#जलदकथालेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विषय: थोरलेपण.
शीर्षक: थोरली भाग -१
शीर्षक: थोरली भाग -१
"मुलगी काय लग्न करून गेली की ती थोडी आपलीच राहते." उर्मिला म्हणाली.
फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलणाऱ्या आपल्या आईचे म्हणणे ऐकून माहेरी आलेल्या अनिताला वाईट वाटले.
उर्मिलाला मुलगा म्हणजे तिचे सर्वस्व वाटायचा. पहिली मुलगी झाली म्हणून हिणवल्यामुळे, ती आपली मुलगी अनिता हिच्याशी अंतर राखून राहत असायची.
अनिताला सासर मात्र चांगले मिळाले होते. कित्येक वेळा तिच्या नवऱ्याने आपल्या बायकोचा अप्रत्यक्षरीत्या होणारा अपमान बघितलेला होता, त्यामुळे आपली बायको माहेरी कशी कमी राहील याचाच प्रयत्न तो करत असायचा.
अनिताचे लग्न थोरली असल्यामुळे लवकर झाले होते. त्याच्या एक वर्षांनीच तिचा लहान भाऊ निशांत याचे लग्न झाले होते. निशांतला नेहमी आपल्या बायकोचे पटायचे आणि ती म्हणेल ते डोळे झाकून तो जास्त काही विचार न करता ऐकायचा. त्याच्या वडिलांना मात्र आपल्या मोठ्या मुलीवर फार जीव होता, परंतु आपल्या बायकोचे वागणे त्यांना आवडत नव्हते. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या बायकोने आपल्या मुलीशी व्यवस्थित वागावे. अनिताचे लग्न होईपर्यंत तर त्यांनी खूप वेळा समजावले होते, पण नंतर त्यांना स्वतःहून समजले होते की, तिला जोडीदार चांगला मिळाला. सासुच्या रूपात तिला आईची माया मिळत असल्याचे पाहून त्यांनी देवाचे आभार मानले होते.
आपला मुलगा आपले काही ऐकत नाही, तसेच त्यांचा उलट सुलट बोलून अपमान करणे हे त्यांना जिव्हारी लागायचे. त्यामुळे त्यांची रात्रीची झोप सुद्धा उडाली होती. शांतपणे असं कधी त्यांना झोपच लागत नव्हती. कित्येकदा तर आपल्या बायकोचा सुद्धा मस्करीत अपमान आपल्या सुनेने केलेला बघून एक दिवस त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
" हे बघा बाबा, तुमचे विचार हे जुनेच आहेत आणि ते जुनेच राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला काही बोलू नका." पटकन निशांत आपल्या वडिलांना म्हणाला.
आयुष्यभर आपण आपल्या दोन्ही मुलांना समान प्रेम आणि सर्वकाही दिले होते, परंतु आज असं अपमानात्मक शब्द त्यांच्या फारच मनाला लागले होते. त्याच रात्री त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
उर्मिलाला आपला नवरा गेल्याचे दुःख होते, परंतु तरीही आपला मुलगा आपल्याला व्यवस्थित सांभाळणार असेच तिला सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांना ती सांगत होती.
अनिताला जेव्हा आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितले होते, तेव्हा लगेचच ती आली होती आणि शेवटच्या आपल्या वडिलांचे मुखदर्शन क्षणाच्या वेळी ती खूप रडत होती. तिला सुद्धा माहीत होते की आपले वडील आपल्यावर फार प्रेम करायचे आणि कधीच त्यांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी केली नव्हती. कित्येक वेळा त्यांना त्याची आठवण झाली की ते तिच्या सासरी भेटायला जायचे.
आता आपल्याला असं कोण भेटायला येणार म्हणून ती रडत होती. दोन-तीन दिवस तर तिला जेवण जात नव्हते. पितृशोकामुळे ती चक्कर येऊन कोसळली, त्यामुळे तिला लगेच ऍडमिट करावे लागले होते.
" आम्हाला पण दुःख आहे आणि त्याच्यामध्ये पण हिला सारखं हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. म्हणजे किती त्रास द्यायचा आणि ह्यावर काय बोलायचंही नाही." निशांतची बायको आपल्या नणंदेच्या अवस्थेकडे बघून आपल्या आईला म्हणाली.
" काही नाही किती दुःख झाले आहे, हेच अशी नाटकं करून दाखवायचे असेल." निशांतची सासू म्हणत होती.
हे सर्व अनिताच्या सासुने ऐकले होते आणि लगेच आपल्या मुलाला सांगून तिला आपल्या घरी बोलवले होते.
अनिताची इच्छा नव्हती, परंतु सासुने सांगितल्यामुळे तिला सुद्धा नाईलाज झाला. ज्यावेळेस दिवस होते त्यावेळेस मात्र ती लवकरच सकाळी येऊन त्यासंबंधीची काम असायची ते ती करायची.
बारा दिवसानंतर मृत्युपत्र वाचण्यात येणार होते असे वकिलांनी सांगितले होते. त्या मृत्युपत्राकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आपल्या वडिलांनी आपल्या नावावर काय केले असेल याची सुद्धा उत्सुकता निशांतला होती.
उर्मिलाला तर सर्व गोष्टी आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याने द्यायला हव्यात, असे वाटत होते.
अनिताने मात्र याबाबत काही न बोलणे योग्य समजले होते. कारण तिच्या मतानुसार लाखमोलाचे बाबा आपल्याला सोडून गेलेत आणि त्याच्याकडे या भौतिक गोष्टींचा काहीच उपयोग नव्हते, असे तिचे मत होते.
क्रमशः
मृत्युपत्रात काय लिहिले असेल?
©विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा