चोरी - भाग १

जेठालाल यांच्या दुकानातील चोरी

“तारक मेहता का उल्टा चश्मा”, आबालवृद्धांची जीवाभावाची मालिका.. याच मालिकेतील पात्रांभोवती गुंफलेली एक सहज,जलदकथामालिका खास आपल्यासाठी..

जेठालाल आज नेहमीप्रमाणे आपल्या टीव्हीच्या शॉप मध्ये निघाले. तेवढ्यात दयाबेन यांनी त्यांच्या हातात टिफिन दिला. हसतमुख चेहऱ्याने जेठालाल यांनी आपली बायको दयाबेन यांना निरोप दिला आणि ते उत्साहाने आजच्या दिवसातील कामकाज काय काय आहे असा विचार करत निघाले.

दुकानावर पोहोचताच त्यांना दुकानाचे लॉक फोडलेले दिसले. त्यांचे काळीज धस्स झाले. ते त्वरित दुकानामध्ये शिरले. समोर पाहिले तर त्यांना त्यांच्या दुकानातील टीव्ही मॉडेल्स गायब झालेले दिसले. तसेच मोबाईल हँडसेट्सचीही पाकिटे अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. अशी भयानक परिस्थिती पाहून त्यांच्या अंगाचे कापरे व्हायला लागले. काय करावे त्यांना काहीच सूचेना. त्यांनी स्वतःला सांभाळून घेत आल्या परिस्थितीला तोंड देणे स्वीकारले कारण नट्टू काका आणि बागा काही कामानिमित्त दोन दिवसांपूर्वीच बाहेर गेलेले होते.

आजूबाजूला सगळीकडे चौकशी करूनही कोणालाही याबाबत काहीही माहित नव्हतं. तरीही चोराबद्दल काही मिळते का हे चाचपडत ते बराच वेळ दुकानात थांबून होते.थोड्या वेळाने जेठालाल घरी आले. नेहमीप्रमाणे खुश असणारे जेठालाल आज अस्वस्थ आणि निराश वाटत होते, ही बाब दयाबेन यांना खटकली. त्यांनी जेठालाल यांना विचारले,

"काही झाले आहे का आज ?तुम्ही खूप उदास वाटताय."

"काही नाही गं..आज कामाचा खूप लोड होता. म्हणून जरा थकलोय."

जेठालाल आतील खोलीत गेले. तिथे ते खूप वेळ एकटक बघत शांत बसलेले होते. यातून मार्ग कसा काढावा हे त्यांना समजत नव्हते.त्यांना दयाबेन यांनी फापडा आणि जिलेबीचा नाष्टा दिला पण ते म्हणाले,

" मला सध्या काहीच खाण्याची इच्छा नाहीये."

शेवटी न राहवून दयाबेन यांनी जेठालाल यांना विचारले,

"अहो खरं खरं सांगा काय झालंय ते. सकाळी शॉपमध्ये जाताना तर तुम्ही एकदम खुश होते अन् असे उदास होऊन तर तुम्ही कधीच घरी येत नाही. नक्की काहीतरी झालं आहे. माझ्यापासून लपवू नका. प्लीज मला सांगा."


" कसं सांगू तुला! तुला तर माहीतच आहे आपल्या एकमेव उपजीविकेचे साधन म्हणजे आपले दुकान पण मी आज जेव्हा दुकानात गेलो ,तेव्हा मला दुकानात चोरी झालेली आढळली. बरेच टीव्ही मॉडेल्स चोरीला गेलेले आहेत, तसेच मोबाईल हँडसेटसही गायब आहेत. या महिन्यातील आपल्या खर्चाचे कसे होणार माहित नाही .काय करावे काही सुचत नाही.”
“ मग तुम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही का?”
“ हो. मी घरी येतानाच पोलीस कंप्लेंट करून आलो.ऐक, दुकानात चोरी झालेली आहे हे बाबूजींना सांगू नकोस. एक तर त्यांचं वय झालेलं आहे ते उगाच टेन्शन घेतील. आपल्या टप्पूची फीस ,या महिन्यातील घर खर्च आपण कसा पूर्ण करणार आहोत याची चिंता मला सतावते आहे म्हणून मला खूप टेन्शन आलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुकानात चोरी कोणी केली असेल?आपले चोरी गेलेले टीव्ही मॉडेल भेटतील का ?अशा अनेक प्रश्नांनी माझे डोके चक्रावले आहे .समोर काहीच मार्ग सापडत नाहीये."
आता पुढे काय होईल? जेठालाल या संकटातून कसे सुटतील?त्यांचे चोरी गेलेले सामान मिळेल? पोलीस चोरांचा तपास लावू शकतील? बघुया पुढील भागात..

भाग १ समाप्त..
फोटो : साभार गुगल

©® सौ प्रियंका कुणाल शिंदे

🎭 Series Post

View all