थोरलेपण भाग चार
जलदलेखन
मागील भागात आपण पाहिलं की दोन्ही भावांना आपल घर विकून शहरात बंगले बांधायचे आहेत.
आई रडत होती. तिला अभिजीतची काळजी वाटत होती.
तिने दोन्ही भावांना शांत करत म्हटलं,
तिने दोन्ही भावांना शांत करत म्हटलं,
“अरे पण, दादा फक्त घर राखू पाहतोय म्हणून नाही म्हणतोय. हे घर म्हणजे आमच्या आयुष्याचं पहिलं पान आहे.जसं पुस्तक बदलता येतं, तसं पहिलं पान नाही.”
खरे तर सागर आणि रोहन दोघांनी शहरातली प्लॉट बघून ठेवली होती. त्यांना फक्त दादाची सही हवी होती. त्यांचं सगळंच ठरलं होत.
त्या दिवशी वाद जास्तच उफाळला.
सागर म्हणाला,
सागर म्हणाला,
“दादा, तू नेहमी भावना पुढे करतोस. आता थोडं वास्तव बघ!”
रोहन म्हणाला,
“हो, आईसाठी आम्ही चांगलं घरच बांधणार आहोत. पण तू ऐकत नाहीस.... "
“हो, आईसाठी आम्ही चांगलं घरच बांधणार आहोत. पण तू ऐकत नाहीस.... "
"होना लहानपणीच ठीक होत पण आता आमचे निर्णय आम्ही घेऊ शकतो, त्यात तुझ्या मागे तुझा संसार नाही पण आमचं तस नाही... "
रोहन म्हणाला,
" की हे सगळं घर तुला एकट्याला हवं आहे दादा... "
आता मात्र हे ऐकून अभिजितला खूप त्रास झाला, अजून वाद चिघळू नये म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला.कारण त्याला माहित होत रोहन सागर रागात आहेत आणि वाटेल ते बोलत आहेत. म्हणून त्याने
समोर ठेवलेली कागदपत्रं उचलली, आणि त्यावर सही केली. काही न बोलता उठला आणि बाहेर गेला.
समोर ठेवलेली कागदपत्रं उचलली, आणि त्यावर सही केली. काही न बोलता उठला आणि बाहेर गेला.
घर विकलं गेलं, शहरात नवे बंगले देखील बांधले गेले. अभिजित न आई एकदा तिकडे जाऊन आले. पण सागर आणि रोहन आता आपापल्या संसारात रमले होते.
आई अजून अभिजितसोबतच राहायची, पण तिचं वय झालं होतं.
घरात आता शांतता असायची पण त्या शांततेत दोघांचा एकाकीपणा होता.. आईला अभिजितची काळजी लागलेली असायची.
आई अजून अभिजितसोबतच राहायची, पण तिचं वय झालं होतं.
घरात आता शांतता असायची पण त्या शांततेत दोघांचा एकाकीपणा होता.. आईला अभिजितची काळजी लागलेली असायची.
अभिजित रोज गॅरेजला जायचा, आता त्याच स्वतःच गॅरेज झालं होत. आईची काळजी घ्यायचा, पण रात्री जेवताना त्याला सगळ्यांची खूप आठवण यायची.
एक दिवस, त्याच्या एका जुन्या मित्राने त्याला एका सामाजिक कार्यक्रमाला बोलावलं.
“चल ना, थोडं मन बदलून जाईल तुझं,”
मित्र म्हणाला.
त्यालाही रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी कराव वाटलं म्हणून तो आनंदाने त्याच्या मित्रांसोबत गेला.
पण तिथे गेल्यावर जणू त्याच आयुष्याच बदललं. त्याच्या आयुष्याला एक वेगळी कळाटणी मिळाली.
पण तिथे गेल्यावर जणू त्याच आयुष्याच बदललं. त्याच्या आयुष्याला एक वेगळी कळाटणी मिळाली.
त्याच एकटेपण दूर होईल का??
क्रमश :-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा