चोरी - भाग २

जेठालाल यांच्या दुकानातील चोरी


"हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. माताराणी आपल्याला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. तोवर मला वाटतं की आपण माझे दागिने सोनाराकडे गहाण ठेवू."दयाबेन

"काय ? तुझे दागिने? वेडी झालीस का तू?"

"अहो मग आपल्याकडे काय पर्याय आहे दूसरा? माझं ऐका. आपण उद्या बँकेत जाऊन दागिने सोनाराकडे गहाण ठेवून येऊ. तोपर्यंत पोलिसांकडून चोरीचा तपास लागेलच. हे बघा आपण कोणाचं वाईट केलेले नाहीये. त्यामुळे देव आपले काहीच वाईट करणार नाही. हिंमत ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. बाबूजींना आपण यातलं काहीही सांगायचं नाही. सर्व सुरळीत झालं की मग त्यांना आपण सांगू."
“ पण दया..”
“ आता पण नाही अन् बिन नाही..प्लीज..”

"ठीक आहे,तू म्हणतेस तर आपण तसंच करूया."

दुसऱ्या दिवशी जेठालाल आणि दयाबेन बँकेत जायला निघाले.तेवढ्यात बाबूजी त्यांना म्हणाले,

"कुठे निघालात दोघे?"

“ ते बँकेत थोडं काम होतं."जेठालाल

"आजपर्यंत बँकेतलं कुठलंही काम तू मला सांगून केलं नाहीस.मग आज परस्पर कसं काय चाललास बँकेत?"

"ते दागिने.."
दयाबेन यांच्या तोंडून चुकून हा शब्द निघून गेला...

“ दागिने? त्यांचं काय?”बाबूजी
“ते.. ब..”
“ अरे त त, प प काय करतोस सांग लवकर..”
“काही नाही म्हणजे ही म्हणत होती की मला राणी हार करायचा आहे,तर जुनी एखादी पोत मोडून टाकूया.”जेठालाल

"जेठालाल मी माझ्या सुनेला चांगलंच ओळखतो. तिला कुठल्याच गोष्टीचा हव्यास नाही, दागिन्यांचाही नाही. ती तुला असं म्हणू शकत नाही.खरं खरं सांग काय झालंय ते?"

"अहो बाबुजी काहीच झाले नाहीए!"

"हे बघ जेठालाल मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत.माझ्या सुनेला आणि तुलाही मी चांगलंच ओळखतो,तेव्हा माझ्यापासून काहीच लपवायचं नाही."

"बाबूजी खरंतर आपल्यावर एक संकट आले आहे."

दयाबेन यांनी जेठालाल यांना बाबूजींना सांगू नका असा इशारा दिला..

"हे बघ दया ,बाबूजींना आता आपल्याला खरं काय ते सांगावंच लागणार आहे.”

"जेठालाल बेटा,काय झाले ?सांग ना जरा नीट!"

"बाबूजी आपल्या दुकानात चोरी झाली आहे. दुकानातील टीव्ही मॉडेल्स चोरीला गेले आहेत. मोबाईल हँडसेटस् अस्ताव्यस्त झालेली आहेत. त्यामुळे मी पूर्ण हतबल झालो आहे. म्हणून मला काय करावे ते सुचेना. तशी मी पोलीस कम्प्लेंट देखील नोंदवून आलो आहे पण मग तोपर्यंत या महिन्यातील घरखर्च भगवण्यासाठी दयानेच मला हा मार्ग सुचवला त्यासाठीच आम्ही बँकेत निघालो होतो. तुम्हाला तर माहीतच आहे आपलं दुकान हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे. एवढ्या महागाच्या वस्तू चोरी गेल्याने आपले खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे खूप चिंता सतावते आहे."

"हे बघ बेटा जेठालाल,हे दागिने म्हणजे तुझ्या आईची निशाणी आहेत, कृपा करून त्यांना हात लावू नकोस. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू. माझ्यावर विश्वास ठेव. नक्की काहीतरी मार्ग निघेल कारण देव आपल्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही दोघेही खचून जाऊ नका."


आता पुढे काय होईल? कोण करेल जेठालाल यांच्या कुटुंबाला मदत?पाहूया, पुढील भागात..
फोटो: साभार गुगल
©® सौ प्रियंका कुणाल शिंदे




🎭 Series Post

View all