Login

ठिणगी भाग १

नात्यातला विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो.
"पाहिले ना? मी आधी पोट तिडकीने सांगत होते. गोडी-गुलाबीने एकदाच काय ते वेगळे मागून घ्या. नंतर तो परत काही विषय काढणार नाही. आणि तसेच झाले बघा." मालती किशोरला बोलत होती.

" अग‌ नको काळजी करु होईल सगळे नीट. तो काय आपल्याला अंतर देणार आहे का? " किशोर केविलवाण्या स्वरात बोलत होता.

" अजूनही तुमचे डोळे कसे उघडत नाही ते मला समजत नाही."

" आई अग मला आॅफिसला जायला उशीर होतोय. डबा कुठे ठेवलास तू."रंजू आपल्या आईला बोलत होती.

" रंजू,जरा तरी डबा कुठे ठेवलास हे बघण्याचे तरी कष्ट घेत जा. सगळ तुझ्या हातात द्यायचे का? "मालती रागाने बोलत होती.

" आज काय झाले तुला तापायला. आल्यावर सांग. आता पळते मी."रंजू बोलत होती.

" कार्टे, थांब जरा तू." मालती रंजूला ओरडून बोलत होती.

" काय बोलते पोरीला. तोंडावर जरा लगाम घाल. मोठी झाली आता ती."किशोर आपल्या बायकोला रागाने बोलत होता.

" तुम्हांला माझ‌ तोंडच दिसतय. मी काय बोलते आहे त्यामागच्या भावना कधी कळणार काय माहित तुम्हांला."

" अग आपल्या नशिबातलं कोणी ओरबाडून घेऊ शकत नाही." किशोर समजावून सांगत होता.

" अस म्हणून फक्त हातातवर हात घालून बसा तुम्ही."

" किशोर, अरे येतोस ना तू. आज सोसायटीची मिटिंग आहे."सोसायटीमधले माधव राव मित्र किशोरला बोलवत होते.

" तू चल पुढे. आलोच मी."किशोर माधवरावांना बोलत होते.

" किशोर काय झाले तुला. मिटिंगला आला नाहीस. मघाशी तुमच्या दोघांचा आवाज तर बाहेर पर्यंत येत होता. ठिक आहे ना सर्व."माधवराव किशोरशी काळजीच्या रुपात विचारत होते.

" ठिक आहे माधवराव. अवो ते जरा रंजना आॅफिसला जाण्याच्या नादात तिला घरकामात मदत करत नाही. म्हणून त्या दोघींचे चालले होते. त्यात मी मधे पडून समजवण्याचा प्रयत्न करत होतो. तर मलाच चार‌ शब्द ऐकावे लागले."कारण सांगत किशोर आपली बाजू सावरत होते.

" आमच्या घरीपण अशीच छोटी-मोठी भांडण होतच असतात. अश्यावेळी मी सरळ घराबाहेर काम आठवल अस सांगून पळ काढतो."माधवराव किशोरशी बोलत होते.

" बर ते जावू‌ द्या तुमची मुलगी सौम्या हिच्या लग्नाच काही पाहता की
नाही?"किशोर असेच माधवरावांजवळ विषय काढतात.

" आम्ही सगळ काही तिच्या हातात सोपवल आहे. ती म्हणेल तेव्हा लग्न लावून देणार."माधवराव किशोरला सांगतात.

" योग्य वयात लग्न झालेल चांगलेच नाही का? " किशोर माधवला विचारतात.

" तुम्ही आम्ही बोलून काय होणार आहे का? त्या करता योग जुळून यावा लागतो." माधवराव किशोरला बोलत होते.

" हे मात्र खरे बोललात. आमच्या भाग्यवान रंजूच्या मागेच लागतात सारख. लग्न कधी करणार म्हणून." किशोर माधरावला सांगत होते.

" आमच्याकडे पण काही परीस्थिती वेगळी नाही."

" चला आता खूप गप्पा झाल्या, अजून थोडावेळ इथे थांबलो तर कायमस्वरुपी बाहेरच रहा असे ऐकावे लागेल."

" अहो, ऐकलत का? माझ्या भावान रंजू करता लाखात एक स्थळ आणले आहे. मुलाचा फ्लॅट आहे, शेती देखील आहे. आपली मुलगी राणीसारखी राहिल त्यांच्याकडे." घरातून आवाज देत मालती किशोररावांना सांगत होती.

