तळपायापर्यंत स्वामीची मीठ तसेच मिरचीने नजर काढली आणि आरती ओवाळली.
"हात पाय धू, म्या च्या टाकते."
"अगं, बस गं नंतर पिऊ चहा."
स्वामी माईचा हात धरून आपल्याजवळ बसवत म्हणाला.
स्वामी माईचा हात धरून आपल्याजवळ बसवत म्हणाला.
"माई, हे तुझ्यासाठी !" लुगडं आईच्या हातात ठेवत स्वामी माईकडे पाहत उत्तरला.
"तात्या, तुम्हाला घड्याळ आणलंय, बघा तर आवडतं का?"
"मला कशाला? मी कव्हा टेम पहायचो यात.आपलं वर सूर्याकडे पाहायचं आणि ओळखायचं." म्हणत तात्या उत्तरले.
"अरे, त्यांच्या चष्म्याची काच तेवढी नीट करून आण. एका काचेवर प्यापर वाचतूय ह्यो म्हातारा." म्हणत द्वारकामाय आत निघाली.
"आणतो गं माई, तू तेवढं चहाचं बघ बरं !"
"आणतो गं माई, तू तेवढं चहाचं बघ बरं !"
तात्या कौतुकाने लेकाने आईसाठी आणलेलं लुगडं न्हाहाळत होते अन् स्वामी त्यांचा अचंबित होऊन झालेला प्रफुल्लित चेहरा!
स्वामी फ्रेश होऊन पुन्हा बाजावर येऊन बसला.
चहा तयार होऊन स्वामीची वाट पाहत होता.
चहा तयार होऊन स्वामीची वाट पाहत होता.
"तात्या, खूप कष्ट केलेत हो तुम्ही आणि माईने. नको आता जास्त, आता सुखाचे दिवस पण अनुभवा ना! खूप मस्त आयुष्य आहे तुमच्यासमोर ते बघूया. इथे किती दिवस राहणार. मला पण तुमच्या सोबत राहायचयं."
दोघांचे डोळे ओले झाले होते. अश्रूंनी पापण्यांची सीमारेषा कधीच ओलांडली होती. अंधार असल्या कारणाने फार जाणवत नव्हतं. परंतु तिथली शांतता सर्व काही बोलून जात होती.
"आपण दोन तीन दिवसातच मुंबईला जाऊया. स्वामी आईच्या खांद्यावर हात ठेवत बोलत होता."
" खरचं, सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असते ते हे असे!"
" खरचं, सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असते ते हे असे!"
तात्या मनाशी विचार करु लागले.लहान असताना आपण छोटीशी बी काय पेरली. एवढं मोठं पीकं येईल वाटलं नव्हतं.
स्वामी आज तात्यांचा चश्मा होऊन धृतराष्ट्राचा संजय बनला होता. तर माईच्या काठीचा आधार होऊन अर्जुनाचा श्रीकृष्णचं !
स्वामी आज तात्यांचा चश्मा होऊन धृतराष्ट्राचा संजय बनला होता. तर माईच्या काठीचा आधार होऊन अर्जुनाचा श्रीकृष्णचं !
समाप्त.
डॉ. सुशांत भालेराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा