दोष कुणाचा भाग दोन

Story Of A Dashing Unfortunate Girl


सारासार विचार करण्याची कुवत नसलेल्या शिरप्याला अशा वाक्याने खूप आनंद होत असे. त्याक्षणी त्याच्या अंगावरून जणू मोरपीस फिरे...... दिवसेंदिवस रमा विषयीच्या त्याच्या भावना अधिक तीव्र आणि गडद होऊ लागल्या होत्या........


पण रमाला आवडायचा राम ! राम चं वागणं, बोलणं , गावकऱ्यां विषयीची तळमळ, शेतीतलं नानाविध प्रयोग करणं... रामला ही रमा मनातून आवडत होतीच . गावातल्या प्रश्नांविषयी आणि आर्थिक स्तरातल्या शेवटच्या माणसाविषयी त्या दोघांच्याही मनात खूप तळमळ होती , त्यामुळेच आवड आणि विचार सारखे असल्याने राम आणि रमाचा प्रेमाचा अंकुर बहरायला वेळ लागला नाही ! एकमेकांवर निस्सीम प्रेम असूनही , दोघांचं वागणं कधी बेताल झालं नाही !! एकमेकांचा मान राखत, भावनांची जाणीव राखून , दोघही परस्परांची खूप काळजी घेत !!! वासनारहित निर्भेळ , निस्सीम प्रेमाचा मोगरा त्या दोघांच्या आयुष्यात उमलत होता. रमा आणि राम च्या लग्नाला दोन्हीकडून कुठलाच विरोध नव्हता ! पण नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं..........


दरम्यानच्या काळात शिरप्यानं रमा जवळ अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला...... कधी तो तिला हॉटेलात चल म्हणायचा ....., तर कधी तालुक्याला सिनेमा बघण्याचा आग्रह करायचा...... कधी भररस्त्यात तिचा हात धरायचा..... तर कधी सर्वांसमोर तिची छेड काढायचा..... पण प्रत्येक वेळी रमा संयमाने घ्यायची पण आता तीची ही सहनशक्ती संपली होती...... एके दिवशी शिरप्यानं छेडल्यावर रमानं त्याचा चांगलाच पाणउतारा केला.......

शिरप्या - "माझी राणी कुठे निघालीस एवढा उन्हाची? चल मी सोडतो माझ्या फटफटीवर."

रमा - "कोण आहेस तू ? समजतोस कोण स्वतः ला? आरशात तोंड पाहिलं का कधी स्वत:च? एक नंबरचा दारुडा आणि नालायक आहेस तू."


रमाच्या या वाक्यांनी शिरप्या अगदी पेटून उठला! पण भर बाजारात तो काहीच करू शकत नव्हता. राम आणि सखा पाटलांमुळे रमाने शिरप्या ची पोलिसात तक्रार केली नाही......... शिरप्या घरी आल्यावर सखा पाटलांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली,

पाटिल-"शिरप्या कशाला त्या चांगल्या पोरीचा वाकड्यात जातोस ? चार दिवस शांततेने तूही जग आणि आम्हालाही जगू दे !!"

पण पाटलांच्या या वाक्याने शिरप्याला काहीही फरक पडला नाही.....


असेच काही दिवस शांततेत निघून गेले \"आदर्शगाव समिती\" च्या मिटिंग करता आणि \"पाणी फाउंडेशन\" च्या संबंधात काही काम असल्याने राम चार दिवसांसाठी तालुक्याला गेला होता.... हीच संधी साधून सरपंचांच्या गाव गुंडांनी शिरप्याला भरीस पाडलं, रमा रात्र शाळेच्या मुलांना शिकवून घरी परतत असताना............