" छान झाले मग. पत्रिका पाहिली का दोघांची."

" पत्रिका पाहून खात्री केल्यानंतरच तुम्हांला सांगत आहे मी."

" रंजूला आधी त्या मुलाचा फोटो दाखवूया. तिला पसंद पडला की लगेच बघायचा कार्यक्रम करुया."किशोर आपल्या मुलीला विचारत होते.

" ती हो बोलली तरच पुढे जायच. नाहीतर दुसरी स्थळ आहेतच की."

" रंजू हे बघ मामाने स्थळ आणले आहे. तुला मुलगा आवडतो का ते सांग. म्हणजे पुढे जायला."

" आई-बाबा तुम्हां दोघांना हे स्थळ योग्य वाटत असेल तर माझी काही हरकत नाही."

" आताच मामाला फोन करुन पाहुणे कधी बघायला येतील विचारते." मालती दोघांना सांगत होती.

" हॅलो श्याम, रंजूला मुलगा आवडला आहे. त्या पाहुण्यांना विचारुन बघायचा कार्यक्रम करुया."

" हो ताई, सांगतो मी तुला लगेच."

" रंजू तुझ्या मनात नक्की नाही ना कोणी दुसर. असेल तर आताच सांग."

" नाही ओ. बाबा अस काही."

" ताई, अग पाहुणे दोन दिवसात पाहायला येणार आहेत."

" चला, चांगले झाले. दोन दिवस म्हणजे रविवारी येणार. तुला वेगळी सुट्टी काढावी लागणार नाही."

" आवराआवर करायला हवी. मी मार्केट मधून पहिला कप सेट घेऊन येते. रविवारी आपण इडली -चटणीचा बेत करुया."

" मी फ्रेश गुलाब आणि फुले टेबलावर ठेवायला आणतो. माझ्या कंपनी कडून मिळालेला गालिचा खाली अंथरुया."

" एवढी काय तयारी करताय. पाहुणे फक्त बघायला येणार आहेत."रंजू आई-बाबांना सांगत होती.

" तुला नाही कळणार आमच्या मनातल्या भावना."किशोर नकळत मनातल्या भावना बोलून दाखवत होता.

" आज दिवस कधी उगवला कळलेच नाही. आता कुकर लाऊन घेते इडलीचा. रंजू तू चटणी बनव. "मालती रंजूला बोलत होती.

" ताई, पाहुणे येतात बर का. आवरलय ना तुझे सगळे."मालतीचा भाऊ तिला सांगत होता.

" हो, येवू दे पाहुणे."

" तुम्हांला पत्ता सापडला ना? "किशोर पाहुण्यांशी बोलत होता.

" हो. इथे जवळच राहूलचा मित्र राहतो. त्याने सांगितले आम्हांला."

" रंजू नाश्ता घेऊन ये."किशोर आपल्या मुलीला बोलवत होता.

" काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा." मालती पाहुण्यांना विचारत होती.

" आम्ही काय विचारणार. ह्या दोघांनाच बोलू दे." पाहुणे रंजू आणि राहूलकडे पाहून बोलत होते.

" रंजू यांना आपल्या अंगणातील झाडे दाखवून आण."मालती रंजूला सांगत होती.

" तुमच शिक्षण किती? तुमच्या अपेक्षा काय आहेत." राहूल रंजूला विचारत होता.

" मी एम. बी. ए केले आणि आता डेटामॅटिक्स कंपनीत काम करते. माझ्या अपेक्षा म्हणाल तर काहीच नाही. आपल्या स्वबळावर कधीही संसार दोघांच्या साथीने पुढे नेता येतोच."

" लग्नानंतर नोकरी बाबत तुमचे काय मत आहे."

" लग्नानंतरही माझी नोकरी आहे अशीच राहिल. मी नोकरी सोडू शकत नाही. एवढेच सांगायचे होते. आणि एक माझ्या आई-वडिलांना मी एकुलती एक असल्याने त्यांना सर्वोतोपरी मदत मी करणार."रंजू राहूलला सांगत होती.

राहूल आणि रंजूच लग्नाबाबत निर्णय काय असेल? पाहुया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all