Login

ठिणगी भाग ३

नात्यातला विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो.
मागच्या भागात आपण पाहिले दोन्ही घरच्यांची पसंदी झाली. साखरपुड्याची तारीख ठरली. इतक्यात किशोरच्या भावाचा वाटपावरुन फोन येतो. इतर भाव देखील गावी पोहचणार होते. किशोरला बोलवण्यात आले होते. आता पाहुया पुढे.

" हो. ठिक आहे सगळे." किशोर मालतीला सांगत होता.

" जेवायला घेते मी.तुम्ही हातपाय धुऊन या." मालती किशोरला बोलत होती.

" प्रवास करुन थकवा आला आहे मला. झोपतो मी जरावेळ तू जेवण करुन घे."किशोर दबक्या आवाजात मालतीला सांगत होता.

"बर करा तुम्ही आराम."मालती किशोरला सांगत होता.

" पाच वाजलेत उठायचे नाही का तुम्हांला. चला आता तरी जेवण करा."मालती किशोरला झोपेतून उठवत होती.

" अग अस वेळी खाऊन पित्त होईल मला. आता रात्रीच जेवण करेल मी. आता जरा चालायला जाऊन येतो."किशोर मालतीला सांगत होता.

" थांबा. अशी नजर चोरत का बोलता माझ्याशी, काय झालय. सांगा मला. मला माहित आहे काहीतरी लपवत आहात तुम्ही."मालती किशोरला सांगत होता.

" आपला आनंद समोर असताना तो पण नीट उपभोगू द्यायचाच नाही असच ठरवलय ग त्याने."किशोर चिडक्या स्वरात मालतीला बोलत होता.

" कोणी झालय तरी काय. स्पष्ट सांगा."मालती किशोरला विचारत होती.

" तुझा गावचा दिर नरेश. त्याला आधी त्या गावतल्या घरातील काहीच नको होते. तेव्हा बोलला होता तुम्ही दोघे घ्या काय घ्यायचे ते. आणि आज बारक्या जेव्हा वाटपा बाबत बोलला तर म्हणतो समान तीन हिस्से करा. आणि तो हे पण बोलला की आता एकत्र कार्यक्रम होणार नाहीत. ज्याने-त्याने आपापले पाहायचे. आई- अण्णा माझ्याकडेच राहणार. माझ्या घरी कोणी यायच नाही परत इथे." किशोर रडत सांगत होता.

" तुम्ही धीर सोडू नका. आपल्याला काही कमी नाही. एक सांगा अण्णा आणि आई त्यांच्या एकट्याचे थोडीच आहेत. तुमचे पण जन्मदाते आहे. त्यांना कधीही आपण भेटू शकतो. ते जेव्हा सगळे बोलत होते. तेव्हा अण्णा- आई नव्हते का? "मालती किशोरला बोलत होती.

" अण्णा ग्रामपंचायतीची मिटींग अटेंड करायला गेले होते. आणि आई मावशीला भेटायला तिच्या घरी गेली होती."किशोर मालतीला सांगत होता.

" म्हणूनच हा दिवस साधला त्याने. मला एक सांगा अण्णा जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही. तुम्ही नका काळजी करु."मालती किशोरला बोलत होती.

" अग अण्णांच काय घेवून बसली तू. किती झाले तरी ते चुलते आहेत. तात्या गेल्यापासून सगळे व्यवहार केशव पाहतोय. आता तो म्हणेल तसेच करावे लागेल."किशोर मालतीला सांगत होता.

" एवढे काय घाबरायचे. करुन करुन काय करेल तो."मालती किशोरला बोलत होती.

" त्याने आपल गाव तोडल आहे आज. उद्या वाटणी झाल्यावर आपण तिथे राहायला गेल्यावर तो काहीपण करु शकतो. आपली मोटार बंद करु शकतो. लाईटच कनेक्शन तोडू शकतो. शिव्या देईल चारचौघात आपल्याला. आजपर्यंत स्वाभिमान जपला आणि आता म्हतारपणाला हे बघायच ठेवल का? आता तर खरी गरज आहे त्यांची आपल्याला. उद्या आपल्या एकुलत्या एक पोरीच लग्न झाल्यावर कोण बघणार आपल्याला. मी पण रीटायर होईल पुढच्या वर्षी."किशोर आगतिकपणे मालतीला सांगत होता.

" काय बोलणार आता तुम्हीच सांगा मला. इतकी वर्ष तुम्ही कंपनीत काम करत होता तेव्हा कार्यक्रमांना सुट्या काढून बोलवायचे तुम्हांला. आता आपण कुठेही येऊ- जाऊ शकतो हे कळल वाटत त्यांना. म्हणून आधीच बंदी केली वाटत. आपण आहोत एकमेकांना आणि आपली मुलगी आणि जावई आपल्याला कधीच अंतर देणार नाही माहित आहे मला."मालती किशोरला बोलत होती.

" तुझ बरोबर आहे. पण लहानपणापासून एकत्र घालवलेले क्षण एका क्षणात विसरायला कसा काय तयार झाला तो. हे‌ दोघेही तात्या गेले तेव्हा मला बिलगून रडत होते. मला तेव्हा पासून तात्यांच्या ठिकाणी पाहत होते. आणि आज मी परका झालो का? निदान माझ्या एकुलत्या एक मुलीच तरी सगळ नीट पार पडू द्यायच होत."किशोर मालतीला सांगत होता.

रंजू चा साखरपुडा निर्विघ्न पणे पार पडेल का? आणखी कोणत्या वादळाला किशोरला सामोर जावे लागेल पाहुया, अंतिम भागात.

🎭 Series Post

View all