मागच्या भागात आपण पाहिले किशोरची बायको घरातल्या वाटपा वरुन भांडण करत होती. त्यात त्यांची मुलगी रंजू हिच्यावर राग काढण्यात येतो. हा आवाज माधवराव त्यांच्या सोसायटीमधले मेंबर ऐकतात. रंजू करता एक स्थळ दाखवण्यात येते. आता पाहुया पुढे,
" तुमचा निर्णय अगदी योग्य आहे."राहूल रंजूला सांगत होता.
दोघेजण घरात आले होते. दोघांच्या चेह-यावर होकार स्पष्ट लिहलेला होता.
" चला, आम्ही येतो आता. काय ठरले ते सांगतोच आम्ही." पाहुणे किशोरला सांगत होते.
" हो. चालेल ना."किशोर पाहुण्यांना बोलत होता.
" राहूल मुलगी कशी वाटली तुला."राहूलचे बाबा त्याला विचारत होते.
" बाबा मुलगी छान आहे. उच्च शिक्षित असून तिच्या कोणत्याच अपेक्षा नाही. आजकालच्या मुलींना मुलाचा फ्लॅट, गाडी सगळ काही हव असत. ती स्वत:पेक्षा इतरांचा विचार करणारी वाटली." राहूल त्याच्या बाबांना सांगत होता.
" सूनबाई पसंद आहे तर. कळवायच का मग त्यांना लगेच."बाबा राहूलला विचारत होते.
" अहो, घरी तर जाऊया आधी. नंतर सांगा." राहूलची आई नव-याला बोलत होती.
" चांगल्या कामाला उशीर नको. आताच फोन करुन सांगतो." राहूलचे बाबा पत्नीशी बोलत होते.
" अग पाहुण्यांचा फोन आला आहे."किशोर मालतीला बोलत होता.
" काही राहिले का आपल्या घरी त्यांचे पहा बर. विसरले असतील काहीतरी."मालती किशोरला सांगत होती.
" नमस्कार, मी गडवजे बोलतोय. आताच तुमच्याकडे रंजूला पाहून गेलो." पाहुणे किशोरशी बोलत होते.
" हो. बोला ना."किशोर पाहुण्यांना बोलत होता.
" आम्हांला तुमची मुलगी पसंद आहे. तुमच्याकडून काय आहे. ते पण सांगा आम्हांला." पाहुणे किशोरला सांगत होते.
" मुलीशी बोलून सांगतो तुम्हांला." किशोर पाहुण्यांना सांगत होता.
" अग त्या पाहुण्यांनी आपल्या रंजूला पसंद केले आहे. तिचा होकार किंवा नकार कळवा असे म्हणाले." किशोर मालती आणि रंजूला सांगत होता.
" भावाने दाखवले स्थळ चांगले आहे. तरीपण आपल्या पद्धतीने आपण चौकशी करुया." मालती किशोर आणि रंजूला बोलत होती.
" रंजू तुझ काय मत आहे."मालती रंजूला विचारत होती.
" तुम्हांला योग्य वाटत असेल तर मुलगा मला देखील पसंद आहे."रंजू किशोर आणि मालतीला बोलत होती.
" आपण दोन दिवसात माहिती काढून त्यांना आपले मत सांगूया." मालती किशोरला सांगत होती.
" बरोबर बोलते तू." किशोर मालतीला सांगत होता.
" अग माझा मित्र तिथेच राहतो जवळ त्याने सांगितले खूप चांगली लोक आहेत ती. मुलगा देखील निरव्यसनी आहे. डोळेझाकून तुम्ही मुलगी तिथे देवू शकता."किशोर मालतीला सांगत होता.
" माझ्या काकूने देखील हेच सांगितले. मुलगा शांत स्वभावी आणि इतरांची मदत करणारा आहे."मालती किशोरला सांगत होती.
" मला वाटत आपण त्यांना होकार कळवायला हवा."किशोर मालतीला सांगत होता.
" हो नक्कीच." मालती किशोरला सांगत होती.
"हॅलो, मी किशोर बोलतोय. आमची मुलगी रंजू हिला तुम्ही पाहायला आले होते. आमच्याकडून देखील होकार आहे." किशोर पाहुण्यांना सांगत होता.
" योग्य मुहर्त पाहून आपण साखरपुडा करुया."पाहुणे किशोरला बोलत होते.
" हो, चालेल ना."किशोर पाहुण्यांना सांगत होते.
नातेवाईक सर्वांना साखरपुड्याचे सांगण्यात आले होते. साखरपुड्याकरता अंगठी, साडी, फळ यांची खरेदी करुन आकर्षक पॅकिंग करण्यात आले होते. दोन दिवसांवर साखरपुडयाचा दिवस आला होता.
" वहिनी दादा आहे का?" छोटा दिर मालतीला फोन करुन विचारत होता.
" आहेत ना भावजी. काही काम होत का? तुम्ही कधी येताय साखरपुड्याकरता." मालती छोट्या दिराला सांगत होता.
" सांगतो वहिनी. आधी तुम्ही दादाला फोन द्या." छोटा दिर मालतीला सांगत होता.
" अहो, भावजींचा फोन आहे. महत्वाचे बोलयचे आहे काहीतरी." मालती किशोरला सांगत होती.
" काय बोलतो आहे तू हे. माझ्या पोरीचा दोन दिवसावर साखरपुडा आहे. तुला काय आताच करायच आहे का. नंतर पाहू ना काय ते." किशोर आपल्या छोट्या भावाला बोलत होता.
" दादा मी आज पोहचतो गावी. तू पण ये. तिकडून भाऊ देखील निघाला आहे." छोटा भाऊ किशोरला बोलत होता.
" बर बघतो. आता काय ठरवलच आहे तर याव तर लागेलच ना." किशोर छोट्या भावाशी बोलत होता.
" काय झाले एवढे चिडायला. कधी येतात भावजी." मालती किशोरला विचारत होती.
" त्याच नाव नको घेवूस तू." किशोर मालतीला रागाने बोलत होता.
" झाल तरी काय? " मालती किशोरला विचारत होती.
" त्याला आता शेतजमिन नावावर करुन हवीय. कंपनीच्या पगारावर भागत नाही बोलतोय घर." किशोर मालतीला सांगत होता.
" बरोबर आहे त्यांच. तो गावचा भाऊ आवळून बसला संपत्ती. द्यायचे ना ज्याच त्याला. भावजींची नोकरीतून नसेल भागत त्यांच काय करतील ते तरी." मालती किशोरला समजावून सांगत होती.
" आपल्या घरी साखरपुडा आहे. रंजू तिच्या पिढीतली मोठी मुलगी. तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडून द्यायचा ना. आता आजच बोलवून तिथे काही ठरवताना एकमेकांबद्दल नको त्या कटू आठवणी निर्माण होतील. तिच्या साखरपुड्याला माझे भाऊ आले नाहीतर लोक काय म्हणतील? " किशोर मालतीला सांगत होता.
" मला महित होत. कधी ना कधी हे होणार होत. पण आपल्याच मुलीच्या वेळी त्यांना हे सुचायच होत का. तुम्ही नका काळजी करु. लोकांच काय मनावर घ्यायच. कोणी आल नाहीतर आपल्या मुलीचा साखरपुडा व्हायचा राहणार आहे का?"मालती किशोरला सांगत होता.
" बरोबर आहे तुझे. मी येतो गावी जाऊन." किशोर मालतीला सांगत होता.
" काय हो यायला इतका उशीर केलात. सगळे ठिक आहे ना तिकडे."मालती किशोरला विचारत होती.
काय सांगेल किशोर? भावांमधले मतभेद टोकाची भूमिका तर घेणार नाहीत ना? पाहुया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा