वेदनेलाही गोंजारले मी
स्वप्नांचे काळीजच चिरले मी
भान न आता कशाचे उरले
भावनांचे गळे घोटले मी
भावनांचे गळे घोटले मी
सांज हलकेच कातर होताना
अंधाराच्या खाईत लोटले मला मी
अंधाराच्या खाईत लोटले मला मी
करारच झाला होता देवापाशी
जन्मदात्यांनी सांगितले देवदासी मी
जन्मदात्यांनी सांगितले देवदासी मी
मज दुसऱ्यास अर्पण करण्याचा
हक्कच नाकारते मी
हक्कच नाकारते मी
भाळावरी दुःखच लिहिणाऱ्या
देवाचाही धिक्कार करते मी
देवाचाही धिक्कार करते मी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा