Login

*ध्येयवेडा संघर्ष...(Biopic Of Queen )*

चौथी पर्यंत पहिल्या 3 नंबर मध्ये असणारी मयुरी अलिकडे 2 वर्षात मेरीट लिस्ट मध्ये दिसत होती..अभ्यासात खुपच हुशार असणारी गुड्डु हल्ली महिन्यातून 5 ते 6 दिवस शाळेत येत न


माधवराव एक नावाजलेल व्यक्तिमत्व Tax Consultant आणी असोसिअशन चे अध्यक्ष होते..उच्च शिक्षण,सामजिक कार्य आणी उच्च विचार या मुळेच तर ते नावारूपाला आले होते. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असं त्यांचं कुटुंब होतं. त्यांच्या घरी कशाची कमी नव्हती पैसा, जमीन घरात नोकर चाकर सर्वकाही सुरळीत होतं.
मयुरी त्यांची 2 नंबर ची मुलगी अगदी माधव रावांची सावलीच होती. शिक्षण, दुसऱ्यांना मदत करायला तत्पर असणारे प्रेमळ आणि तेवढीच हळवी देखील... पप्पांची प्रिन्सेस होती ती...खुपच लाडात वाढलेली पप्पाच्या.
पण म्हणतात ना मुलगी हे परक्याचे धन असतं मुलींना शिकून काय करायचं आहे पुढे जाऊन त्यांना चूल आणि मूल हेच बघायच आहे या विचारांपासून सुरुवात झाली मयुरीच्या संघर्षाला....
माधव राव स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना मुलींच्या शिक्षणाबद्दल काहीच तक्रार नव्हती. आपल्या मुलींनी देखील चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हाव असे त्यांना वाटत असे पण याच्या अगदी विरुद्ध होती मयुरी ची आई.त्यांना पाच बहिणी होत्या सख्खा भाऊ नसल्यामुळे त्यांच्या मनात मुलांबद्दल जास्त माया होती त्यामुळे त्या फक्त मयुरी चा मोठा भाऊ भैय्या त्याच्याकडे जास्त लक्ष देत असे.. जोपर्यंत मुली आपल्याकडे आहे तोपर्यंत आपलं कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचं आणि तशाच पद्धतीने त्यांची आई मुलींचा सांभाळ करत होती. पण मयुरीच्या दोन बहिणी लहान असल्यामुळे त्यांना जास्त काहीच समजत नव्हते पण मयुरी परिस्थितीने खूपच समंजस झाली होती.. अगदी अल्लड वयात पण मयुरी मध्ये खूप जास्त समंजसपणा होता आणि हा समंजसपणा तिला पुढे जाऊन खूपच त्रासदायक ठरला.


चौथी पर्यंत पहिल्या 3 नंबर मध्ये असणारी मयुरी अलिकडे 2 वर्षात मेरीट लिस्ट मध्ये दिसत होती..
अभ्यासात खुपच हुशार असणारी गुड्डु हल्ली महिन्यातून 5 ते 6 दिवस शाळेत येत नसे..क्लास ला पण सुट्ट्या घेत होती..तिच्या अस वागण्याचा अर्थ तर कोणाला समजतच नव्हता..शाळेतील शिक्षक आणी क्लास चे शिक्षक अगदी घरी येउन तिची तक्रार करायला लागले की मयुरी हल्ली शाळेत रोज येत नाही.पण या सर्व गोष्टी पासूण पप्पा तर अनभिज्ञ होते..त्याना पुसटशी पन कल्पना नव्हती या गोष्टींची....

एकदा सकाळी असेच मयुरिचे शिक्षक यादव सर घरी आले आणी मयुरी तर घरीच होती.सर जुजबी बोलून सरळ मुद्द्यावर आले,
मयुरी खुपच हुशार मुलगी आहे.पन अलीकडे ती शाळेला सुट्टी घेते आणी कारण विचारल तरी फार काही बोलत नाही.तुम्हाला ही गोष्ट सांगायला घरी आलो कारण मयुरी सारखी हुशार मुलगी अस का करते याच कारण आम्हाला तर नाही सापडत ते तुम्हीच शोधुन काढा..

सर अस बोलून गेल्या नंतर तर पप्पांना खुप टेंशन आल की ही मुलगी शाळेत का नाही जात..तिला विचारायला जाण्याच्या हेतूने ते मयुरिच्या रुम कडे निघाले तस ईतक्या वेळ यादव सर आणी पप्पाच बोलन ऐकणाऱ्या मयुरी च्या आईने त्याना पुन्हा मागे बोलवून घेतल आणी चहा हातावर टेकवत म्हणाल्या तिला जरा बर वाटत नव्हत म्हणून तिला मीच शाळेत जाऊन दिले नाहिये..
तुम्हाला तर माहितीये ना तिला किती लागत आहे शाळेच
.तिला यादव सर आलेले सांगू नका.
जरा कचरतच आई बोलली पण त्याना आईचा स्वभाव माहित असल्या मुळे ते काहिच न बोलता निघुन गेले..
पुढे जायला उशीर व्हायला नको म्हणून रात्री आल्यावर आपण तिच्याशी बोलू या विचाराने ते घरा बाहेर पडले.


पप्पा निघून गेल्या नंतर आईने मयुरीचा रूम मध्ये जाऊन पाहिलं तर ती अभ्यास करत बसली होती पहिल्यापासूनच तिला अभ्यासाची आवड असल्यामुळे ती जास्त कशात लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे..आईला ते काही बघवल नाही त्यानी आवाज देतच तिला काहितरी काम सांगायच म्हणून किचन मध्ये घेउन गेली आणी काहितरी काम करायला सांगायच म्हणून भाकरी करुन घे अस मोठ्या आवाजातच सांगितल.
मयुरी आपली बिचारी सोशिक खुपच असल्या मुळे आणी आईला कस उलट बोलायच म्हणून गप्प राहुन तिच काम उरकून पुन्हा तिच्या अभ्यासाकडे गेली.


आईचा स्वभाव असा का आहे हे कधी समजलेच नाही तिला..वय खुप लहान असताना देखील ती खुप समजुतदार होती..तिला सेमी इंग्लिश घ्यायची ईच्छा असताना देखील घेऊ नाही शकली कारण आईचा विरोध होता..का होता?कारण माहितच नाही..





ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत लिहिली गेली आहे काल्पनिक नाही....

तर ही कथा आहे मयुरिची जी की खुप स्वतंत्र विचारांची, प्रबळ इच्छाशक्ती असणारी,ध्येयवेडी आणि जास्तच सोशिक आहे....!


कशी वाटला आजचा पहिला भाग कमेंट करुन नक्की कळवा...


Thank You.

राधा सुमित इंगवले.

0

🎭 Series Post

View all