Login

आयुष्य हे असेच असते!

आयुष्य हे असेच असते!

आयुष्य हे असेच असते!
दुसरयांना दुख देणे खुप सोप्पे असते.
पण तेच दुख स्वता सहन 
करणे,पचवणे खुप अवघड असते.

कोणाला तरी प्रेमात नकार
देणे खुप सोप्पे असते. 
पण तोच नकार प्रेमात स्वता 
पचवणे हे खुप अवघड असते.

कोणावर तरी प्रेम करणे 
खुप सोप्पे असते.
पण तेच प्रेम मिळवणे
हे खुप अवघड असते.

कोणाला तरी जीव लावणे 
हे खुप सोप्पे असते.
पण कोणासाठी तरी जीव 
देणे खुप अवघड असते.

कोणावर तरी रुसुन बसणे
 हे खुप सोप्पे असते.
पण कोणाचा तरी रुसवा घालवणे 
हे खुप अवघड असते.

कोणाशी तरी एका क्षणात नाते
तोडुन टाकणे खुप सोप्पे असते.
पण तेच नाते जपणे,आयुष्यभर
टिकवणे खुप अवघड असते.

कोणाला तरी रडवणे खुपच सोप्पे असते.
पण त्याच रडणारया व्यक्तीला 
हसवणे खुप अवघड असते.

दुसरयांमध्ये दोष काढणे खुप सोप्पे असते.
पण तेच दोष स्वतामध्ये आहे हे
मान्य करणे खुप अवघड असते.

कोणासाठी तरी मरुण जाणे 
हे खुप सोप्पे असते.
पण कोणासाठी तरी जगुन दाखवणे
हे खुप अवघड असते.

कोणाला तरी समजावुन सांगणे
खुप सोप्पे असते.
पण कोणाला तरी समजुन घेणे
हे फार अवघड असते.

कोणाला तरी सल्ला देणे
खुप सोप्पे असते.
पण कोणाचा तरी सल्ला स्वता
ऐकुन घेणे फार अवघड असते.

कोणाशी तरी एका क्षणात
नाते तोडुन टाकणे
खुप सोप्पे असते.
पण तेच नाते जोडुन दाखवणे 
हे खुप अवघड असते.

कोणाचे तरी पालक होणे खुप सोप्पे असते.
पण पालकांची जबाबदारी,कर्तव्ये
पार पाडणे हे खुप अवघड असते.

कोणाचे तरी शिक्षक होणे खुप सोप्पे असते.
पण शिक्षकांची जबाबदारी पार पाडणे
हे खुप अवघड असते.

कोणाला तरी आठवणे हे खुप सोप्पे असते.
पण कोणाला तरी विसरुन जाणे
हे खुप अवघड असते.

कोणाचा तरी चारचौघात अपमान करणे 
हे खुप सोप्पे असते.
पण कोणाला तरी चारचौघात
मान देणे हे खुप अवघड असते.

कोणाकडे तरी दुर्लक्ष करणे
हे खुप सोप्पे असते.
पण कोणाचे तरी बोलणे
लक्षपुर्वक ऐकुण घेणे
हे खुप अवघड असते.

कोणाला तरी रागावणे
खुप सोप्पे असते.
पण कोणाला तरी 
मायेने जवळ घेणे
हे खुप अवघड असते.

कोणाचे तरी मन तोडणे
हे खुप सोप्पे असते.
पण कोणाचे तरी मन
जिंकणे हे खुप अवघड असते.

पैसा उधळणे खुप सोप्पे असते.
पण तोच पैसा स्वता कमावणे
हे खुप अवघड असते.


थोडक्यात सांगायचे म्हटले तर
बोलणे खुप सोप्पे असते.
करणे खुप अवघड असते.
सांगणे खुप सोप्पे असते
करणे खुप अवघड असते.
घेणे खुप सोप्पे असते.
देणे खुप अवघड असते.

आयुष्य हे असेच असते!