चोरी- भाग ३( अंतिम)

जेठालाल यांच्या दुकानातील चोरी


बाबूजींनी मेहता साहेबांकडे ह्या परिस्थितीविषयी चर्चा करायचे ठरवले.त्यानुसार ते संध्याकाळी मेहता साहेबांकडे गेले..सर्व सांगितल्यावर मेहता साहेब म्हणाले,
" बाबूजी,मला वाटतं की आम्ही सर्व सोसायटीतील लोक जेठालाल यांना यातून बाहेर काढू शकतो.आता ते कसं ?तर थोडीशी आर्थिक मदत करून."

"म्हणजे?ती कशी?"बाबूजी

" आता आपण सर्वात आधी सोसायटीचे चेयरमन भिडे सरांकडे जाऊया.त्यांचे ही मत घेऊ.ते सर्वांना म्हणजेच अय्यर स्वामी, हाथी भाई,सोनी साहेब यांना एकत्र बसवतील.मग आम्ही सर्वांना ही परिस्थिती सांगू.आपली माणसे मदतीला नक्की पुढे येतील."


" तुमचे खूप उपकार होतील मेहता साहेब. फक्त चोरीचा तपास लागू द्या,मग सर्व ठीक होईल."

" सर्व व्यवस्थित होईल.फक्त तुम्ही धीर धरा.आम्ही सर्व जण तुमच्यासोबत आहोत."

ठरल्याप्रमाणे,भिडे सरांनी सर्वांना या घटनेबद्दल सांगितले आणि सर्व जण जेठालाल यांना आर्थिक मदत करण्यास तयार देखील झाले.

जेठालाल आपली आपबीती त्यांच्याच एका प्रिय मित्राला भोले शेठ यांना जाऊन बोलले.त्यांची अस्वस्थता पाहून, खरेपणाची तळमळ पाहून,आर्थिक संकटात असताना इतरांनी त्यांना केलेल मदत पाहून,भोले शेठ यांना शरमेने लाज पडली.


"मित्रा मला माफ कर .खरं तर तुझ्या दुकानात मीच ही चोरी घडवून आणली होती."भोले शेठ

"काय? भोले शेठ तुम्ही हे काय बोलताय?"जेठालाल

"मी खरंच बोलतोय. खरंतर मी तुमच्या वाढलेल्या व्यवसायावर, तुमच्या दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीवर जळत होतो.मला तुमची इर्ष्या वाटायची,म्हणून मी तुमच्या दुकानात चोर पाठवले आणि चोरी घडवून आणली. मला तुम्हाला पूर्णपणे उध्वस्त करायचे होते."

"वा रे वा भोले शेठ. आपल्या एवढ्या वर्षांच्या मैत्रीची किंमत हीच लावली का तुम्ही? इथून पुढे माझा आणि तुमचा संबंध संपला."

"नाही नाही जेठालाल. माझं ऐकून घ्या. खरं तर मला माझ्या या गुन्ह्याचा खूपच पश्चाताप झालाय पण तुमच्या सोसायटीतील लोकांचा तुमच्याबाबत असणारा हा भावनिक आधार तसेच त्यांच्यातील एकोपा बघून मी भारावून गेलो आहे. माणुसकीचा अर्थ आज मी खऱ्या अर्थाने समजलो आहे. भली माणसे कधीच एकटी नसतात, त्यांची चांगली कर्मे त्यांना कुठल्याही संकटातून बाहेर काढतात.त्यांच्यात कुठलेही संकट पेलण्याची ताकद असते.खरंच आज मला नव्याने माणुस कसा हवा हे समजले आहे. तुमच्यासारख्या देव माणसाच्या पोटावर लाथ मारायला मी निघालो होतो ,पण आता हे माता लक्ष्मी माझ्याकडून हे जे खूप मोठे पाप घडले त्याबद्दल मला क्षमा कर.जेठालाल तुमची खरंच मी मनापासून माफी मागतो. तुम्हाला मला जी शिक्षा द्यायचे आहे ती मला मंजूर आहे,पण आपली मैत्री तोडू नका."

"हे बघा भोले शेठ. माणसाकडून चूका घडतच असतात. म्हणूनच प्रत्येकाने विचारपूर्वक चांगले कर्म करावे. तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप होतोय यातच सगळे आले. तरीही इथून पुढे मी तुमचा माल घेणार नाही,तरीही आपली मैत्री कायम राहील. आपल्या चुकीची थोडी तरी शिक्षा माणसाला भोगावीच लागते,चला येतो मी."

"बरोबर बोलताय तुम्ही जेठालाल. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली.तुमची शिक्षा मला मान्य आहे. परंतु आपली मैत्री अबाधित राहू द्या. मी आजच तुमच्याकडे तुमचे चोरी गेलेले टीव्ही मॉडेल्स पाठवून देतो."

जेठालाल यांनी आपल्या मैत्रीखातर चोरीविषयी केलेली पोलीस कम्प्लेंट मागे घेतली आणि ते घरी आले.त्यांनी बाबूजींना तसेच सोसायटीतील सर्वांना चोरीमागील सत्य सांगितले. सर्वांनी जेठालाल यांच्या निर्णयाचे कौतुक केले आणि कुठल्याही परिस्थितीत आपण नेहमी एक राहून एकमेकांची मदत करू असा निश्चय केला कारण एकोप्याचे सामर्थ्य आणि माणुसकी शेवटी नेहमीच विजयी ठरतात..
समाप्त..

कशी वाटली जेठालाल यांची कथा? नक्की कळवा कमेंट्स मधून!

धन्यवाद.
फोटो : साभार गुगल

©®सौ. प्रियंका कुणाल शिंदे

🎭 Series Post

View all