Login

मनवसंत

How to creat The Spring in Our Life
ओझे मनाचे फेकून देत
चल स्वप्नांच्या प्रदेशात
कल्पनांच्या रम्य अंगणात
जेथे मनवसंत फुलतात


स्वर जेथे सुस्वर होतात
मैफिली रंगतात
भावनांची आंदोलने
मना स्पर्शून जातात


जिथे ऋतू फक्त वसंत
बहर आणि हवा संथ
वाऱ्यावर मंद गंध
फुले उधळतात


फुलातला मधुर रस
भ्रमर चाखतात
फुलपाखरे अगणित
फुलाफुलांवर नाचतात

सोनसळी हळद माखून
सूर्यकिरणे फेर धरतात
कोवळे कोंब मातीतून
हळूहळू डोकावतात

हिरव्यागार रजईवर
मुले खेळतात
त्यांच्या सवे पशुपक्षी
आनंदाने बागडतात

जिथे फक्त सुखाची
अविरत बरसात
जिथे प्रेम आणि हर्ष
नित्य मिळतात

असेच स्वप्न पापणीत
रेखून घे  विश्वासात
आणि नव्या आशेने
टिकाव धर वादळात

.......योगिता मिलिंद नाखरे