थोरलेपण भाग तीन
जलदलेखन
मागील भागात आपण पाहिलं कि दोन्ही भावांना वाटायचं कि दादा आपल्याला बंधनात ठेवतो. आता पाहूया पुढे,
त्यांच्या बायका सुशिक्षित होत्या, पण त्यांना वाटायचं,
“दादा म्हणजे घराचा मालक, आमचं काही मत नाही.”
त्यांच्या नवऱ्याना चांगला पगार असल्यामुळे त्या जास्त खर्च करायच्या. त्यामुळे कधी फराळाच्या वेळेस, कधी खर्चाच्या विषयावर, तर कधी अगदी छोट्या गोष्टींवरून मतभेद व्हायचे.
सागर आणि रोहन दोघेही बायकांच्या बाजूने बोलायचे.
हळूहळू, घरात एक न सांगता येणारा तणाव वाढत गेला.
“दादा सगळं ठरवतो, आम्हाला विचारतच नाही,”
“आईला काही सांगायचं तर लगेच दादा मध्ये पडतो,”
“आईला काही सांगायचं तर लगेच दादा मध्ये पडतो,”
अशा कुजबुज त्याच्या कानावर पडायची, तेव्हा तो खूप उदास व्हायचा.
एके दिवशी असच सागर आणि रोहन त्याच्यासमोर आले आणि म्हणाले,
“दादा, आम्ही ठरवलंय आम्ही वेगळं राहू. तू काळजी करू नकोस, आम्ही व्यवस्थित सांभाळू सगळं...”
" शहरात आमच्या मुलांना सगळ्या सुख सोयी भेटतील. तूला न आईला भेटायला येऊच आम्ही. "
अभिजीतने एकटक त्याच्याकडे पाहिलं.
क्षणभर त्याला काही बोलावंसं वाटलं, पण मग तो फक्त एवढंच म्हणू शकला,
“ठीक आहे रे. जर त्यामुळे तुम्ही सुखी राहणार असणार , तर राहा स्वतंत्र.”
आईने विरोध केला, पण अभिजीतने तिचा हात धरला आणि शांतपणे म्हणाला,
“आई, कधी कधी जवळ राहूनही नाती दूर जातात… आणि दूर राहूनही प्रेम टिकतं. त्यांना त्यांचं जगू दे.”
तो दिवस जरी कठीण होता, तरी दादाने पुन्हा एकदा स्वतःच्या भावनांवर दगड ठेवला.
त्याने दोन्ही भावांना त्यांच्या वाटेवर जाऊ दिलं,
कारण त्याला माहीत होतं, नाती म्हणजे बांधून ठेवणे नव्हे, तर समजून घेणे... फक्त त्याला एकाच गोष्टीच वाईट वाटल, त्या दोघांपैकी एकानेही आईला किंवा त्याला त्यांच्यासोबत येण्यासाठी विचारलं नाही.

काही महिने गेले. घरात आता फक्त आई आणि अभिजीत घरात राहायचे.
दररोजच्या कामात साधेपणा होता, पण शांतता होती.
आई म्हणायची, “बाळा, आता तरी स्वतःचा विचार कर.. लग्न कर.. ही म्हातारी किती दिवस पुरेल तुला."
अभिजीत हसून म्हणायचा,
"आता ह्या वयात काय लग्न करणार?"
काळ पुढे सरकत गेला.
सागर आणि रोहन शहरात नोकरीत स्थिर झाले. आता त्यांना शहरातच राहायचं होतं.
एक दिवस दोघेही परत आले. टेबलावर काही कागदपत्रं ठेवली.
सागर आणि रोहन शहरात नोकरीत स्थिर झाले. आता त्यांना शहरातच राहायचं होतं.
एक दिवस दोघेही परत आले. टेबलावर काही कागदपत्रं ठेवली.
“दादा, आम्ही ठरवलंय, हे जुनं घर विकूया. आता आम्ही दोघेही शहरात आहोत, तिथेच दोघेही बंगला घेऊ. "
आईने आश्चर्याने विचारलं,
“मग हे घर? बाबांची आठवण? आणि आम्ही कुठे राहायचं??”
रोहन म्हणाला,
“आई, आठवण मनात असते, भिंतींत नाही.”
सागरही लगेच म्हणाला,
“हे घर मोडकळीस आलंय, दादा. शहरात स्वतःचा बंगला असला तर सगळं व्यवस्थित होईल.आलेल्या पैशामधून तू देखील घर बांधू शकतोस... तुम्हा दोघांना किती लागेल तसही..”
अभिजीत शांत होता. काही क्षण तो आईकडे, मग त्या कागदांकडे पाहत राहिला.
शेवटी तो सुद्धा वैताकून म्हणाला,
शेवटी तो सुद्धा वैताकून म्हणाला,
“आई बाबांचं हे घर आहे, आणि जोवर आई आहे, तोवर हे घर म्हणजेच आपला आधार. तिची इच्छा नसताना आपण तो आधार कसा काय काढून घेणार? "
सागरने थोडं चिडून विचारलं,
“दादा, भावना बाजूला ठेव. आता काळ बदललाय. आपल्यालाही पुढे जावं लागेल.”
अभिजीत म्हणाला,
“हो, पण पुढे जाणं म्हणजे मागचं सगळं पुसणं नाही रे.
हे घर विकल्यावर मिळणारे पैसे तुम्हाला सोयी देतील… पण माझं मात्र बाबाच्या आठवणी, आईचा आनंद, आणि आपलं बालपण सगळंच हरवलेले असेल.. "
“हो, पण पुढे जाणं म्हणजे मागचं सगळं पुसणं नाही रे.
हे घर विकल्यावर मिळणारे पैसे तुम्हाला सोयी देतील… पण माझं मात्र बाबाच्या आठवणी, आईचा आनंद, आणि आपलं बालपण सगळंच हरवलेले असेल.. "
त्याचा आवाज शांत पण ठाम होता.
आधी अभिजित नकार देत होता, मग अचानक कसा काय हो म्हणाला??
क्रमश:-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा