*******
"अगं काही खात पीत नाहीस का? किती रोडावली आहेस?"
पुजाची मैत्रीण तिला अचानक रस्त्याने जाताना भेटली आणि तिने पूजाला बघितल्या बघितल्या हे उद्गार काढले. पुजाचा नवराही सोबत होता,
"काय हो जीजू? माझ्या मैत्रिणीला उपाशी ठेवतात की काय?" मैत्रिणीने हसूनच विचारलं.
शेखरला काय बोलावं कळतच नव्हतं. दोघेही घरी आले तेव्हा शेखरने पूजाला विचारलं,
"येणारा जाणारा प्रत्येकजण हेच विचारत असतो तुला, तू खरंच इतकी रोडावली आहेस?"
"नाही ओ.. खूप दिवसांनी बघतात ना ते मला म्हणून..बाकी काही नाही.."
"मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो, तू वेळेवर आणि पोटभर जेवतेस ना? नाष्टा करतेस ना?"
हे ऐकल्यावर मात्र पूजाला भरून आलं, तिला बोलताही येईना..
"काय गं काय झालं?"
"काही नाही.."
पुजाचं एकंदरीत वागणं बघून शेखरला कळलं की काहीतरी बिनसलं आहे. हिचं कृश होणं यामागे काहीतरी कारण आहे. पूजाही नीट सांगत नव्हती मग शेवटी त्यानेच छडा लावायचा ठरवला.
घरात पुजाचे सासू सासरे आणि शेखर एवढीच माणसं. त्यामुळे रोज वेळेवर नाष्टा आणि स्वयंपाक होतच असे. मग नेमकं पाणी कुठे मुरतंय हे शेखरला आज बघायचंच होतं. सुट्टीचा दिवस असल्याने त्याने घराकडे लक्ष द्यायचं ठरवलं.
सकाळी सर्वांचा चहा झाला तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला.
"दूध तापव गं सुनबाई परत एकदा, नाहीतर खराब होईल.."
शेखर किचनमध्ये गेला, कोमट दूध त्याने दोन कपात घेतलं आणि एक पुजाकडे दिला.
"अहो हे कशाला?"
"मी सांगतो म्हणून..घे.."
शेखरने कप पुजाच्या हातात दिला आणि तो हॉलमध्ये बसला. पूजा उभ्या उभ्या दूध घेत होती, सासूबाईंनी ते पाहिलं आणि म्हणाल्या,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा