द स्टंटमॅन - अनोखी प्रेमकथा - भाग 3 (अंतिम)

प्रेमकथा


द स्टंटमॅन - अनोखी प्रेमकथा - भाग ३(अंतिम)

"सानिका मी तुला खोट्या आशेवर ठेवणार नाही आणि जोपर्यंत मी यातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तुला काहीही सांगू शकत नाही. मी रोज मृत्यूचा सामना करत असतो".

आज सकाळपासूनच सलीलच्या मनात धडधढत होते कारण आजचा सीन जरा जास्त जोखमीचा होता. आज हिरो साठी त्याला जास्त उंचीवरून खाली पडायचे होते. खरंच सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाते तरी त्याचं मन अस्वस्थ होतं. घरातून निघताना त्याने देवाला नमस्कार केला आणि आईलाही नमस्कार केला. आईने विचारलं,

"का रे सलील आज अगदी नमस्कार करून जातोय."

" काही नाही ग. मनात आलं म्हणून केला नमस्कार."

तो स्टुडिओ मध्ये आला सगळी तयारी झालीच होती. हिरोने पण सलीलला काळजी घे असं सांगितलं. त्याला पाठीवरच पडायचं होतं. सगळीकडे नेहमीपेक्षा जास्त पॅडिंग केलं होतं. दिग्दर्शकांनी त्याला सांगितलं होतं की तू पाठीवरच पडशील याची पूर्ण काळजी घे. बघणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात भीतीची झाक दिसत होती. मारामारी करताना कठड्याजवळ आल्यावर हिरोला पडायचं होतं. दिग्दर्शकाने इशारा करताच हिरो खाली पडला सलील तयार होताच. पडताना तो देवाचे नाव घेतच होता. पडल्यानंतर सर्वजण त्याच्याजवळ आले पण सलील व्यवस्थित होता. त्याने देवाचे आभार मानले. शॉट ओके झाला होता. सलीलला थोडा वेळ बसण्यास सांगण्यात आले. तो घामाघूम झाला होता. त्यादिवशी त्याला लवकर घरी जाण्याची परवानगी मिळाली. घरी आल्यावर बिछान्यावर पडल्या पडल्या सलील विचार करत होता की आपल्या जीवनात चांगला बदल कधी घडेल. त्याच्या डोळ्यासमोर सानिका येत होती. ती त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. मनातून तो सुद्धा तिच्यावर प्रेम करत होत. विचार करता करता त्याला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सानिका संध्याकाळी त्याला भेटली तर त्याला म्हणाली,

"चल आपण जरा थोडा फेरफटका मारून येऊ." हो ना करताना सलील तयार झाला. दोघं एका गार्डनमध्ये गेले. तिथे बसल्यावर सानिका त्याला म्हणाली,

"सलील माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या नजरेत पण माझ्याविषयीचं प्रेम मला दिसत असतं."

"माझे तुझ्यावर प्रेम आहे पण मी काय आज आहे उद्या नाही असं माझं जॉब आहे. माझ्या बाबतीत काहीही होऊ शकतो कधी अचानक मृत्यू तर कधी अपंगत्व पण येऊ शकतं."

"सलील फक्त या कारणासाठी तू मला नाही म्हणून नकोस. अरे रस्त्यावर चालणाऱ्या माणसाचं देखील काहीही होऊ शकतं. ज्याच्या नशिबात जे असतं ते तसंच होत असतं. तू कायम हेच काम करत राहणार नाहीस एवढे तर मला नक्की माहिती. तुझं व्यक्तिमत्व नायकाला शोभेसं आहे. काय माहित कदाचित उद्या एखादा निर्माता तुझ्याकडे पाहून तुला नायकाची भूमिका ही देऊ शकेल. माणसाने आशावादी असावं. मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करू शकत नाही."

नंतर घरी आल्यावर पण सरीच्या मनात सानिकाचे बोल घुमत होते. त्याच्या मनात आलं खरंच जर मला नायकाची भूमिका मिळाली तर आपलं आयुष्य बदलून जाईल. मधल्या काळात सानिका आणि सलीम दोघांचंही पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं होतं. दिवस जात होते. सारिका जास्तीत जास्त सलीलच्या सानिध्यात राहू पाहत होती. सलील तिला नाराज करू इच्छित नव्हता.

एक दिवस सलील स्टुडिओमध्ये आला आणि शूट संपल्यावर दिग्दर्शकाने त्याला जवळ बोलावलं आणि एका इसमाशी ओळख करून देत ते म्हणाले,

"सलील एक मराठी चित्रपटाचे निर्माते आहे ते तुला बघून खूप खुश झालेत त्यांना तुझ्याशी बोलायचंय." सलीलला मनातून खूपच आनंद झाला . ते निर्माते त्याला म्हणाले,

"तू कधी शाळा कॉलेजमध्ये नाटकात काम केलं आहेस का. स्टेजवर वावरायचा तुला काही अनुभव आहे का. सलील म्हणाला,

" हो मी कॉलेजमध्ये असताना दोन नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता." ते म्हणाले,

" ठीक आहे" आणि त्यांनी त्याला एक पत्ता दिला आणि सांगितलं उद्या तू मला सकाळी दहा वाजता या पत्त्यावर येऊन भेट.

स्टुडिओतून निघताना त्याने सानिकाला फोन करून ही गुड न्यूज दिली आणि घरी आल्यावर आईला सुद्धा पहिल्याप्रथम हेच सांगितलं. आई म्हणाली,

" देवच पावला. तुला नक्कीच नायकाच्या भूमिकेसाठी पात्र ठरवतील." दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सलील त्या पत्त्यावर पोहोचला. तिथे त्या निर्मात्याबरोबर अजून दोन व्यक्ती होत्या. त्यांनी सलीलला एक संवाद दिला आणि तो म्हणून दाखवायला सांगितलं. तिथे सलीलची स्क्रीन टेस्ट ही झाली. सर्वच निकषांत सलील पात्र ठरला. निघताना निर्माते म्हणाले, "आम्ही दोन दिवसात तुला कळवतो."

सलील सानिकाला भेटल्यावर तिला म्हणाला,

"गेली तीन वर्षे मी हे काम करतोय. आज तुझ्या पायगुणामुळेच माझ्या आयुष्यात हे स्वप्नवत दिवस येत आहेत. खरंच तू माझ्या आयुष्यात गुडलक घेऊन आली आहेस."

"सलील आता तरी तू तुझ्या निर्णयाचा पुनर्विचार करशीलच ना. हिरो झाल्यावर तू मला विसरून जाणार नाहीस ना."

"सानिका ते कालत्रयी शक्य नाही. तुला पहिल्याच दिवशी बघितलं तेव्हाच तू मला खूप आवडली होतीस. परंतु केवळ जोखमीच्या कामामुळे मी तुझ्यापासून लांब राहत होतो. " दुसऱ्याच दिवशी सहलीला सानिकाला आपल्या घरी घेऊन आला. त्याच्या आईची त्याने ओळख करून दिली. चाणाक्ष आईच्या लक्षात आलं ही आपली भावी सुनबाई दिसते कारण आजतागायत सलील कोणत्याही मुलीला घरी घेऊन आला नव्हता. सानिकाने पण सलीला घरी बोलावलं. घरच्यांशी ओळख करून दिली आणि त्यांना सांगितलं आता लवकरच सलीलला तुम्ही मोठ्या पडद्यावर नायक म्हणून पाहू शकाल. त्यांना आनंद झाला.

सलील गेल्यानंतर सानिकाने आई-बाबांना म्हणाली, "माझं ह्याच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करू इच्छितो. तुमची काही हरकत नाही ना!" तिचे बाबा म्हणाले,

" लग्नाला आमची हरकत नाही परंतु सलीम आत्ता आहे तसाच पुढेही राहील याची तुला खात्री आहे का. चित्रपट सृष्टीत आपण नायकांच्या वेगवेगळ्या प्रेम प्रकरणात बदल त्यांच्या व्यसनांबद्दल ऐकतो. म्हणून आम्हाला भीती वाटते. तू कायम सुखी राहावं असं आम्हाला वाटतं."

"आई आणि बाबा तुम्ही अजिबात काळजी करू मला सलील बद्दल शंभर टक्के खात्री आहे. त्याने खूप हलाखीची परिस्थिती सहन केली आहे."

चित्रपट सृष्टीत सलील खूप यशस्वी ठरला. त्याचा पहिला चित्रपट लोकांनी खूप उचलून धरला. आयुष्यातील अनुभवाने सलील ने खूपच तळमळीने केलेली अॅक्टींग जनतेच्या मनाला स्पर्शून गेली. त्यानंतर सलीलने मागे वळून बघितलंच नाही. असं असलं तरी त्याचे पाय जमिनीवरच होते. त्याने ठरवल्याप्रमाणे सानिकाच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली. सलील च्या आईला सानिका सून म्हणून घरी येणार याचा खूपच आनंद झाला. खूपच साधेपणाने लग्न झालं आणि हो नाही करता सुरू झालेली प्रेम कहानी यशस्वीरीत्या पुढे चालू राहिली.

समाप्त

©️®️सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all